Cyber Attack Alert | ‘या’ ईमेल आयडीना बळी पडू नका, भारतावर मोठ्या सायबर हल्ल्याचा इशारा

21 जून 2020 म्हणजे आजपासूनच हे सायबर अटॅक होण्याची शक्यता आहे. ncov2019@gov.in किंवा या सदृश्य ईमेल आयडीवरुन मेल येऊ शकतो. (Govt warns against large-scale phishing attacks using COVID-19 as bait)

Cyber Attack Alert | 'या' ईमेल आयडीना बळी पडू नका, भारतावर मोठ्या सायबर हल्ल्याचा इशारा

नवी दिल्ली : भारतात इंटरनेट यूझर्सवर मोठ्या सायबर हल्ल्याची भीती वर्तवत सरकारने खबरदारीचा इशारा दिला आहे. वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्यासाठी व्यक्ती किंवा व्यवसायांना ‘कोविड’वर मोफत उपचाराचे आमिष दाखवून बळी पाडले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Cyber Attack Alert Govt warns against large-scale phishing attacks using COVID-19 as bait)

भारताची सायबर सिक्युरिटी एजन्सी ‘सीईआरटी-इन’ने सावधतेचा इशारा दिला आहे. सरकारी वित्तीय मदतीच्या वितरणावर देखरेखीचे काम करणाऱ्या सरकारी संस्था, शासकीय विभाग आणि व्यापारी संस्था यांच्यावर संभाव्य हल्ले होण्याची भीती वर्तवली आहे.

21 जून 2020 म्हणजे आजपासूनच हे सायबर अटॅक होण्याची शक्यता आहे. ncov2019@gov.in किंवा या सदृश्य ईमेल आयडीवरुन मेल येऊ शकतो. एखाद्या फेक वेबसाईटवरुन व्हायरसयुक्त फाईल डाउनलोड करण्यास सांगितले जाऊ शकते. किंवा वैयक्तिक आणि आर्थिक स्वरुपाची माहिती भरण्याची विनंती केली जाऊ शकते. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या मोबाईलमधील माहिती आणि डेटा चोरीला जाऊ शकतो.

हेही वाचा : जवळपास 5 कोटी भारतीयांचा Truecaller डेटा डार्क वेबवर लीक, ऑनलाईन इंटेलिजन्सचा दावा

‘कोविड19 वर मोफत उपचार : मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नईच्या नागरिकांसाठी’ अशा पद्धतीचा ‘सब्जेक्ट’ ईमेलला देऊन ही लुबाडणूक केली जाण्याची चिन्हं आहेत. सायबर अटॅकर्सकडे 20 लाख जणांचे ईमेल आयडी असल्याची माहिती आहे.

कशी घ्याल खबरदारी?

1. माहितीच्या व्यक्तीच्या ईमेल आयडीवरुन मेल आला, तरी अज्ञात फाईल डाउनलोड करु नका 2. अँटी व्हायरस, फायरवॉल वापरा आणि फोनमधील संवेदनशील माहितीचे जतन करा 3. पासवर्ड किंवा ओटीपी कोणाबरोबरही शेअर करु नका

(Cyber Attack Alert Govt warns against large-scale phishing attacks using COVID-19 as bait)

Published On - 4:44 pm, Sun, 21 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI