डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री SMS, Jio आणि VI चे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स सादर

भारतातील दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सचे दर वाढवले ​​आहेत. टॅरिफमध्ये वाढ झाल्याने, कंपन्यांनी एंट्री-लेव्हल प्लॅनसह मिळणारे फायदेही कमी केले आहेत.

डेटा, अनलिमिटेड कॉलिंगसह फ्री SMS, Jio आणि VI चे सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन्स सादर
SMS
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 6:49 PM

मुंबई : भारतातील दूरसंचार ऑपरेटर कंपन्यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या प्रीपेड प्लॅन्सचे दर वाढवले ​​आहेत. टॅरिफमध्ये वाढ झाल्याने, कंपन्यांनी एंट्री-लेव्हल प्लॅनसह मिळणारे फायदेही कमी केले आहेत. Vodafone Idea कंपनी सुरुवातीला त्यांच्या बेसिक प्रीपेड प्लॅनमध्ये SMS चे फायदे देत नव्हती. त्यानंतर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (TRAI) वोडाफोन-आयडियाची स्पर्धक टेलिकॉम कंपनी JIO ने तक्रार केली. त्यात जिओने नमूद केले की एसएमएस बेनिफिट्स नसलेल्या युजर्सना त्यांचे सिम पोर्ट करणे कठीण होत आहे, त्यानंतर रेगुलेटरने असे निर्देश दिले की, युजर्स कोणत्याही प्रीपेड किंवा पोस्टपेड प्लॅनवरुन दुसऱ्या दूरसंचार कंपनीत त्यांचं सिम पोर्ट करु शकतात. (Cheapest prepaid plans of Jio and VI launched with data calling SMS benefits)

एअरटेल आता त्यांच्या 99 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनसह SMS फायदे ऑफर करत आहे, जो बंडल एसएमएस फायदे ऑफर करणारा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. Telecom Talk नुसार, कंपनी 200 MB डेटा, 99 रुपयांचा टॉकटाइम आणि 1 रुपयामध्ये लोकल एसएमएस आणि 1.5 रुपयांमध्ये STD एसएमएस ऑफर करते. प्लॅनची ​​वैधता 28 दिवसांची आहे.

Vodafone Idea चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

याशिवाय Vodafone Idea 42 रुपये आणि 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये स्वतंत्रपणे SMS बेनेफिट्स देखील देत आहे. 42 रुपयांचा प्लॅन हा स्पोर्ट्स पॅक आहे आणि चालू क्रिकेट सामन्यासाठी अनलिमिटेड एसएमएस स्कोअर अलर्ट ऑफर करतो. 51 रुपयांच्या प्लॅनमध्ये आउटगोइंग एसएमएसचे फायदे आहेत आणि 28 दिवसांच्या वैधतेसह 1GB डेटा ऑफर करतो. Vodafone Idea चा 155 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे जो 24 दिवसांच्या वैधतेसह 300 SMS, 1GB डेटा आणि अनलिमिटेड कॉल ऑफर करतो.

Reliance Jio चे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

या महिन्याच्या सुरुवातीला, जिओने आपल्या सर्वात बेसिक दैनिक डेटा प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये सुधारणा केली, ज्याची किंमत 119 रुपये आहे. जेव्हा हा प्लॅन सादर करण्यात आला तेव्हा त्यात 14 दिवसांच्या वैधतेसह 1.5GB दैनिक डेटा दिला जात होता. आता हा प्लॅन अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि जिओ अॅप्स ऑफर करतो परंतु यात कोणतेही एसएमएस बेनेफिट्स नाहीत. जिओने आता प्लॅनसोबत 300 एसएमएस ऑफर करण्यासाठी प्लॅनचे फायदे सुधारित केले आहेत. जिओने सांगितले की, टॅरिफमध्ये 20 टक्के वाढ करूनही त्यांचे दर सर्वात कमी आहे.

मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी (MNP) द्वारे, युजर्स त्यांचा जुना नंबर कायम ठेवून दुसऱ्या टेल्को कंपनीकडे सिम पोर्ट करू शकतात. सब्सक्रायबर्सना सर्वप्रथम त्यांच्या सेवा ऑपरेटरला एक एसएमएस पाठवणे आवश्यक आहे त्यानंतर एक रिक्वेस्ट जनरेट केली जाते ज्यास चार ते पाच दिवस लागू शकतात.

इतर बातम्या

iPhone 13 सिरीजवर 20000 रुपयांची सूट, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर?

Xiaomi 12 या महिन्यात लाँच होणार, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

ऑनलाईन फूड ऑर्डर करताय? 1 जानेवारीपासून द्यावा लागणार टॅक्स

(Cheapest prepaid plans of Jio and VI launched with data calling SMS benefits)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.