Google 21st Birthday : गुगलच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त खास डुडल

सर्च इंजिन गुगलचा आज (27 सप्टेंबर) 21 वा वाढदिवस (Google 21st Birthday) आहे. या निमित्ताने गुगलने आज स्वत:साठी एक खास डुडल (Doodle) तयार केलं आहे.

Google 21st Birthday : गुगलच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त खास डुडल
Follow us
| Updated on: Sep 27, 2019 | 11:21 AM

मुंबई : सर्च इंजिन गुगलचा आज (27 सप्टेंबर) 21 वा वाढदिवस (Google 21st Birthday) आहे. या निमित्ताने गुगलने आज स्वत:साठी एक खास डुडल (Doodle) तयार केलं आहे. डुडलमध्ये 27 सप्टेंबर 1998 तारीखसह एक डेस्कटॉप कम्प्यूटर दाखवला आहे. कम्प्यूटरच्या स्क्रीनवर जुन्या लोगोसह गुगल सर्चचे पेज दिसत आहे. गुगलची (Google 21st Birthday) स्थापना 1998 मध्ये कॅलिफॉर्नियाच्या स्टॅनफोर्ड युनिर्व्हसिटीमधील दोन पीएचडी विद्यार्थी लॅरी पेज आणि सर्गी ब्रिन यांनी केली आहे.

गुगल ऑफिशीअली लाँच करण्यापूर्वी पेज आणि ब्रिनने याचे नाव ‘Backrub’ ठेवले होते. पण नंतर गुगल नाव ठेवण्यात आले. ज्यावेळी वर्ल्ड वाइड वेबची सुरुवात होती तेव्हा या दोन विद्यार्थिंनी एक अशी सिस्टम तयार केली की, जी संपूर्ण जगाची माहिती सर्वांसाठी उपलब्ध करेल. त्यांच्या या विचारामुळे गुगलचा जन्म झाला.

प्रत्येक वर्षी गुगलच्या वाढदिवसाची तारीख बदलली जाते. वर्ष 2005 पर्यंत गुगल आपला वाढदिवस 7 सप्टेंबर रोजी साजरा करत होता. यानंतर काही वर्षांनी कंपनी वाढदिवस 8 सप्टेंबर रोजी साजरी करु लागली. यानंतर 26 सप्टेंबर आणि आता 27 सप्टेंबर रोजी वाढदिवस साजरा केला जातो.

गुगलची सुरुवात 1998 रोजी झाली होती. कंपनीने पहिला डुडल बर्निंग मॅन फेस्टिवलसाठी तयार केला होता. पहिला डुडल तयार केल्यानंतर गुगलची एक पंरपरा तेव्हापासून सुरु झाली. आज गुगल प्रत्येक एका विशेष दिनी डुडलच्या माध्यमातून काही विशेष दिवस साजरे करतो. तसेच गुगलने डुडल तयार करण्यासाठी एक खास टीम तयार केली आहे.

100 पेक्षा अधिक भाषेत गुगलचे काम

आज गुगल जगभरात सर्वाधिक आवडीचे सर्च इंजिन आहे आणि हे 100 पेक्षा अधिक भाषेत काम करते. गेल्या 20 वर्षात कंपनीने मोठी उंची गाठली आहे. तसेच जगभरातील टॉप मल्टीनॅशनल कंपनीत गुगलने स्थान मिळवलं आहे. गुगलला सुरुवातीला याहू आणि आस्क जीव्स सारख्या सर्ज इंजिनकडून मोठी टक्कर मिळत होती. दरम्यान, गुगलने वेळेसोबत आपल्या सेवेत बदल केला आणि जगातील सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन बनवले. गुगलची पॅरंट कंपनी Alphabet Inc असून गेल्यावर्षी या कंपनीची एकूण संपत्ती 137 बिलियन डॉलर होती.

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.