AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ChatGPT Free Subscription : चॅटजीपीटीचे सबस्क्रिप्शन मिळणार फुकट, जाणून घ्या सोपी पद्धत, आणि फायदे…

चॅटजीपीटीचे सबस्क्रिप्शनबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे येताना दिसतंय. आता सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी कोणत्याही पद्धतीचे पैसे हे तुम्हाला भरावे लागणार नाहीत. त्याची एक सोपी पद्धत आहे, ती जाणून घ्या.

ChatGPT Free Subscription : चॅटजीपीटीचे सबस्क्रिप्शन मिळणार फुकट, जाणून घ्या सोपी पद्धत, आणि फायदे...
ChatGPT
| Updated on: Nov 04, 2025 | 1:14 PM
Share

चॅटजीपीटी सध्या जोरदार चर्चेत आहे. चॅटजीपीटीमुळे तुमचे काम आता सोप्पे होणार आहे. विशेष म्हणजे ओपनएआयने नुकताच केलेल्या घोषणेप्रमाणे चॅटजीपीटी गो सबस्क्रिप्शन आता सर्व वापरकर्त्यांसाठी तब्बल 1 वर्षांसाठी मोफत करण्यात आलंय. एक वर्ष तुम्ही मोफतमध्ये चॅटजीपीटी वापरू शकणार आहात. कोणत्याही प्रकारचे पैसे न भरता तुम्ही याचा वापर करू शकता. साधारणपणे दरमहिन्याला 399 रुपये आहे जी 12 महिन्यांसाठी 4788 रुपये होते आणि ऑफरसह, ती आजपासून मोफत उपलब्ध आहे. जर तुम्हाला ChatGPT Go सबस्क्रिप्शन मोफत कसे मिळवायचे याबद्दल माहिती नसेल तर अगदी सोप्पा पद्धतीने तुम्ही त्याचा वापर करू शकता. तो कसा ते खाली जाणून घ्या.

तुम्हाला नक्की काय करावे लागेल? जाणून घ्या 

स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये वेब ब्राउझर किंवा चॅटजीपीटी अॅप डाऊनलोड करा. लॉगिन करून घ्या. तिथे विचारलेली माहिती भरा.

चॅटजीपीटी सबस्क्रिप्शन मोफत मिळवण्यासाठी हे करा फॉलो

चॅटजीपीटी अॅप ओपन करा. आता तुमच्या क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा. तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा किंवा क्लिक करा. नंतर तुमचा प्लॅन अपग्रेड करा निवडा. तुम्ही सेटिंग्ज -> सबस्क्रिप्शन – चॅटजीपीटी गो सबस्क्रिप्शन निवडा. प्लॅन सक्रिय करण्यासाठी ऑन-स्क्रीन सूचनांचे फॉलो करा. हे सर्व केल्यानंतर चॅटजीपीटी गो प्लॅन आता तुमच्या खात्याशी जोडला जाईल.

ChatGPT Go कडून मिळणाऱ्या सुविधा

OpenAI च्या प्रमुख मॉडेलसह अधिक सूचना आणि प्रतिसादांचा आनंद घ्या. अधिक फोटो तयार करा आणि विस्तृत श्रेणीच्या फायलिंग करा. डेटा एक्सप्लोरेशन आणि प्रॉब्लेम सोडवण्यासाठी पायथॉनचा वापर करा. ​​

ChatGPT Go मध्य API वापर समाविष्ट नाही 

OpenAI च्या API किंमती अंतर्गत स्वतंत्रपणे बिल केले जाते. – कोणतेही लेगसी मॉडेल नाहीत. GPT-4o आणि GPT-4 टर्बो सारखे जुने मॉडेल यामध्ये उपलब्ध नाहीत. सोराच्या माध्यमातून व्हिडिओ जनरेशन प्लस आणि प्रो वापरकर्त्यांसाठी मर्यादित आहे. यामुळे आता ChatGPT Go मुळे तुमची कामे अत्यंत सहज आणि सोपी होणार आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.