अर्ध्या किंमतीत एअर कूलर खरेदी करा, उन्हाळा येण्यापूर्वी संधी मिळवा
Coolers on Discount : उन्हाळा येण्यापूर्वी नवीन कूलरवर 53 टक्क्यांपर्यंत सूट दिली जात असल्याने नवीन कूलर खरेदी करण्याची उत्तम वेळ आली आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कोणत्या एअर कूलरवर सर्वाधिक सूट दिली जात आहे? याची माहिती जाणून घेऊया.

Coolers on Discount : उन्हाळा येण्यापूर्वीच अनेकांची उन्हाळ्याची खरेदी सुरु झालेली आहे. एसी, कुलर, फॅन अशा सगळ्या गोष्टी गरजेनुसार आणि बजेटनुसार खरेदी करण्याचा अनेकजण प्लॅन करतात. या वस्तू खरेदी करताना डिस्काऊंट देखील मिळत असते. अशा प्रकारची ऑफर आम्ही घेऊन आलो आहोत. या ऑफरमध्ये तुम्हाला किती डिस्काऊंट दिलं जात आहे, याविषयी पुढे जाणून घेऊया.
तुम्ही नवीन कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उन्हाळा येण्यापूर्वी कूलर खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. कारण ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नवीन कूलरवर 50 टक्क्यांहून अधिक सूट देत आहेत. यामुळे तुमचे पैसे वाचू शकतात. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कोणत्या कूलरवर तुम्हाला दमदार डिस्काउंटचा फायदा मिळेल? चला जाणून घेऊया.
कुलरवरील सवलती व्यतिरिक्त अतिरिक्त पैसे वाचवायचे असतील तर बँक कार्ड डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकता. एवढंच नाही तर ग्राहकांच्या सोयीसाठी नॉन इंटरेस्ट EMI देखील उपलब्ध आहे.
लिव्हप्योर एअर कूलर
65 लिटरचा हा एअर कूलर 53 टक्के सवलतीनंतर अॅमेझॉनवर 8,399 रुपयांना (एमआरपी 18,000) विकला जात आहे. या कूलरच्या मोटरवर तुम्हाला दोन वर्षांच्या वॉरंटीचा फायदा मिळणार आहे.
हा कूलर स्पीड कंट्रोलर बटणाशी सुसंगत आहे. थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन असलेले हे कूलर अँटी-बॅक्टेरियल हनीकॉम्ब पॅड, आइस चेंबर आणि 588 स्क्वेअर फूट कूलिंग कव्हरेज एरियासह येते.
हॅवेल्स एअर कूलर
36 लिटरचा हा एअर कूलर फ्लिपकार्टवर 52 टक्के सवलतीनंतर 6,990 रुपयांना (एमआरपी 14,590) विकला जात आहे. या प्रोडक्टवर एक वर्षाची वॉरंटी मिळत आहे. 294 स्क्वेअर फूट कूलिंग कव्हरेज एरियासह येणारा हा कूलर 3 स्पीड सेटिंग, थर्मल ओव्हरलोड प्रोटेक्शन, इन्व्हर्टर सुसंगत अशा फीचर्ससह येतो.
घरासाठी क्रॉम्प्टन एअर कूलर
उन्हाळा येण्यापूर्वीच या एअर कूलरवर 51 टक्के भरघोस सूट मिळत आहे. डिस्काउंटनंतर हा 55 लिटर एअर कूलर तुम्ही 10,199 रुपयांत (एमआरपी 20 हजार 990 रुपये) खरेदी करू शकता.
हे उत्पादन एक वर्षाच्या वॉरंटीसह उपलब्ध आहे, विशेष फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कूलर आर्द्रता नियंत्रण, ऑटो ड्राइव्ह, ओव्हरलोड प्रोटेक्शनसह मोटर आणि इन्व्हर्टर सुसंगत अशा विशेष फीचर्ससह येते.
आम्ही तुम्हाला वरील एअर कूलर्सबद्दल माहिती दिली आहे. आता तुम्ही या ऑफर्स तपासून कूलर घेण्याचा प्लॅन करू शकता. अंतिम निर्णय तुमचा असेल.
