iPhone च्या ‘या’ फोनवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील सर्वात महगाडा फोन म्हणून अॅपलच्या स्मार्टफोनला ओळखले जाते. अॅपलच्या प्रत्येक स्मार्टफोनची किंमत ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाही. पण तरीही हा फोन खरेदी करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.  अमेझॉन वेबसाईटवर सध्या समर सेल सुरु आहे. या सेलमध्ये आयफोन एक्सवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. अमेझॉनच्या समर सेलमध्ये अनेक कंपनींच्या […]

iPhone च्या 'या' फोनवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : स्मार्टफोन इंडस्ट्रीमधील सर्वात महगाडा फोन म्हणून अॅपलच्या स्मार्टफोनला ओळखले जाते. अॅपलच्या प्रत्येक स्मार्टफोनची किंमत ही सामान्य माणसाच्या खिशाला परवडत नाही. पण तरीही हा फोन खरेदी करण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात.  अमेझॉन वेबसाईटवर सध्या समर सेल सुरु आहे. या सेलमध्ये आयफोन एक्सवर तब्बल 21 हजार रुपयांची सूट दिली जात आहे.

अमेझॉनच्या समर सेलमध्ये अनेक कंपनींच्या स्मार्टफोनवर सूट दिली जात आहे. मात्र आयफोन एक्सवर 21 हजार रुपयांची सूट मिळत असल्याने आयफोन एक्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. या फोनची मूळ किंमत 91 हजार 990 रुपये आहे. मात्र अमेझॉनच्या सेलमध्ये फोनची किंमत 69 हजार 999 रुपये दिली आहे. ही ऑफर 64 जीबी व्हेरिअंटसाठी आहे.

आयफोन एक्सच्या टॉप व्हेरिअंटमध्ये 256 जीबी इंटरनल स्टोअरेज दिला आहे. या स्मार्टफोनवरही सूट देण्यात आली आहे. या फोनची किंमत 1 लाख 6 हजार 900 रुपये आहे. मात्र ऑफरमध्ये या फोनची किंमत 1 लाख 1 हजार 999 रुपये दिली आहे.

अॅपलने 10 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयफोन एक्स फोन लाँच केला होता. हा फोन लाँच झाल्यावर कंपनीने आयडी देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आयफोन एक्स या फोनमध्ये सर्वप्रथम डिस्प्लेवर नॉच सपोर्ट दिला होता. आयफोन एक्सचा डिस्प्ले 5.8 इंचाचा आहे आणि यामध्ये A11 बायोनिक चिप दिली आहे. आयोफोनमध्ये ड्युअल कॅमेरा आहे. फोनमध्ये 12+2 मेगापिक्सल असा रिअर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी मोबाईलमध्ये 7 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

आयफोन एक्स शिवाय या सेलमध्ये iPhone XR, iPhone 8 Plus आणि iPhone 8 वरही सूट मिळत आहे. iPhone XR च्या 64 जीबी व्हेरिअंटवर 10 हजार रुपयांची सूट मिळत आहे.

व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.