AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google Pixel 9a या दिवशी घेणार एन्ट्री, लाँच होण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स व किंमत

Google Pixel 9A स्मार्टफोनची वाट पाहणाऱ्यांना आंनदाची बातमी आहे. कारण हा फोन कसा असेल याबाबत अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या स्मार्टफोन प्रेमींना या फोनच्या फिचर्स बद्दल सांगणार आहोत. त्यानंतर या माहितीने तुमच्या शंकेचे निरसरण होणार आहे.

Google Pixel 9a या दिवशी घेणार एन्ट्री, लाँच होण्यापूर्वी जाणून घ्या फिचर्स व किंमत
Google Pixel 9a
| Edited By: | Updated on: Feb 12, 2025 | 2:43 PM
Share

Google कंपनी त्यांच्या जवळपास सर्व स्मार्टफोन सीरिजसह A सीरीजचे स्मार्टफोन्सना देखील प्रवेश देणार आहे. अनेक दिवसांपासून Google Pixel 9a या स्मार्टफोनबद्दल अनेक अफवा पसरल्या जात होत्या. मात्र आता गूगल लवकरच त्यांचा Pixel 9a भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्ही देखील Google Pixel या फोनचे प्रेमी असाल आणि त्याची वाट पाहत असाल तर तुम्ही हा फोन लवकरच खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन भारतात मार्चमध्ये लाँच होऊ शकतो. आगामी स्मार्टफोनमध्ये तुम्हाला अनेक फीचर्स मिळतील. चला तर मग जाणून घेऊयात या फोनचा कॅमेरा, किंमत आणि इतर फीचर्स बद्दल…

Google Pixel 9a कधी लाँच होईल?

Google Pixel 9a हे आधीच बाजारात उपलब्ध असलेल्या Google Pixel 8a ची अपग्रेड केलेली आवृत्ती असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रिपोर्ट्सनुसार, Google Pixel 9a हा स्मार्टफोन 19 मार्च रोजी भारतासह जागतिक बाजारात लाँच केला जाऊ शकतो. आगामी स्मार्टफोन हा Google Tensor G4 चिपसेटने सुसज्ज असू शकतो.

हा फ्लॅगशिप स्मार्टफोन युरोप, अमेरिका आणि भारतात लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनच्या विक्रीबद्दल बोलायचे झाले तर, 26 मार्चपासून जागतिक बाजारपेठेत त्याची विक्री सुरू केली जाऊ शकते. जर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅगशिप स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. हा फोन लवकरच तुम्हाला खरेदी करता येणार आहे.

Google Pixel 9a अपेक्षित किंमत

Google Pixel 9a या स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, 128GB स्टोरेज पर्यायासह त्याच्या अपेक्षित बेस व्हेरिएंटची किंमत 52,999 रुपये असू शकते. तसेच या फोनच्या 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 64,000 रुपये असू शकते. या सर्व किंमती सध्या अपेक्षित आहेत. कंपनीने त्याची अधिकृत किंमत जाहीर केलेली नाही.

Google Pixel 9A मधील फिचर्स

तुम्हाला Google Pixel 9a मध्ये 6.3 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. जो 120Hz चा रिफ्रेश रेट देणार आहे. तसेच चांगल्या परफॉर्मन्ससाठी स्मार्टफोन Google Tensor G4 चिपसेटसह येऊ शकतो. हा स्मार्टफोन 8GB रॅम, 128GB आणि 256GB स्टोरेज वेरिएंटसह बाजारात येऊ शकतो.

या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला फोटोग्राफी व्हिडिओसाठी ड्युअल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये प्राइमरी कॅमेरा 48+13 मेगापिक्सेल असू शकतो. स्मार्टफोनमध्ये 51000mAh ची पॉवरफुल बॅटरी मिळू शकते. हा फोम जलद चार्जिंग पर्यायासह येऊ शकतो.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.