AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 जीबी रॅम, 5500mAh बॅटरी, या किमतीत खरेदी करा Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन, जाणून घ्या याचे जबरदस्त फिचर्स

तुम्ही जर 25 हजार रूपयांच्या बजेटमध्ये नवीन स्मार्टफोन शोधत असाल, तर मोटोरोला एज 60 फ्यूजन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. यामध्ये 12GB रॅम, 5500mAh बॅटरी आणि इतर अनेक फीचर्स मिळतात. चला तर मग जाणून घेऊयात या डिव्हाइस कोणत्या किमतीत खरेदी करता येईल.

12 जीबी रॅम, 5500mAh बॅटरी, या किमतीत खरेदी करा Motorola Edge 60 Fusion स्मार्टफोन, जाणून घ्या याचे जबरदस्त फिचर्स
Motorola Edge 60 Fusion Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Mar 26, 2026 | 1:53 PM
Share

तुम्ही जर 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये उत्तम फीचर्स असलेला नवीन फोन शोधत असाल तर तुम्हाला या रेंजमध्ये Motorola Edge 60 Fusion हा स्मार्टफोन खरेदी करता येईल. हा फोन 12 जीबी रॅम आणि 5500mAh क्षमतेच्या मोठ्या बॅटरीसह येतो. चला जाणून घेऊया की या फोनची किंमत किती आहे आणि त्यात कोणते जबरदस्त फीचर्स आहेत.

भारतातील Motorola Edge 60 Fusion ची किंमत

हा मोटोरोला ब्रँडचा फोन फ्लिपकार्टवर 24 हजार 999 रूपयांच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. या किमतीत तुम्हाला या फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256GB स्टोरेजचा व्हेरिएंट मिळेल. हा फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच जी लोकं स्मार्टफोन खरेदी करताना अतिरिक्त सवलत शोधत आहेत, त्यांना ICICI आणि Axis बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1 हजार रूपयांची सूट मिळू शकते. याच फोनचा 12GB/256GB व्हेरिएंट ॲमेझॉनवर 24 हजार 920 रूपयाला विकला जात आहे.

Motorola Edge 60 Fusion चे पर्याय

या फोनच्या स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, 25 हजारांपेक्षा कमी किमतीचा हा फोन Vivo T5x 5G, Nothing Phone (3a) Lite, OPPO K13 Turbo 5G, REDMI Note 15 5G, IQOO Z10 5G आणि Realme P4 5G सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.

Motorola Edge 60 Fusion फिचर्स

स्क्रीन: या फोनमध्ये 1.5K रिझोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 4500 nits पीक ब्राइटनेस असलेला 6.7-इंचाचा कर्व्ह्ड डिस्प्ले आहे. यात गोरिला ग्लास 7i चे संरक्षण आहे.

प्रोसेसर: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, मोटोरोलाच्या या मिड-रेंज फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7400 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

कॅमेरा: मागील बाजूस ५०-मेगापिक्सलचा सोनी LYT 700C प्रायमरी सेन्सर, तसेच १३-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे, जो मॅक्रो आणि डेप्थ सेन्सर म्हणूनही काम करतो. समोरच्या बाजूस ३२-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 5500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Follow Us
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं
तामिळनाडूत मोठी घडामोड, CM विजय माजी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, नेमकं.
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय...
तब्बल 66 लाख लाडक्या बहिणींचे 1500 रुपये बंद, सरकारचा मोठा निर्णय....
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं
इन्स्टाग्रामवर जुळलं प्रेम, बांगलादेशी तरुणीनं थेट... जळगावात नेमकं.
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक..
जा सिमरन जा… या आयकॉनिक सीनचं लोकेशन पर्यटनस्थळ करा; अनुपम खेर भावूक...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत...
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरणी महत्त्वाची सुनावणी, जामिन अर्जाबाबत....
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर
उष्णतेने नंदुरबार होरपळलं; तापमानाचा पारा 45.5 अंशावर.
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही
सुनेत्रा पवारांचा रायगडकरांना शब्द; अजित दादांची उणीव भरून निघणार नाही.
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक
ट्रॅव्हल जिहाद विरोधात संग्राम जगताप आक्रमक.
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले....
राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका, फडणवीसांचे सडेतोड उत्तर, म्हणाले.....
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर...
निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातलग, अशा अनेक निदा महाराष्ट्रभर....