AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aadhaar News : जर आपल्या मुलाचे वय 5 वर्ष आणि 15 वर्ष असेल तर आधारमध्ये करा हे अपडेट

ज्या मुलांचे आधार कार्ड 5 वर्षापूर्वी बनलेले आहे त्यांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते. म्हणून, अशा लहान मुलांच्या नावनोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. (If your child is 5 and 15 years old, do this update in Aadhaar)

Aadhaar News : जर आपल्या मुलाचे वय 5 वर्ष आणि 15 वर्ष असेल तर आधारमध्ये करा हे अपडेट
आधार कार्डवरील पत्ता किंवा जन्मतारीख चुकीची आहे? या कागदपत्रांद्वारे करा अपडेट
| Updated on: Apr 15, 2021 | 4:20 PM
Share

Mandatory Biometric Update of Child Aadhaar नवी दिल्ली : आधार कार्ड आता आपल्यासाठी उपयुक्त कागदपत्र बनले आहे. आधार जारी करणारी संस्था ‘युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया’ (UIDAI) देखील नवजात मुलांसाठी आधार कार्ड जारी करते. परंतु, येथे आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की जर 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलासाठी आधार कार्ड बनविले गेले तर त्यात दोनदा बायोमेट्रिक बदल करावे लागतील. हे अपडेट वयाच्या 5 व्या वर्षी आणि दुसरे 15 व्या वर्षी केले जावे. हे अपडेट करणे अनिवार्य आहे. (If your child is 5 and 15 years old, do this update in Aadhaar)

आधार सेवा केंद्रात बनवू शकता आधार कार्ड

युआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, पालक कोणत्याही सेवा केंद्राला भेट देऊन मुलाचा जन्माचा दाखला म्हणजेच जन्म प्रमाणपत्र किंवा डिस्चार्ज कार्ड / हॉस्पिटलद्वारे जारी केलेल्या स्लिपद्वारे आधार कार्ड बनवू शकतात.

पाचव्या आणि पंधराव्या वर्षी करा बदल

युआयडीएआयच्या मते, जेव्हा आपले मूल 5 वर्षांचे असेल तेव्हा त्याचे बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे, मूल 15 वर्षांचे असताना देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. वास्तविक, ज्या मुलांचे आधार कार्ड 5 वर्षापूर्वी बनलेले आहे त्यांचे बायोमेट्रिक्स म्हणजेच फिंगरप्रिंट्स आणि डोळ्यांची बाहुली विकसित झालेली नसते. म्हणून, अशा लहान मुलांच्या नावनोंदणी दरम्यान त्यांचे बायोमेट्रिक तपशील घेतले जात नाहीत. म्हणूनच, युआयडीएआयने 5 वर्षानंतर हे अपडेट करणे बंधनकारक केले आहे. त्याचप्रमाणे जेव्हा मूल पौगंडावस्थेत प्रवेश करते तेव्हा त्याच्या बायोमेट्रिक पॅरामीटर्समध्ये बदल केले जातात. म्हणूनच, युआयडीएआयने पुन्हा वयाच्या 15 व्या वर्षी बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे आवश्यक केले आहे.

किती खर्च येईल?

युआयडीएआयच्या मते मुलाच्या आधारमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करणे पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्हाला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. तसेच, जेव्हा जेव्हा आपण तपशील अपडेटसाठी जाता तेव्हा आपल्याला कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज प्रदान करणे आवश्यक नसते. पालक जवळच्या आधार केंद्रावर जाऊन त्यांच्या मुलाच्या आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक तपशील अपडेट करु शकतात. आपण आपल्या जवळच्या आधार केंद्राची माहिती युआयडीएआय वेबसाइटवरुन मिळवू शकता. (If your child is 5 and 15 years old, do this update in Aadhaar)

इतर बातम्या

Delhi weekend curfew : अरविंद केजरीवाल ना ना करते हां कर बैठे, दिल्लीत वीकेंड कर्फ्यू लागू!

SBI Health Policy | ग्राहकांसाठी एसबीआयची कोरोना हेल्थ पॉलिसी, 156 रुपयांत होणार पूर्ण उपचार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.