AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दमदार फीचर्ससह Storm 125 लाँच, किंमत फक्त…

मुंबई : मोटारसायकल बनवणारी कंपनी Aprilia ने Storm 125 ही बहुप्रतिक्षित स्कूटर लाँच केली आहे. ऑटो एक्सपो 2018 मध्ये पहिल्यांदा कंपनीने ही गाडी समोर आणली होती. या गाडीची भारतात एक्स शोरुम किंमत 65 हजार आहे. ऑटोकारइंडियाच्या रिपोर्टनुसार, ऑटो एक्सपो 2018 मध्ये ठेवण्यात आलेल्या Storm 125 च्या तुलनेत नव्या प्रोडक्शन मॉडलमध्ये काही बदल बघायला मिळेल. नव्या […]

दमदार फीचर्ससह Storm 125 लाँच, किंमत फक्त...
| Updated on: May 27, 2019 | 9:49 PM
Share

मुंबई : मोटारसायकल बनवणारी कंपनी Aprilia ने Storm 125 ही बहुप्रतिक्षित स्कूटर लाँच केली आहे. ऑटो एक्सपो 2018 मध्ये पहिल्यांदा कंपनीने ही गाडी समोर आणली होती. या गाडीची भारतात एक्स शोरुम किंमत 65 हजार आहे.

ऑटोकारइंडियाच्या रिपोर्टनुसार, ऑटो एक्सपो 2018 मध्ये ठेवण्यात आलेल्या Storm 125 च्या तुलनेत नव्या प्रोडक्शन मॉडलमध्ये काही बदल बघायला मिळेल. नव्या Aprilia Storm 125 स्कूटरमध्ये 10-इंचाचे चाकं देण्यात आले आहेत. देशात इतक्या असे चाकं फक्त Vespa मॉडलमध्ये बघायला मिळतात.

या गाडीच्या ब्रेकसाठी याच्या रियर आणि फ्रंटमध्ये ड्रम ब्रेक्स देण्यात आले आहेत. तसेच यामध्ये CBS चाही सपोर्ट असणार आहे. मुख्य कंपनी Piaggio नव्या Aprilia Storm 125 स्कूटरमध्ये किंवा याच्या कुठल्या व्हेरिअंटमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देणार की नाही हे सध्या स्पष्ट नाही. Storm 125 मध्ये ग्रॅब हँडल आणि व्हाईट Aprilia बॅच देण्यात आला आहे. जेव्हा या गाडीला ऑटो एक्सपोमध्ये ठेवण्यात आलं होतं. तेव्हा यामध्ये ग्रॅब हँडल नव्हतं, तसेच व्हाईट बॅचच्या जागी रेड Aprilia बॅच देण्यात आला होता.

नव्या Aprilia Storm 125 ची बॉडी, इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आणि लाईट्स Aprilia SR 125 शी मिळते-जुळते आहेत. या स्कूटरमध्येही 124cc सिंगल सिलेंडर थ्री व्हॉल्व एअर कूल्ड इंजिन असण्याची शक्यता आहे. हे इंजिन SR 125 मध्येही देण्यात आलं आहे. हे इंजिन 7,250rpm वर 9.4bhp चं पावर आणि 6,250rpm वर 9.8Nm चा टॉर्क जनरेट करतं.

नव्या Aprilia Storm 125 स्कूटरची भारतीय बाजारात TVS NTorq 125 (किंमत 58,252 रुपये) आणि Honda Grazia (किंमत 60,723 रुपये) यांच्याशी टक्कर राहील.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.