गुगल प्ले स्टोअरवरील अॅन्टी-व्हायरस अॅपमधून युजर्सची मोठी फसवणूक

अगदी खऱ्या अॅन्टी-व्हायरससारखे (Anti Virus) वाटणारे अनेक अॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध आहेत. याबाबत आता एक नवा खुलासा झाला आहे.

गुगल प्ले स्टोअरवरील अॅन्टी-व्हायरस अॅपमधून युजर्सची मोठी फसवणूक

मुंबई : अगदी खऱ्या अॅन्टी-व्हायरससारखी (Anti Virus) अनेक अॅप गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) उपलब्ध आहेत. व्हायरस रिमूव्हल अॅप (Virus Removal App), व्हायरस क्लिनर (Virus Cleaner) आणि अॅन्टी व्हायरस सिक्युरिटी (Anti Virus Cleaner) अशा अनेक नावांनी ही अॅप ओळखली जातात. मोबाईल युजर्स मोठ्या प्रमाणात या अॅपचा वापर करत आहेत. ही सर्व अॅप 1 लाखाहून अधिकवेळा डाऊनलोड केल्याचंही दिसतं. मात्र, याबाबत आता एक नवा खुलासा झाला आहे.

क्विकहील (QuickHeal) सिक्युरिटी लॅबने मंगळवारी (10 सप्टेंबर) एक अहवाल सादर केला आहे. यात त्यांनी गुगल प्ले स्टोअरवरील या अॅपविषयी अनेक खुलासे केले. या अहवालानुसार गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असणारे हे अॅप खऱ्या अॅन्टीव्हायरससारखी दिसतात. त्यात स्कॅन डिव्हाईस (Scan Device) सारखे पर्याय देखील दिले जातात. युजर्सने हे पर्याय वापरल्यानंतर आपल्या मोबाईलचं स्कॅनिंग सुरू असल्याचंही दाखवलं जातं आणि अनेकदा व्हायरस किंवा मालवेअर सापडल्याचंही नोटीफिकेश येतं. मात्र, मुळात त्या अॅपमध्ये असं काहीही होत नाही.

गुगल प्ले स्टोअरवरील अशा अॅपमध्ये व्हायरसला शोधण्याची आणि ते काढून टाकण्याची कोणतीही क्षमता नसते. ते फक्त खऱ्या अॅन्टी व्हायरसची नक्कल केलेली असते. या अॅपचा मुळ उद्देश जाहिराती दाखवणे आणि डाऊनलोड काऊंट वाढवणे इतकाच असतो.

संबंधित अॅपमध्ये व्हायरस शोधून ते काढून टाकू शकेल असे व्हायरसविरोधी कोणतीही यंत्रणा कार्यान्वित नसते. मात्र, तशी यंत्रणा आहे हे दाखवण्यासाठी या अॅपमध्ये काही फसव्या आधीच ठरवून इन्स्टॉल केलेल्या यंत्रणा असतात. त्यातून युजर्सला आपला मोबाईल स्कॅन होत असल्याचा भास तयार केला जातो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI