ब्लॅक डेकरचे सुप्रीम सीरीजचे टीव्ही भारतात लाँच, टॉप फीचर्स काय, जाणून घ्या किंमत
ब्लॅक+डेकर ब्रँड कंपनीने इंडकल टेक्नॉलॉजिसोबत परवाना भागीदारी करत भारतात त्यांच्या सुप्रीम सिरीज लाँच केला आहे. ही नवीन सिरीज प्रीमियम डिस्प्ले, सिनेमॅटिक साउंड आणि अपग्रेडेड स्मार्ट टीव्ही फिचर्स असलेले हे असे कॉम्बिनेशन आहे जे घरांसाठी डिझाइन केली आहे. चला तर मग या स्मार्ट टीव्हीचे स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात...

ब्लॅक+डेकरने जागतिक परवाना भागीदार इंडकल टेक्नॉलॉजीजच्या सहकार्याने विकसित केलेली नवीन सुप्रीम सिरीज सादर करून भारतात त्यांचा टेलिव्हिजन पोर्टफोलिओ वाढवला आहे. ही सिरीज प्रीमियम डिस्प्ले, सिनेमॅटिक साउंड आणि अपग्रेडेड स्मार्ट टीव्ही फिचर्सने परिपूर्ण असलेल्या घरांसाठी डिझाईन करण्यात आलेला आहे.
ब्लॅक+डेकर सुप्रीम सिरीज किंमत आणि उपलब्धता
ग्राहकांना Amazon वरून सुप्रीम सिरीज स्मार्ट टीव्ही मॉडेल्स खरेदी करता येतील. सध्या ही उत्पादने प्लॅटफॉर्मवर उपलब्ध नाहीत. तसेच कंपनीने अद्याप त्यांची किंमत जाहीर केलेली नाही. ऑनलाइन प्लॅटफॉर्म व्यतिरिक्त, ग्राहक ऑफलाइन रिटेलर्सकडून देखील या स्मार्ट टीव्हीचे मॉडेल्स खरेदी करू शकतील.
ब्लॅक+डेकर सुप्रीम सिरीजची फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
ब्लॅक+डेकर सुप्रीम सिरीजमध्ये QLED 4K अल्ट्रा एचडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे. तर हा डिस्प्ले आहे जो एक अब्जाहून अधिक रंग रेंडर करू शकतो आणि मजबूत कॉन्ट्रास्ट आणि डीटेलसाठी HDR10 आणि डॉल्बी व्हिजनसह जोडलेले आहेत. मोशन हँडलिंगसाठी MEMC टेक्नॉलॉजी प्रदान केले आहे, तर AI अपस्केलिंग आणि मायक्रो डिमिंग वेगवेगळ्या लाइटिंग कंडीशन्समध्ये कंटेंटला अडॅप्ट केले जाते. तर या सिरीजमध्ये ग्राहकांना 43-इंच, 50-इंच आणि 55-इंच स्क्रीन आकाराचे पर्याय मिळतील. यामध्ये स्लिम बेझल आणि एक रिफाइंड डिझाइन आहे.
या टिव्हीच्या ऑडिओ बद्दल बोलायचे झाले तर 80 W पर्यंतचे बॉक्स स्पीकर्स देण्यात आले आहेत जे डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह येतात. यामुळे तुम्हाला घरीच सिनेमॅटिक अनुभवचा आनंद घेता येणार आहे. तसेच हे टीव्ही गुगल टीव्ही आणि अँड्रॉइड 14वर आधारित आहेत, जे नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार, यूट्यूब आणि इतर अॅप्सना सहज ॲक्सेस मिळते. गुगल असिस्टंटद्वारे व्हॉइस कमांड देखील देता येतात आणि स्मार्टफोनवरून कंटेंट देखील कास्ट करता येतो. अतिरिक्त फिचर्समध्ये एआय पिक्चर ऑप्टिमायझेशन, ड्युअल-बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.2 आणि गुगल मीट इंटिग्रेशन यांचा समावेश आहे.
तर या सिरीज टीव्हीमध्ये IMG BXE GPU सह DynamIQ ड्युअल AI प्रोसेसर, 2GB RAM आणि 16GB स्टोरेज प्रदान केले आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, eARC सपोर्टसह HDMI 2.1, USB 3.0 आणि USB 2.0 पोर्ट प्रदान केले आहेत, जे गेमिंग आणि मीडिया प्लेबॅक दोन्हीला सपोर्ट करतात.
