AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Boat च्या Headphones पासून Fastrack Smartwatch पर्यंत हे ’10’ गॅजेट्स 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध

ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने यावर्षीच्या सुरुवातीलाच मेगा सेलची (Amazon Republic day sale 2021) घोषणा केली आहे.

Boat च्या Headphones पासून Fastrack Smartwatch पर्यंत हे '10' गॅजेट्स 2 हजार रुपयांहून कमी किंमतीत उपलब्ध
| Updated on: Jan 22, 2021 | 6:43 PM
Share

मुंबई : ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने यावर्षीच्या सुरुवातीलाच मेगा सेलची (Amazon Republic day sale 2021) घोषणा केली आहे. 20 जानेवारीपासून हा सेल लाईव्ह करण्यात आला आहे. हा सेल प्राईम मेंबर्ससाठी त्याआधीच (19 जानेवारी) लाईव्ह करण्यात आला होता. हा सेल 23 जानेवारीपर्यंत सुरु असेल. अमेझॉनने या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठी सूट देऊ केली आहे. सोबतच कंपनीने विविध प्रोडक्ट्सवर अनेक बँक डिस्काउंट ऑफर्सही सादर केल्या आहेत. कंपनीकडून ई टेलर SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI, नो कॉस्ट EMI, बजाज कार्ड, Amazon वर ICICI क्रेडिट कार्ड, Amazon पे लेटर, सिलेक्ट डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवरही मोठी सूट देण्यात आली आहे. (Amazon Great Republic Day Sale : these 10 gadgets are being sold for less than rs 2000 see list)

अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला वनप्लस, सॅमसंग, शाओमी, LG, Bosch, HP, लेनोवो, जेबीएल, बोट, सोनी, अमेजफिट, कॅनन, निकॉन आणि इतर प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. अमेझॉनने एका निवेदनात म्हटलं आहे की, त्यांच्या ई-कॉमर्स साईटवर स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तर काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 50 ते 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. सूट दिली जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये आयफोन 12 मिनी, सॅमसंग गॅलेक्सी M31s, रेडमी नोट 9 प्रो, वनप्लस 8 प्रो 5G, ओप्पो A31 चा समावेश आहे.

दरम्यान, अमेझॉनने अनेक गॅजेट्सवर मोठी सूट देऊ केली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा 10 गॅजेट्सची माहिती देणार आहोत, जे 2000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत अमेझॉनवर उपलब्ध आहेत.

1. OnePlus Bullets Wireless Z Bass Edition : 1,899 रुपये (मूळ किंमत 2,190 रुपये)

OnePlus Bullets Wireless Z Bass Edition या वायरलेस ब्लूटूथ हेडसेटवर 291 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हे हेडसेट 1,899 रुपयांमध्ये उपलब्ध आहेत. या डिव्हाईसमधील बॅटरी 17 तासांपर्यंत चालते. केवळ 10 मिनिटांच्या चार्जिंगवर याची बॅटरी 10 तासांचा म्युझिक प्लेबॅक देते.

2. Mi पॉवर बँक 3i 20000mAh : 1,399 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 2,199 रुपये)

तब्बल 20,000 mAh ची बॅटरी असलेल्या Xiaomi च्या पॉवर बँकवर 800 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ही पॉवरबँक तुम्ही 1,399 रुपयांमध्ये खरेदी करु शकता.

3. बोट रॉकरज 550 ओवर-ईयर वायरलेस हेडफोन : 1,499 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 4,999 रुपये)

boat rockerz 550 over-ear wireless headphone वर 3500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. हे हेडफोन्स 500mAh क्षमतेच्या बॅटरीसह उपलब्ध आहेत.

4. Mi स्मार्ट बँड 4 : 1,899 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 2,499 रुपये)

Xiaomi चं फिटनेस ट्रॅकर Mi Band 4 वर 600 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हा स्मार्टबँड अवघ्या 1,899 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

5. नोकिया 105 सिंगल सिम : 1,160 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 1,249 रुपये)

नोकियाचा हा फीचर फोन 1,160 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 1.8 इंचांचा डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये एकदा चार्ज केल्यानंतर 14.4 तासांचा टॉकटाईम आणि 25.8 दिवसांचा स्टँडबाय टाईम देण्यात आला आहे.

6. TP-Link AC750 डुअल बँड वायरलेस केबल राउटर : 1,299 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 2,399 रुपये)

1,100 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर टीपी-लिंकचा राउटर 1,299 रुपयांमध्ये विकला जातोय.

7. झेब्रॉनिक्स गेमिंग मल्टीमीडिया USB कीबोर्ड आणि USB माऊस कॉम्बो : 1099 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 1999 रुपये)

कीबोर्ड आणि माऊसचा हा गेमिंग कॉम्बो सेट 900 रुपयांच्या किंमतीत अमेझॉनवर उपलब्ध आहे. यावर 800 रुपयांची सूट देण्यात आली आहे.

8. सॅमसंग ईवो प्लस: 1,329 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 3,999 रुपये)

सॅमसंगचं हे 128 जीबी मायक्रो एसडी कार्ड 2,670 रुपयांच्या डिस्काऊंटनंतर 1,329 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हे कार्ड वॉटर प्रूफ असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

9. डेल Km117 वायरलेस कीबोर्ड माऊस: 1,329 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 3,999 रुपये)

डेलच्या Km117 वायरलेस कीबोर्ड माऊसवर 2670 रुपयांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे 3999 रुपयांचा हा कीबोर्ड-माऊस सेट केवळ 1329 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

10. फास्टट्रॅक रिफ्लेक्स 2.0 Watch: 1,195 रुपयांमध्ये उपलब्ध (मूळ किंमत 1,995 रुपये)

फास्टट्रॅक रिफ्लेक्स 2.0 या स्मार्टबँडवर अमेझॉनने 800 रुपयांची सूट देऊ केली आहे. फास्ट्रॅकचा ही फिटनेस ट्रॅकर 1195 रुपयांमध्ये विकला जातोय. फास्ट्रॅकचं हे डिव्हाईस 10 दिवसांची बँटरी लाईफ प्रदान करतं.

हेही वाचा

Amazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट

WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा डिलीट…

Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया

(Amazon Great Republic Day Sale : these 10 gadgets are being sold for less than rs 2000 see list)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.