AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gmail वरून तुम्हीही Zoho Mail मध्ये अकाउंट स्विच करताय? तर त्याआधी जाणून घ्या तुम्हाला किती GB स्टोरेज मिळेल मोफत

तुमचे जीमेल स्टोरेज भरले आहे म्हणून तुम्ही झोहो मेलवर अकाउंट स्विच करण्याचा विचार करत आहात का? तर आजच्या लेखात आपण झोहो स्टोरेज बरोबरच तर मोफत जीमेल अकाउंटमध्ये तुम्हाला किती जीबी स्टोरेज मिळेल हे जाणून घेऊयात...

Gmail वरून तुम्हीही Zoho Mail मध्ये अकाउंट स्विच करताय? तर त्याआधी जाणून घ्या तुम्हाला किती GB स्टोरेज मिळेल मोफत
zoho mail
| Edited By: | Updated on: Oct 11, 2025 | 9:44 PM
Share

आजच्या या आधुनिक युगात आपल्या प्रत्येकांचे जीमेल अकाउंट आहे. तर अनेक वापरकर्ते जीमेल स्टोरेज भरल्याने अनेकदा आपल्याला गुगल वन सबस्क्रिप्शनद्वारे पैसे भरून स्टोरेज वाढवता येते. पण प्रत्येकजण सबस्क्रिप्शन भरत नाही त्यामुळे जीमेल स्टोरेज सतत भरते. जर तुम्हालाही ही समस्या येत असेल आणि तुम्ही आता स्वदेशी ईमेल प्लॅटफॉर्म झोहो मेलवर तुमचं अकाउंट स्विच करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला प्रथम दोन्ही प्लॅटफॉर्मवर किती जीबी स्टोरेज दिले जाते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. आजच्या लेखात आपण झोहोच्या मोफत स्टोरेजबद्दल जाणून घेण्यासोबतच मोफत जीमेल अकाउंट तुम्हाला किती जीबी स्टोरेज देते ते ही जाणून घेणार आहोत.

झोहो मेल स्टोरेज मर्यादा

Zoho.com वरील माहितीनुसार कंपनी वापरकर्त्यांना मोफत अकाउंट तयार केल्यावर 5GB स्टोरेज प्रदान करते. स्टोरेज वाढवण्यासाठी, तुम्ही कंपनीच्या पेड प्लॅनमधून निवड करू शकता.

जर 5G पुरेसे नसेल, तर तुम्ही 10 GB, 30 GB, 50 GB आणि 100 GB च्या पेड प्लॅनमधून कोणताही प्लॅन निवडू शकता, परंतु तुम्हाला स्टोरेज अपग्रेड करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील.

X वरील एका वापरकर्त्याने कंपनीला सल्ला दिला आहे की जर कंपनीने 5 जीबी स्टोरेज 15 जीबी पर्यंत वाढवले ​​तर सर्व जीमेल वापरकर्ते झपाट्याने झोहोकडे वळतील.

जीमेल स्टोरेज मर्यादा

दुसरीकडे वापरकर्त्यांना Gmail अकाउंट तयार केल्यावर 15 GB स्टोरेज दिले जाते. जीमेल झोहो मेल पेक्षा जास्त मोफत स्टोरेज देते. पण हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की जीमेलचे स्टोरेज हे शेअर्ड स्टोरेज आहे. याचा अर्थ असा की 15 GB स्टोरेज हे फक्त Gmail साठी नाही; तर ते Google Photos आणि Google Drive सोबत देखील शेअर केला जातो. म्हणूनच जेव्हा हे सर्व एकाच अकाउंटशी जोडलेले असतात, तेव्हा 15 GB खूप लवकर भरू शकते. Gmail साठी वेगळी स्टोरेज मर्यादा नाही. त्यामुळे सतत जीमेल स्टोरेज फुल होते, पण तुम्ही सबस्क्रिप्शन च्या मदतीने स्टोरेज वाढवता येते.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.