Amazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह ‘या’ 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट

अक्षय चोरगे

|

Updated on: Jan 20, 2021 | 6:07 PM

ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने यावर्षीच्या सुरुवातीलाच मेगा सेलची (Amazon Republic day sale 2021) घोषणा केली आहे.

Amazon Republic day sale : स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्हीसह 'या' 4 हजार वस्तूंवर बंपर डिस्काउंट

मुंबई : ई-कॉमर्स जायंट अमेझॉनने यावर्षीच्या सुरुवातीलाच मेगा सेलची (Amazon Republic day sale 2021) घोषणा केली आहे. आजपासून (20 जानेवारी) हा सेल लाईव्ह करण्यात आला आहे. हा सेल प्राईम मेंबर्ससाठी कालपासूनच (19 जानेवारी) लाईव्ह करण्यात आला आहे. हा सेल 23 जानेवारीपर्यंत सुरु असेल. अमेझॉनने या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅबलेट, टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट्सवर मोठी सूट देऊ केली आहे. सोबतच कंपनीने विविध प्रोडक्ट्सवर अनेक बँक डिस्काउंट ऑफर्सही सादर केल्या आहेत. कंपनीकडून ई टेलर SBI क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट EMI, नो कॉस्ट EMI, बजाज कार्ड, Amazon वर ICICI क्रेडिट कार्ड, Amazon पे लेटर, सिलेक्ट डेबिट आणि क्रेडिट कार्ड्सवरही मोठी सूट देण्यात आली आहे. (Amazon Republic day sale: Top deals on smartphones and tv, here is the full list)

अमेझॉनच्या सेलमध्ये तुम्हाला वनप्लस, सॅमसंग, शाओमी, LG, Bosch, HP, लेनोवो, जेबीएल, बोट, सोनी, अमेजफिट, कॅनन, निकॉन आणि इतर प्रोडक्ट्सवर मोठी सूट मिळणार आहे. अमेझॉनने एका निवेदनात म्हटलं आहे की, त्यांच्या ई-कॉमर्स साईटवर स्मार्टफोन आणि इतर अॅक्सेसरीजवर 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. तर काही इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 50 ते 70 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. सूट दिली जाणाऱ्या प्रोडक्ट्समध्ये आयफोन 12 मिनी, सॅमसंग गॅलेक्सी M31s, रेडमी नोट 9 प्रो, वनप्लस 8 प्रो 5G, ओप्पो A31 चा समावेश आहे.

स्मार्टफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट

स्मार्टफोन्सबाबत बोलायचे झाल्यास या सेलमध्ये Mi 10i 5G, 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरियंट तुम्हाला 20,899 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. युजर्सना या खरेदीवर 1100 रुपयांचा कूपन डिस्काऊंट देण्यात आला आहे. या यादीत दुसरं नाव Mi 10T प्रो 5 जीबी, 8 जीबी + 128 जीबी व्हिेरियंटचं आहे. हा स्मार्टफोन तुम्ही 37,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकता. चेकिंग आऊट करताना तुम्हाला 2000 रुपयांच्या कूपनवर टिक करावं लागेल, या कूपनविना या स्मार्टफोनची किंमत 39 हजार 999 रुपये इतकी आहे.

वनप्लस 8T आणि आयफोन 12 मिनी वर डिस्काउंट

वनप्लस 8T 40,499 रुपये इतक्या किंमतीत उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसर, 5 जी सपोर्ट, 120 Hz एमोलेड डिस्प्ले, 65 W फास्ट चार्जर आणि इतर फिचर्ससह बनवण्यात आला आहे. अमेझॉनने आयफोन 12 मिनीवरही ऑफर दिली आहे. या स्मार्टफोनवर 4500 रुपयांचा डिस्काउंट देण्यात आला आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन 59,900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. परंतु त्यासाठी तुमच्याकडे एसबीआय बँकेचं कार्ड असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे एसबीआय कार्ड नसेल तर तुम्हाला हा स्मार्टफोन 64,490 रुपयांमध्ये मिळेल. सध्या हा स्मार्टफोन अमेझॉनवर 67 हजार रुपये इतक्या किंमतीत लिस्ट करण्यात आला आहे.

लॅपटॉप्सवर जबरदस्त ऑफर्स

अमेझॉनने स्मार्टफोन्स आणि लॅपटॉपसह इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्यावरही डिस्काउंट ऑफर्स दिल्या आहेत. एमआय नोटबुक 14 इंटेल कोर i5 हा लॅपटॉप युजर्स 40,999 रुपयांमध्ये खरेदी करु शकतात. ग्राहक SBI कार्डद्वारे हा लॅपटॉप खरेदी करत असतील तर त्यांना 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काउंटही मिळेल. तसेच लेनेव्हो आइडियापॅड स्लिम 3i 10th जनरेशन इंटेल कोर i5 15.6 इंच फिंगरप्रिंट रिडरसह सादर करण्यात आला आहे. हा लॅपटॉप 49,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच HP पवेलियन गेमिंग DK0268TX 15.6 लॅपटॉपवरही सूट देण्यात आली आहे. इंटेल कोर i5 प्रोसेसरसोबत मिळत असलेला हा लॅपटॉप 59,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आयटम्सवर सूट

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये कंपनीने तब्बल 4000 इलेक्ट्रॉनिक्स आयटम्सवर सूट देऊ केली आहे. यामध्ये स्मार्ट टीव्ही, कंप्युटर, माऊस, ब्लुटूथ स्पीकर्स, स्मार्टवॉच मॉडल्स, फिटनेस बँड, लॅपटॉप, TWS इयरफोन्सचा समावेश आहे. या प्रोडक्ट्सची किंमत 199 रुपयांपासून सुरु होते. तर व्हिडीओ गेम्सवर युजर्सना 70 टक्के सूट देण्यात आली आहे.

हेही वाचा

WhatsApp | माहिती लीक होण्याची भीती? असा करा व्हॉट्सअ‍ॅपचा जुना डेटा डिलीट…

Corona Caller Tune: कोरोनाच्या ‘कॉलर टय़ून’मुळे डोक्याला ताप; दररोज तीन कोटी तास वाया

(Amazon Republic day sale: Top deals on smartphones and tv, here is the full list)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI