फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा ब्रॅण्डेड कंपन्यांचे एसी; जबरदस्त कूलिंगसह वीज बिलाचीही बचत होणार

या एसीबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचे म्हणजे जबरदस्त कूलिंग आणि ऊर्जा बचत. ही या एसीची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर एसी बसवल्यानंतर तुमचे वीज बिल जास्त येणार नाही.

फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा ब्रॅण्डेड कंपन्यांचे एसी; जबरदस्त कूलिंगसह वीज बिलाचीही बचत होणार
फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा ब्रॅण्डेड कंपन्यांचे एसी

नवी दिल्ली : भारतातील बऱ्याच राज्यांमध्ये लोकांना उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे, परंतु अद्याप अशी अनेक राज्ये आहेत, जेथे अजूनही पाऊस पडलेला नाही. तेथील लोक उन्हामुळे त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत ना कुलर काम करतो ना फॅन. या उकाड्यात आराम मिळवण्यासाठी घरात स्वस्त आणि टिकाऊ अशा कोणत्या वस्तू आणाव्यात, अशी संभ्रमाची परिस्थिती निर्माण होते. तुम्हीही अशाच प्रकारे गोंधळलेले असाल ना. घरी नेमकं एसी आणायचा की कूलर, हे कोडे तुम्हालाही पडले असेल. गोंधळून जाऊ नका. गरमीपासून दिलासा मिळवायचाय, मात्र महागडा एसी खरेदीसाठी तुमचे बजेट नसेल तर चिंता करू नका. फ्लिपकार्डवर तुमच्यासाठी एसीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. (Buy cheap branded companies AC on Flipkart; Excessive cooling will also save on electricity bills)

या एसीबद्दल सर्वात महत्वाची गोष्ट सांगायचे म्हणजे जबरदस्त कूलिंग आणि ऊर्जा बचत. ही या एसीची वैशिष्ट्ये आहेत. त्याचबरोबर एसी बसवल्यानंतर तुमचे वीज बिल जास्त येणार नाही. उन्हाळ्यात आपल्याकडे 3 स्टार एसी बसविला तर आपले विजेचे बिलही कमी येईल तसेच आपल्याला थंडावाही मिळेल. याठिकाणी तुम्ही 5 स्टार एसीदेखील निवडू शकता. परंतु यासाठी तुम्हाला अधिक पैसे द्यावे लागतील. अशा परिस्थितीत तुमच्याकडे शेवटी 3 स्टार स्प्लिट एसीचा पर्याय उरतो. तसेच जर तुम्हाला 25 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचा एसी घ्यायचा असेल तर तुम्ही MarQ बाय फ्लिपकार्ट 1 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी घेऊ शकता, ज्याची किंमत तुम्हाला 22,490 रुपये इतकी पडेल.

हेदेखील पर्याय उपलब्ध

याशिवाय तुम्ही डाईकिनची 0.8 टन 3 स्टार स्प्लिट एसीदेखील घेऊ शकाल. हा एसी पीएम 2.5 फिल्टरसह येतो. त्याची किंमत 24,490 रुपये इतकी आहे. याशिवाय तुम्ही ओनिडा 1 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसीदेखील घेऊ शकता. हा एसी कॉपर कंडेन्सरसह येतो, या एसीची किंमत 24,990 रुपये आहे. तसेच तुम्ही फ्लिपकार्टवर सॅन्सुईचा 1 टन 3 स्टार स्प्लिट एसी 22,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

मोटोरोला एसी

तुम्ही फ्लिपकार्टवर मोटोरोलाचा एसी मिळवू शकता, जो 1 टन 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर आहे. दुसरीकडे तुमच्याकडे व्होल्टासच्या 0.8 टन 3 स्टार स्प्लिट एसीचाही पर्याय आहे. हा एसी 23,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. याशिवाय तुम्हाला इफॅल्कॉनचा (IFFALCON ) पर्यायही मिळतो, जो 3 स्टार स्प्लिट इन्व्हर्टर एसी आहे. त्याची किंमत 24,490 रुपये इतकी आहे. (Buy cheap branded companies AC on Flipkart; Excessive cooling will also save on electricity bills)

इतर बातम्या

पुन्हा एकदा शमिता शेट्टी बहीण शिल्पाच्या समर्थनात, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाली…

Big News: मेडिकल अभ्यासक्रमात OBC आणि EWS आरक्षण लागू, मोदी सरकारचं मोठं पाऊल

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI