जिओभारत फोनवर UPI ने पेमेंट केल्याचा फ्री अलर्ट, जियो साऊंड पे सर्व्हीस लाँच, होणार इतक्या पैशांची बचत
आम्ही भारतीयांच्या भावनांचा उत्सव साजरा करीत असून एक सच्च्या डिजिटल भारताची निर्मिती करण्याच्या ध्यैयाची प्रेरित असल्याचे जिओचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी म्हटले आहे.

येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिओ साऊंड पे सर्व्हीस लाँच करणार आहे. ही सुविधा जिओभारत कोनवर आजीवन फ्री मिळणार आहे. वास्तविक जिओ साऊंडपे सुविधेवर कोणत्याही साऊंड बॉक्स शिवाय युपीआय पेमेंटचा अलर्ट मिळणार आहे. कोणत्याही मोबाईलवर उपलब्ध होणारी ही भारतातील पहीली सुविधा असणार आहे. देशातील 5 कोटीहून अधिक छोटे उद्योजक आणि छोटे व्यापारी यांना या सुविधेचा थेट लाभ होणार असून त्यांची पैशांची बचत होणार आहे.
जिओ साऊंड पे एक अभूतपूर्व इनोव्हेशन आहे. जे युपीआयच्या पेमेंटचे तात्काळ, विविध भाषेत ऑडिओ अलर्ट मॅसेज देणार आहे. त्यामुळे ज्यांचे छोटी किराणा मालाची दुकाने आहेत किंवा भाजीची मंडई आहे किंवा रस्त्यावरील फेरीवाले यांचा व्यवसाय करणे त्यांना या सुविधेमुळे सोपे होणार आहे. सध्या लघु, सुक्ष्म व्यापारी साऊंड बॉक्ससाठी दर महिन्यास १२५ रुपये देऊन साऊंड पे सुविधा घेत आहेत. आता ही सेवा जिओ साऊंडपेवर मोफत मिळणार आहे. त्यामुळे जिओभारत फोनचा वापर करणाऱ्याची वर्षाला १,५०० रुपयांची बचत होणार आहे.
जिओ भारत फोन सुमारे वर्षभरापूर्वी लाँच केला होता, हा जगातील सर्वात स्वस्त 4G फोन मानला जात आहे,त्याची किंमत केवळ ६९९ रुपये आहे. या नवीन योजनेआधारे कोणताही व्यापारी आता हा नवीन फोन विकत घेऊन सहा महिन्यात त्याची संपूर्ण किंमत वसुल करु शकणार आहे. भारताच्या प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिओने जिओ साऊंडपेवर ही सुविधा आणि वंदे मातरमची धुन ऐकायला मिळणार आहे.
जिओ प्रत्येक भारतीयाला सशक्त बनविण्यासाठी आणि त्याला तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी सज्ज आहे. जिओ भारत फोनवर मोफत जिओ साऊंडपे सुविधा आणि वंदे भारतच्या धुन मिळणार असल्याचे जिओचे अध्यक्ष सुनील दत्त यांनी म्हटले आहे.