Fujifilm Instax Mini 41 कॅमेरा भारतात लाँच, किंमत, फीचर्स जाणून घ्या
Fujifilm Instax Mini 41 भारतात लाँच करण्यात आला आहे. हा इन्स्टंट कॅमेरा आहे, जो ऑन द स्पॉट फोटो प्रिंट करण्यास सक्षम आहे. याची किंमत आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील येथे जाणून घ्या.

तुम्हाला कॅमेरा खरेदी करायचा आहे का, असं असेल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला कॅमेऱ्याचा एक खास पर्याय सांगणार आहोत. Fujifilm Instax Mini 41 या कॅमेऱ्यात तुम्हाला अपेक्षित असलेल्या अनेक गोष्टी असू शकतात, चला तर मग जाणून घेऊया.
Fujifilm Instax Mini 41 भारतात लाँच करण्यात आला आहे. हा नवीन इन्स्टंट कॅमेरा आहे, जो जुन्या मॉडेलच्या तुलनेत अनेक अपग्रेडसह आला आहे. Fujifilm Instax Mini 41 या कॅमेऱ्याबाबत कंपनीचा दावा आहे की, तो 90 सेकंदात ऑन द स्पॉट फोटो प्रिंटिंग पुरवतो.
यासोबत कंपनीने 60 एमएमचा लेन्स दिला आहे. हा कॅमेरा क्लोजअप मोडमध्ये फोटो काढण्यासही सक्षम आहे. यात ऑटोमॅटिक लाइट अॅडजस्टमेंट फीचरही देण्यात आले आहे. याची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सशी संबंधित सर्व तपशील जाणून घेऊया.
Fujifilm Instax Mini 41 ची भारतात किंमत
कंपनीने Fujifilm Instax Mini 41 लाँच केला असून त्याची किंमत 13,999 रुपये आहे. हा फोन सिंगल ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येतो. हा कॅमेरा तुम्ही इन्स्टॅक्स इंडियाच्या वेबसाईट आणि ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करू शकता. आता हा कॅमेरा तुम्ही 10,499 रुपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता.
Fujifilm Instax Mini 41 स्पेसिफिकेशन्स
- 60mm F /12.7 लेन्स
- 0.37x T व्ह्यूफाइंडर
- क्लोज-अप मोड
- स्वयंचलित प्रकाश कस्टमायजेशन
- 62x46MM आकार फोटो
- दोन एए बॅटरी
Fujifilm Instax Mini 41 क्लासिक कॅमेरा डिझाइनसह येतो. आम्ही म्हटल्याप्रमाणे, हा कंपनीचा ऑन-द-स्पॉट फोटो प्रिंटिंग कॅमेरा आहे, ज्यासह मिनी इन्स्टंट फिल्म येते. आपल्याला ते स्वतंत्रपणे खरेदी करावे लागेल. यात 60mm F/12.7 लेन्स आणि 0.37 एक्स व्ह्यूफाइंडर आहे.
कंपनीने या कॅमेरामध्ये क्लोज-अप मोड दिला आहे. शिवाय यात ऑटोमॅटिक लाइट अॅडजस्टमेंट फीचरही देण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमातून लो लाइट, इनडोअर लाइट आणि कॅमेऱ्यातून काढलेले क्लोजअप आणि सेल्फी अप्रतिम आहेत.
हा कॅमेरा 62×46 मिमी आकाराच्या डिफॉल्ट प्रतिमा तयार करतो. फुजीफिल्म इन्स्टॅक्स मिनी 41 कॅमेरा 5 मिनिटांच्या निष्क्रियतेनंतर आपोआप बंद होतो. त्यासाठी दोन बॅटरी लागतात. याची लांबी 104.5 बाय 122.5 बाय 67.5 मिमी असून वजन 345 ग्रॅम आहे. जर तुम्हाला झटपट फोटो काढायला आवडत असतील तर हा कॅमेरा तुमच्यासाठी आहे.
