WPL 2024, UPW vs DC : युपी वॉरियर्सचा डाव 119 धावांवर आटोपला, दिल्लीसमोर विजयासाठी 120 धावांचं आव्हान
वुमन्स प्रीमियर लीग 2024 स्पर्धेत युपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरु आहे. दिल्लीने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तर युपीला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. पण युपीला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं.

मुंबई : दिल्ली कॅपिटल्ससमोर युपी वॉरियर्सच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. तिसऱ्या षटकापासून घसरगुंडी सुरु झाली. त्यातून डोकं वर काढण्याची संधी मिळालीच नाही. पहिल्या विजयासाठी मोठी धावसंख्येची आवश्यकता होती. पण मोठी धावसंख्या उभारण्यात युपी वॉरियर्स संघाला अपयश आलं. युपी वॉरियर्स संघाने 20 षटकात 9 गडी गमवून 119 धावा केल्या आणि विजयासाठी 120 धावांचं आव्हान दिलं. आता हे आव्हान युपीचे गोलंदाज रोखतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या सामन्यात दिल्लीला मुंबईने पराभूत केलं होतं. तर युपीला बंगळुरुने पराभवाची धूळ चारली होती. दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयासाठी आतुर आहे. त्यामुळे कोण बाजी मारेल याची उत्सुकता आहे.
वृंदा दिनेशला आपलं खातंही खोलता आलं नाही. मरिझेन कॅपच्या गोलंदाजीवर बाद होत तंबूत परतली. त्यानंतर तहिला मॅक्ग्रा अवघ्या एका धावेवर बाद झाली. त्यामुळे संघावर दडपण वाढलं. मोठ्या पार्टनरशिपची आवश्यकता असताना एलिसा हिलीही काही खास करू शकली. वैयक्तिक 13 धावा करून आऊट झाली. संघाच्या 40 धावा असताना ग्रेस हॅरिस बाद झाली. संघाची बिकट स्थिती असताना स्वेता सेहरावत हीने चांगली फलंदाजी केली. 42 चेंडूत 45 धावा केल्या. पण तिला इतर खेळाडूंची हवी तशी साथ मिळाली नाही. किरण नवगिरे 10, पूनम खेमननार 10, दीप्ती शर्मा 5, सोफी एक्सलटन 6 धावा करून तंबूत परतले. दिल्लीकडून राधा यादवने सर्वाधिक 4 गडी बाद केले. तर मरिझेन कॅप्पने 3, अरुंधती रेड्डी आणि एनाबेल सुथरलँडने प्रत्येकी एक गडी बाद केला.
दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन): ॲलिसा हिली (कर्णधार/विकेटकीपर), वृंदा दिनेश, ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, पूनम खेमनार, दीप्ती शर्मा, सोफी एक्लेस्टोन, राजेश्वरी गायकवाड, गौहर सुलताना.
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): मेग लॅनिंग (कर्णधार), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेमिमाह रॉड्रिग्स, मारिझान कॅप, ॲनाबेल सदरलँड, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणी, तानिया भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, शिखा पांडे.
