डेटिंग अ‍ॅपद्वारे लोकांना प्रेम मिळवून देणारी व्हिटनी, ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला

'बंबल' या ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपची संस्थापक व्हिटनी वूल्फ हर्ड ही महिला जगातील सर्वात मोठी युवा अब्जाधीश महिला बनली आहे (Bumble co-founder becomes youngest woman billionaire),

डेटिंग अ‍ॅपद्वारे लोकांना प्रेम मिळवून देणारी व्हिटनी, ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश महिला
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 4:38 PM

मुंबई : ‘बंबल’ या ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपची संस्थापक व्हिटनी वूल्फ हर्ड (Whitney Wolfe Bumble) ही महिला जगातील सर्वात युवा अब्जाधीश महिला ठरली आहे. विशेष म्हणजे वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी व्हिटनीला हे यश मिळालं आहे. व्हिटनीने काल (11 फेब्रुवारी) पहिल्यांदा आपल्या बंबल कंपनीचं आयपीओ लॉन्च केलं. अमेरिकेच्या शेअर बाजारात येताच बंबलच्या शेअर्सने तब्बल 67 टक्क्यांवर मुसंडी मारली. त्यानंतर पाहता पाहता कंपनीचे शेअर 72 डॉलरवर पोहोचले. या यशामुळे बंबल कंपनी अमेरिकेतल्या डेटिंग कंपन्यांमध्ये दुसऱ्या नंबरची कंपनी ठरली आहे (Bumble co-founder becomes youngest woman billionaire).

एकाच दिवसात व्हिटनी बनली 150 कोटींची मालकीन

महिलांची बाजू घेणारं आणि महिलांसाठी हे बंबल अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे. महिलेंची सुरक्षा लक्षात ठेवून हे अ‍ॅप तयार करण्यात आल्याचं म्हटलं जात. व्हिटनीच्या कंपनीने एकाच दिवसात शेअर मार्केटमध्ये उच्चांक गाठल्याने ती एकाच दिवसात दीडशे कोटींची मालकीन बनली आहे. या यशाबाबत तिने सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या आहेत.

“या यशासाठी 1.7 कोटी महिलांची खरंच आभारी आहे. त्यांच्यामुळेच हे शक्य झालं आहे. मी त्या सर्व लोकांचा धन्यवाद मानते, ज्यामुळे हे शक्य झालं”, असं व्हिटनी सोशल मीडियावर म्हणाली आहे (Bumble co-founder becomes youngest woman billionaire).

व्हिटनीचा थक्क करणारा प्रवास

व्हिटनी आज जगातील सर्वात तरुण महिला अब्जाधीशांमध्ये पहिली आली असली तरी, या यशापर्यंत पोहोचण्यासाठी तिने अनेक खस्ता खाल्या आहेत. व्हिटनीने 2014 मध्ये जगातील सर्वात प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅप टिंडर पासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या कंपनीसोबत काम करत असताना तिला खूप वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. या कंपनीत काम करताना तिने आपलं लैंगिक शोषण झाल्याचा आरोप केला होता. याविरोधात ती कोर्टातही गेली होती. याप्रकणात तिने आपला बॉस आणि प्रियकर जस्टिन माटीन यांचेही नावे घेतली होती. या लोकांनी तिला सह-संस्थापक पदापासून मुद्दामून लांब लोटल्याचा आरोप तिने केला होता. मात्र, टिंडरने या सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. त्यानंतर हे प्रकरण थंड पडलं होतं.

व्हिटनीने त्यानंतर लंडनचे अब्जाधीश एंड्रे एंड्रीव्ह यांच्यासोबत काम सुरु केलं. एंड्रे बंबलची निर्मिती करत होते. मात्र, पुढे काही दिवसांनी त्यांच्यावर लीडरशीप संबंधित आरोप झाल्यानंतर त्यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर पुढे 2020 मध्ये एका खासगी कंपनीने या अॅपमध्ये रुची दाखवली. त्यानंतर या अॅपची प्रचंड प्रगती होत गेली.

व्हिटनीला जसा लैंगिक शोषणचा सामना करावा लागला, तसा इतर महिलांना करावा लागू नये, या हेतूने हा अ‍ॅप तयार करण्यात आला. या अ‍ॅपला चांगला प्रतिसाद मिळाला. अखेर हा अ‍ॅप अमेरिकेतला दोन नंबरचा प्रसिद्ध डेटिंग अ‍ॅप म्हणून नावारुपाला आला.

हेही वाचा : Video | फँड्रीतल्या ‘शालू’चा हा जलवा बघितलात का? पिरतीचा इंचू चावणारच !

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.