iPhone 13 च्या प्रतीक्षेत आहात? खिसा हलका करण्याची तयारी ठेवा, Apple स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याच्या विचारात

Apple कंपनी पुढील महिन्यात आयफोन 13 लाँच करण्याची योजना आखत आहे. चिप उत्पादन खर्चातील वाढ भरून काढण्यासाठी टेक जायंट Apple आगामी आयफोनची किंमत वाढवेल, असे म्हटले जात आहे.

iPhone 13 च्या प्रतीक्षेत आहात? खिसा हलका करण्याची तयारी ठेवा, Apple स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याच्या विचारात
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 7:24 PM

मुंबई : आयफोनच्या किंमतीवरुन मिमर्स आधीच किडनी विकण्याचे मिम्स बनवत असतात. गेल्या वर्षी लाँच झालेल्या आयफोन 12 प्रो मॅक्सची किंमत 1 लाख 19 हजार रुपये इतकी आहे. आता आयफोन 13 लाँच होण्याच्या मार्गावर आहे. हा फोन आयफोन 12 पेक्षाही महाग असणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोशल मीडियावर किडनीवरुन तयार केलेले मिम्स पाहायला मिळू लागले आहेत. (Apple can increase price of iPhone 13, know all fetails)

Apple कंपनी पुढील महिन्यात आयफोन 13 लाँच करण्याची योजना आखत आहे. चिप उत्पादन खर्चातील वाढ भरून काढण्यासाठी टेक जायंट Apple आगामी आयफोनची किंमत वाढवेल. डिजिटाइम्सच्या मते, तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग रिंग कंपनी (टीएसएमसी) त्यांच्या चिप उत्पादनाची किंमत वाढवण्याची योजना आखत आहे, ज्याचा परिणाम Apple सह अनेक कंपन्यांच्या ग्राहकांवर होईल.

टीएसएमसी त्यांच्या लेटेस्ट आणि मेच्योर प्रक्रिया तंत्रज्ञानासाठी त्याची किंमत 20 टक्क्यांपर्यंत वाढवू शकते. या वाढीचा परिणाम TSMC च्या ग्राहकांवर होईल, ज्यात Apple iPhone उत्पादक आहेत, ज्यांनी त्यांची iPhone 13 सिरीज अधिक किंमतीवर विकण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून कंपनीच्या नफ्यावरील परिणाम कमी होईल. अहवालानुसार, या बदलांमुळे, आयफोन 13 च्या किंमतीत 3-5 टक्के वाढ होईल कारण लेटेस्ट सब -7 एनएम प्रोसेस टेक्नॉलॉजी कोट्स 3-10 टक्के वाढू शकतात.

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री?

Apple ने आयफोन 13 सिरिजच्या लाँचिंगची तारीख निश्चित केली आहे, असे म्हटले जात आहे. परंतु वापरकर्त्यांना अद्याप याबद्दल माहिती मिळालेली नाही. पण आता एका चीनी सोशल मीडिया वेबसाईट नुसार, Apple 17 सप्टेंबरला आपला पुढील आयफोन लाइनअप लाँच करू शकते. साधारणपणे Apple कंपनी मंगळवारी लॉन्च इव्हेंट आयोजित करते आणि शुक्रवारपासून त्या उत्पादनाची विक्री सुरू होते.

तसेच, पोस्टमधून हे देखील उघड झाले आहे की, कंपनी गुरुवारी, 30 सप्टेंबर रोजी थर्ड जनरेशन एअरपॉड लॉन्च करणार आहे. Weibo पोस्टवर तारीख जाहीर करण्यात आली आहे. पोस्टमध्ये ई-कॉमर्स अॅपचे चित्र दिसत आहे, ज्यात आगामी Apple उत्पादनांची माहिती देण्यात आली आहे. अ‍ॅपच्या स्क्रीनशॉटनुसार, अॅपल 17 सप्टेंबरपासून आयफोन 13 चे चारही मॉडेल विकण्यास सुरुवात करेल. यामध्ये आयफोन 13, आयफोन 13 प्रो, आयफोन 13 मिनी आणि आयफोन 13 प्रो मॅक्सचा समावेश असेल. आयफोन लाँच केल्यानंतर, एअरपॉड्स 3 सप्टेंबरमध्ये सादर केले जातील.

डिस्प्लेमध्ये बदल

iPhone 13 ची एक इमेज समोर आली आहे. iPhone 13 चा डिस्प्ले नॉच पूर्वीपेक्षा लहान असेल. असंच डिझाईन iPhone 13 mini, iPhone 13, iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max या सर्वच स्मार्टफोन्समध्ये दिलं जाणार आहे. iPhone 13 आणि iPhone 13 Pro मध्ये 6.1 इंचांचा डिस्प्ले दिला जाईल. तर iPhone 13 Pro Max मध्ये 6.7 इंचांची स्क्रीन दिली जाऊ शकते. तसेच iPhone 13 mini स्मार्टफोन iPhone 12 mini प्रमाणे 5.4 इंचांच्या डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो.

या स्मार्टफोन्सबद्दलच्या अहवालानुसार, आयफोन 13 प्रो चा नॉच 5.35 मिमी लांबीसह दिला जाऊ शकतो, तर आयफोन 12 प्रोमध्ये हा नॉच 5.30 मिमी लांबीसह आहे. दुसरीकडे, आपण जर या फोनच्या रुंदीबद्दल बोलायचे झाल्यास या नवीन आयफोनची रुंदी 26.8 मिमी इतकी असेल, तर आधीच्या आयफोन 12 प्रोची रुंदी 34.83 मिमी इतकी होती.

नव्या Iphone मध्ये पंचहोल डिझाईन मिळणार

आयफोन एक्स मध्ये नॉच सादर केल्यानंतर, आयफोनचा नॉच थोडा लहान केला जाणार आहे. नॉच लहान करण्यासाठी कंपनीने ईयरपीस टॉप बेजेल वरच्या बाजूला सरकवलं आहे. असं म्हटलं जातंय की, अॅपल कंपनी 2022 मध्ये काही ठराविक iPhone मॉडेल्समध्ये पंच होल डिझाईन देऊ शकते. जो Samsung Galaxy S21 Ultra प्रमाणे असेल. तसेच फेस आयडीऐवजी कंपनी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देऊ शकते. कंपनी iPhone 13 सिरीज फास्टर A15 चिप, इम्प्रूव्ह्ड कॅमेरा आणि मॅट ब्लॅकसह नवीन रंगांमध्ये सादर करु शकते.

इतर बातम्या

6GB/128GB, 108MP ट्रिपल कॅमेरा, मोटोरोलाचा Edge 20 Fusion बाजारात

17 सप्टेंबरपासून Iphone 13 ची विक्री, 30 सप्टेंबरला नव्या एअरपॉड्सचं लाँचिंग, लीक्समधून खुलासा

30 फिटनेस मोड, SpO2 मॉनिटरिंग फीचरसह Mi Band 6 भारतात लाँच, किंमत…

(Apple can increase price of iPhone 13, know all fetails)

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.