Sushil Kumar चा पाय खोलात, अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात धाव, पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस

पैलवान सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे (Sushil Kumar anticipatory bail plea)

Sushil Kumar चा पाय खोलात, अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात धाव, पोलिसांकडून एक लाखाचं बक्षीस
Sushil Kumar

नवी दिल्ली : दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या 23 वर्षीय सागर राणा हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) याच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. अटकेपासून संरक्षणासाठी सुशील कुमारने दिल्ली कोर्टात अटकपूर्व जामीन याचिका केली आहे. सुशीलकुमार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं असून त्याची माहिती देणाऱ्यासाठी एक लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे. (Wrestler Sushil Kumar accused of murder of Sagar Rana at Chhatrasal Stadium files anticipatory bail plea)

पैलवान सागर राणा याची हत्या झाल्यापासून कुस्तीपटू सुशील कुमार परागंदा आहे. त्याच्यासह अन्य आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. सुशील कुमार आणि त्याचे साथीदार अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यावर मानसिक दबावाखाली येतील, असा पोलिसांचा अंदाज होता. त्याच वेळी, अटकेपासून वाचण्यासाठी सुशील कुमारने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. दिल्ली पोलिसांनी कालच त्याच्यावर एक लाखांच्या पारितोषिकाची घोषणा केली होती. तर त्याचा साथीदार अजयविषयी माहिती देणाऱ्यांना 50 हजारांचे इनाम मिळणार आहे.

सुशीलच्या मित्रानेच बिंग फोडलं

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये (Chhatrasal stadium) झालेल्या वादावादीनंतर पैलवानांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली होती. यात जखमी झालेल्या 23 वर्षीय सागर राणा या पैलवानाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिस सुशील कुमारसह वीस आरोपींच्या मागावर आहेत. यापैकी काही जणांना रोहतकमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपींपैकी सुशील कुमारचा निकटवर्तीय भुरानेच आपण हरिद्वारमधील एका योगगुरुच्या आश्रमापर्यंत सुशीलला सोडून आल्याची कबुली पोलिसांना दिली होती.

भुरा पैलवानी करत असून ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार याचा खास मित्र आहे. याशिवाय भूपेंद्र आणि अजयही सुशीलचे जीवलग आहेत. अजयचे वडील काँग्रेस नगरसेवक असल्याचा दावा केला जातो. तर भूपेंद्र विरोधात फरिदाबादमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हाही दाखल आहे. (Sushil Kumar anticipatory bail plea)

भुराने पोलिसांना काय सांगितलं?

छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी उशिरा कुस्तीपटू सागर राणाची हत्या केल्यानंतर सुशील कुमार आणि इतर पैलवान वेगवेगळ्या ठिकाणी लपले, असा दावा भुराने केला आहे. यानंतर प्रत्येकाने दिल्लीतून पळून जाण्याची योजना आखली आणि त्यासाठी सुशीलने भुरालाही बोलावलं होते. तो सुशीलला योगगुरुच्या हरिद्वारमधील आश्रमापर्यंत सोडून आला. यानंतर, भुरा परत आला आणि सुशीलने त्याचे सर्व फोन बंद केले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना सुशीलचे शेवटचे मोबाईल लोकेशनही हरिद्वारमधील सापडले आहे.

सीसीटीव्हीत सुशील कुमार मारहाण करताना कैद

छत्रसाल स्टेडियमच्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये सुशील कुमार सागरला मारहाण करताना दिसत असल्याचा आरोप सागरच्या कुटुंबीयांनी केला आहे. या दिवशी सागरचे तीन साथीदार सोनू, भगतसिंग आणि अमित यांनाही स्टेडियममध्ये मारहाण करण्यात आली होती. या सर्वांनी आपल्या जबानींमध्ये मुख्य आरोपी म्हणून सुशील कुमार याचेच नाव घेतले आहे.

सागरच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा

सुशील कुमार इतर पैलवानांच्या साथीने पूर्ण तयारीनिशी कुस्तीपटू सागर राणाला मारहाण करायला आला होता. पोस्टमार्टम अहवालानुसार सागरच्या छातीखेरीज इतर शरीरावर काठ्या आणि लोखंडी रॉडने वार केल्याच्या जखमा आहेत. त्याच्या शरीरावर 50 हून अधिक जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केले आहेत.

संबंधित बातम्या :

हाणामारीत पैलवानाचा मृत्यू, ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारचा पोलिसांना शोध

Sushil Kumar | पैलवान सुशील कुमारच्या शोधात पोलिसांची लूकआऊट नोटीस, सागर राणा मृत्यू प्रकरणात नाव

(Wrestler Sushil Kumar accused of murder of Sagar Rana at Chhatrasal Stadium files anticipatory bail plea)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI