पुन्हा फेसबुकच्या 26 कोटी युजर्सचा डेटा लीक

पुन्हा एकदा फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याची घटना समोर आली आहे. 26.7 कोटी युर्जसचा डेटा लीक (Facebook user data leaked) झाला आहे.

पुन्हा फेसबुकच्या 26 कोटी युजर्सचा डेटा लीक
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 6:34 PM

मुंबई : पुन्हा एकदा फेसबुक युजर्सचा डेटा लीक झाल्याची घटना समोर आली आहे. 26.7 कोटी युर्जसचा डेटा लीक (Facebook user data leaked) झाला आहे, अशी माहिती सायबर सिक्युरिटी फर्म Comparitech आणि रिसर्चर बॉब डियाचेंको यांनी दिली आहे. लीक झालेल्या डेटामध्ये जवळपास 26 कोटी 71 लाख 40 हजार 436 युजर्सचे फोन नंबर, आयडी आणि पर्सनल डिटेल्स लीक (Facebook user data leaked) झाले आहेत.

लीक झालेल्या फेसबुक डेटामध्ये गेल्या दोन आठवड्यातील युजर्सचा डेटा आहे. हा डेटा पासवर्ड शिवाय अॅक्सेस केला जाऊ शकत होता. Comparitech ब्लॉग पोस्टने म्हटले की, गेल्या आठवड्यात हॅक झालेला डेटाबेस एका ऑनलाईन हॅकर फोरमवर होता. तो डाऊनलोड केला जाऊ शकत होता. हे ऑनलाईन हॅकर फोरम एका क्राइम ग्रुपसोबत जोडलेले आहेत. सध्या हा डेटाबेस हटवण्यात आला आहे.

युजर्सला स्पॅम आणि फिशिंग मेसेज पाठवून टार्गेट करण्याची भीती आहे. लीक झालेला डेटा किती महत्त्वाचा होता हे अजून स्पष्ट झालेले नाही. युजर्सचा डेटा ऑटोमेटेड बॉट्सच्या माध्यमातून जमा केला होता. ऑटोमेटेड बॉट्स फेसबुक युजर्सचा पब्लिक डेटा कॉपी करतो किंवा डेवलपर API कडून माहिती चोरतो. या प्रोसेसला स्क्रॅपिंग म्हणतात. यापूर्वीही सप्टेंबरमध्ये 40 कोटी फेसबुक युजर्सचे फोन नंबर लीक झाले होते.

“या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. हा डेटा फेसबुक चेंजेसपूर्वी चोरी करण्यात आला आहे”, असं फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.