AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑगस्टमध्ये Google Pixel 10 सिरीज होणार लाँच, जाणून घ्या तारीख आणि फिचर्स

गुगलने Google Pixel 10 Series लाँच करण्याची घोषणा केली आहे. तर यावेळी मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये गुगल पिक्सेल वॉच 4 आणि गुगल पिक्सेल बड्स 2ए सोबत पिक्सेल सिरीजचे नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण लाँचिंगची तारीख जाणून घेऊयात...

ऑगस्टमध्ये Google Pixel 10 सिरीज होणार लाँच, जाणून घ्या तारीख आणि फिचर्स
ऑगस्टमध्ये Google Pixel 10 सिरीज होणार लाँच, त्यासोबत 'हे' डिव्हाइसेस घेतील एंट्र्रीImage Credit source: गूगल/x
| Edited By: | Updated on: Jul 19, 2025 | 7:34 PM
Share

गुगलने अखेर पिक्सेल 10 सिरीज लाँच करण्याची घोषणा केली आहे. गुगल त्यांच्या वार्षिक लाँच इव्हेंट मेड बाय गुगलमध्ये पिक्सेल सिरीजच्या नवीन स्मार्टफोनसह गुगल पिक्सेल वॉच ४ आणि गुगल पिक्सेल बड्स 2ए देखील लाँच करणार आहे. गुगलचा हा कार्यक्रम 20 ऑगस्ट रोजी होणार आहे. पिक्सेल 10 सिरीजमध्ये यावेळीही कंपनी चार स्मार्टफोन लाँच करणार आहे. ज्यामध्ये पिक्सेल 10 पिक्सेल 10 प्रो, पिक्सेल 10 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 10प्रो फोल्ड हे आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण या इव्हेंट आणि आगामी डिव्हाइसबद्दल जाणून घेणार आहोत.

Made by Google 2025 कधी आणि कुठे होणार?

गुगलने कन्फर्म केलं आहे की Pixel 10 सिरीज 20 ऑगस्ट रोजी गुगलच्या इव्हेंटमध्ये लाँच केले जाणार आहे. हा कार्यक्रम न्यू यॉर्क शहरातील भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता सुरू होईल. हा कार्यक्रम गुगलच्या अधिकृत वेबसाइट तसेच यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाईव्ह पाहता येईल.

Pixel 10 सिरीजमध्ये काय खास असेल?

तर या इव्हेंटमध्ये सर्वांचे लक्ष गुगल Pixel 10 सिरीजवर असणार आहे. दरवेळीप्रमाणे यंदाही गुगल अनेक मॉडेल्स लाँच करणार आहे. यावेळी गुगलचे लक्ष डिझाइनपेक्षा हार्डवेअर अपग्रेडवर असेल. Pixel 10 ही सिरीज नवीनतम Tensor G5 या चिपसह लाँच केली जाऊ शकते. ही चिप पूर्वीपेक्षा अधिक पॉवर एफिशिएंट असेल आणि हीट मॅनेजमेंटच्या बाबतीत चांगली असेल.

Google Pixel 10 सिरीजचे स्मार्टफोन कंपनीच्या नवीनतम अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 16 सह लाँच केले जातील. यासोबतच कंपनी जनरेटिव्ह एआय फीचर्ससह हा फोन लाँच करणार आहे.

Google Pixel Watch 4 मधील संभाव्य फिचर्स

कंपनी पिक्सेल सीरीज स्मार्टफोन्ससोबत नवीन वेअरेबल डिव्हाइसेस देखील लाँच करणार आहे. कंपनी Google Pixel Watch 4 ला दोन वेगवेगळ्या साईजमध्ये लाँच करणार आहे. पिक्सेल वॉच ४ च्या अपग्रेडबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी त्याची बॅटरी लाईफ आणि फिटनेस ट्रॅकिंग क्षमता सुधारेल.

Google Pixel Buds 2a ची संभाव्य फिचर्स

Google Pixel Buds 2a देखील 20 ऑगस्ट रोजी लॉन्च होऊ शकतो. कंपनीच्या सध्याच्या प्रीमियम वायरलेस इअरबड्सचा हा एक बजेट पर्याय असेल. गुगल यावेळी त्यांच्या चार्जिंग अॅक्सेसरीज रिफ्रेश करू शकते. यासोबतच, त्यात एआय फीचर्स देखील मिळू शकतात.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.