19 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात, ‘या’ Poco स्मार्टफोनवर शानदार डिस्काऊंट

या डीलअंतर्गत तुम्ही पोको एक्स 3 प्रो हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला हा फोन 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

19 हजारांचा स्मार्टफोन 11 हजारात, 'या' Poco स्मार्टफोनवर शानदार डिस्काऊंट
Poco X3 Pro

मुंबई : पोकोने (Poco) गेल्या महिन्यात आपला लेटेस्ट स्मार्टफोन पोको एक्स 3 प्रो (Poco X3 Pro) भारतात लॉन्च केला होता. कंपनीने हा फोन 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. परंतु आता कंपनीने पोकोच्या ग्राहकांसाठी उत्तम ऑफर सादर केली आहे. ही ऑफर त्या पोको ग्राहकांसाठी आहे, ज्यांना त्यांचं डिव्हाईस अपग्रेड करायचं आहे. अशा ग्राहकांना कंपनीने Poco X3 Pro च्या खरेदीवर 7000 रुपयांचा डिस्काऊंट देऊ केला आहे. (Get Rs 7,000 buyback discount on Poco X3 Pro)

ही ऑफर अशा पोको एफ 1 ग्राहकांसाठी आहे ज्यांना त्यांचे फोन अपग्रेड करायचे आहेत. याचा अर्थ असा की हे युजर्स त्यांचा फोन एक्सचेंज करू शकतात आणि पोको एक्स 3 प्रो वर सूट मिळवू शकतात. याशिवाय पोको त्यांच्या ग्राहकांना 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट देत आहे. ही ऑफर ICICI बँक क्रेडिट कार्डधारकांसाठी आहे.

शानदार ऑफर

या डीलअंतर्गत तुम्ही पोको एक्स 3 प्रो हा स्मार्टफोन खरेदी करत असाल तर तुम्हाला हा फोन 10,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या किंमतीत तुम्हाला 6 जीबी आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस व्हेरिएंट मिळेल. तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 12,999 रुपये मोजावे लागतील. या फोनची मूळ किंमत 20,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट वरून ऑफरचा लाभ घेता येईल. पोको एक्स 3 प्रो 6 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

स्पेसिफिकेशन्स

पोको X3 प्रो या स्मार्टफोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 6.67 इंचाचा डिस्प्ले दिला आहे जो फुल एचडी + डिस्प्लेसह येईल. हा फोन 120 हर्ट्ज रीफ्रेश रेट, 240 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 प्रोटेक्शनसह येईल. जर आपण याच्या कॅमेर्‍याबद्दल चर्चा केली तर फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर आहे. पोको एक्स 3 प्रो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसरसह येणारा कंपनीचा पहिला स्मार्टफोन आहे.

फीचर्स

सेल्फीसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. या फोनच्या इतर फीचर्सविषयी बोलायचे झाल्यास या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 860 प्रोसेसर देण्यात येईल. हा फोन 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह सादर होईल. फोनची बॅटरी 5160mAh असेल. त्याच वेळी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. या फोनमध्ये साइड माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर, अँड्रॉइड 11, ब्लूटूथ 5.0 आणि एनएफसी असेल.

किंमत

पोको एक्स 3 प्रो च्या 6 जीबी आणि 128 जीबी इंटर्नल स्टोरेज स्पेस व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर डिस्काऊंट ऑफरशिवाय 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसाठी तुम्हाला 20,9999 (मूळ किंमत) रुपये मोजावे लागतील. पोको एक्स 3 प्रो 6 एप्रिलपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.

इतर बातम्या

भारतात OnePlus 9 Pro ची विक्री सुरु, कंपनीकडून शानदार ऑफर

12GB/512GB, 5G कनेक्टिव्हिटीसह Mi 11 सिरीज बाजारात, जाणून घ्या किंमती आणि फीचर्स

OnePlus 9 ला टक्कर देणाऱ्या Vivo X60 Pro मध्ये काय आहे खास?

(Get Rs 7,000 buyback discount on Poco X3 Pro)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI