AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इन्स्टाग्राम आणि Tik Tok नंतर आता 150 देशात लॉन्च होणार फेसबूक रिल्स, यूजर्सना मिळणार अनेक नवे फीचर्स 

मेटान नुकतीच अशी घोषणा केली की, ते आता इन्स्टाग्रामसारख्या शार्ट व्हिडिओ फीचर रिल्ससारखी फेसबूकवरही अशा प्रकारच्या रिल्सला अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवर ते लॉन्च करणार आहे.

इन्स्टाग्राम आणि Tik Tok नंतर आता 150 देशात लॉन्च होणार फेसबूक रिल्स, यूजर्सना मिळणार अनेक नवे फीचर्स 
| Edited By: | Updated on: Feb 23, 2022 | 5:11 PM
Share

मुंबईः मेटाने नुकतीच अशी घोषणा केली आहे की, ते आता इन्स्टाग्रामसारखे (Instagram) शार्ट व्हिडिओ फीचर (Feature) रिल्स (REELS) फेसबूकच्वया माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर ते लॉन्च करणार आहे. या फीचर्सच्या निमित्ताने कंपनीने सांगितले आहे की, शॉर्ट व्हिडिओ शेअरिंग फीचर्स ही जगातील 150 मध्ये Android  अ‍ॅण्ड्रॉईड आणि iOS वरील फेसबुकच्या अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन जाहीर केले की, सोशल मीडियावरील हे रिल्स पूर्वीपासूनच आमच्या सोशल मीडियावर सगळ्यात जास्त वाढणारा कंटेट आहे, आणि त्यामुळे तो आता आम्ही फेसबुकवरही ते उपलब्ध करत आहोत.

इन्स्टाग्राम रिल्स शॉर्ट व्हिडिओ क्लिप हे ही एक प्रकारचे फिचर्स आहे. 2020 मध्ये यूजर्ससाठी हे उपलब्ध करुन देण्यात आले होते. इन्स्टाग्रामने चिनी शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकला टक्कर देण्यासाठी हे फिचर्स तयार केले होते. त्यामुळे सगळ्यात जास्त वापरले जाणारे हे फिचर्स आहे. यासाठी या कंपनीने मोनेटायजेशन टूल ही लॉन्च केले आहे. त्यामुळे झुकेरबर्गने अशी घोषणा केली आहे की, मेटा रिमिक्ससारखे फेसबूक रिल्समध्ये काही क्रिएटर टूल जोडत आहेत, आणि त्यामुळे असलेल्या स्टोरीपासून रिल्स बनवण्यासाठी हे फीचर्स तयार केले जाणार आहे. तर कंपनीकडून व्हिडिओ क्लिपिंग टूलही बनवले जात आहेत. कारण लाईव्ह किंवा मोठे व्हिडिओ असतील आणि व्हिडिओंची निर्मिती करणारे आहेत त्यांना वेगवेगळ्या प्रकारात हे टेस्टिंग करता येणार आहे.

सर्वप्रथम  50 देशात लाँच

फेसबुकवर नवे रिल्स किंवा नवे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि ते बनवण्यासाठी अपडेट झालेले रोल आऊट करणार आहेत. जसं की, स्टोरीज फीचर्स, वॉच टॅब आणि न्यूज फीड हे टॉपवर दिसणार आहे. इन्स्टाग्रामच्या फीड आणि स्टोरीजसारख्या दुसऱ्या कंटेटच्या फॉरमॅटच्या तुलनेत तुम्ही कमाई करु शकता, मात्र हा बदल हळूहळू केला जाईल.आता सध्या ही कंपनी अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोमध्ये रिल बनवणाऱ्यांसाठी फेसबुक रिल्स हे आता प्रायोगिक तत्वावर त्याचा प्रसार करत आहे. मेटाच्या मतानुसार हा प्रायोगिक तत्वावरील प्रयोग थोड्याच दिवसात 50 देशात केला जाणार आहे, आणि त्यासाठी आतापासूनच त्याच्यासाठी जाहिरात तयार आहेत.

ऑक्टोबरपासून नव्या प्रयोगाची चाचणी

या टेस्टिंगमध्ये सहभागी होणारे निर्माते दोन प्रकारच्या वेगवेगळ्या जाहिराती त्याची संकल्पना वापरुन पाहू शकतील. बॅनर आणि स्टिकर्ससाठी या जाहिराती असणार आहेत. येत्या काही महिन्यात फेसबुक हे जागतिक बाजारपेठांमध्ये या जाहिराती लाँच करणार आहे.ऑक्टोबरपासून या नव्या प्रयोगाची चाचणी सुरु आहे.

संबंधित बातम्या

OnePlus Nord CE 2 vs Realme 9 Pro: दोघांमध्येही जबरदस्त फीचर्स, नेमका कोणता चांगला ते जाणून घ्या!

यूजर्स ट्विटर थ्रेड्सवरून स्वतःला अनटॅग करू शकतील, नवीन फीचर लवकरच, जाणून घ्या अधिक!

…म्हणून पुन्हा 54 चीनी अ‍ॅपवर बंदी; अर्थमंत्र्यांचा खुलासा

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.