Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : घटस्फोटानंतर धनश्रीसोबत पुन्हा एकत्र दिसणार ? युजवेंद्र चहलने…
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा एका रिॲलिटी शोमध्ये एकत्र काम करणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. मात्र आता खुद्द चहलनेच याबद्दल बोलत सत्य काय ते सांगितलं आहे.

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पूर्व पत्नी धनश्री वर्मा (Dhanshree Verma) हे दोघे लवकरच एकच रिॲलिटी शोमध्ये दिसणार आहेत. अशा अनेक बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत. सोशल मीडियावरही या संबंधी चर्चा सुरू आहे. मात्र आता खुद्द क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यानचे या प्रकरणावर भाष्य करत खरं काय ते स्पष्ट केलं आहे. त्याने या सर्व अफवांना विराम दिला आहे. ‘द 50’ या रिॲलिटी शोमध्ये चहल आणि धनश्री सहभागी होऊ शकतात आणि ऑन-स्क्रीन ते परत दिसू शकतात, अशा अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून फिरत होत्या. त्यांच्या संभाव्य री-युनिअनबद्दल चाहत्यांमध्येही चर्चा सुरू होती.
मात्र आता एका इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चहलने हे सर्व वृत्त पूर्णपणे खोटे असल्याचे सांगत ते फेटाळून लावले. त्याचा कोणत्याही रिॲलिटी शो शी कोणताही संबंध नाही. त्याची याबद्दल कोणतीही बोलणी किंवा कमिटमेंट झाली नसल्याचेही चहलने स्पष्ट केलं आहे.
चहलने फेटाळलं ते वृत्त
“युजवेंद्र चहल एका रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याच्या वृत्तांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हे सर्व दावे केवळ अटकळ आणि खोटे आहेत.” असं त्याने निवेदनात म्हटलं आहे. अलीकडील अहवालांमध्ये उल्लेख केलेल्या शोशी चहलचा कोणताही संबंध नाही असंही त्यातन पुढे स्पष्ट करण्यात आलं आहे. मीडिया आणि सोशल मीडिया युजर्सनी पुष्टी केल्याशिवाय कोणतीही माहिती शेअर करू नये, असंही अपील करण्यात आलं आहे.

धनश्रीचे मौन कायम
धनश्री वर्मा यांनी अद्याप या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तिचं मौन अजून कायम आहे. ‘द 50’ या रिॲलिटी शोचा प्रीमिअर 1 फेब्रुवारी रोजी होणार असून फराह खान ही हा शो होस्ट करणार आहे. हा शो भारतीय रिॲलिटी टीव्हीचा जुना पॅटर्न मोडण्याचा प्रयत्न करेल असं फराहने सांगितल.
धनश्री-चहलचं नातं
धनश्री वर्मा आणि युजवेंद्र चहल यांचं डिसेंबर 2020 साली गुरुग्राममध्ये लग्न झाले. कोविड-19 महामारी दरम्यान चहलने धनश्रीकडून नृत्य शिकण्यास सुरुवात केली तेव्हा दोघांची भेट झाली. पण जून 2022 ला दोघे वेगळे झाले आणि मार्च 2024 साली त्यांचा अधिकृत घटस्फोट झाला.
घटस्फोटानंतर, चहल हाँ दुबईमध्ये आरजे महवाशसोबत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याचा आनंद घेताना दिसला, ज्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अटकळी व्यक्त झाल्या. पण आरजे महवशने, आपण फक्त चांगले मित्र असल्याचं नेहमी सांगितलं. तर “राईज अँड फॉल” या रिअॅलिटी शोच्या पहिल्या सीझनमध्ये धनश्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि लग्नाबद्दल उघडपणे सांगितल्यामुळे ती चर्चेत आली.
