फेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री

सणासुदीच्या मुहुर्तावर अनेक ई-कॉमर्स साईटवर सातत्याने सेल सुरु आहेत. या सेलमुळे देशात लाखो लोकांनी मोबाईल खरेदी केले.

फेस्टिव्ह सेलमध्ये रेकॉर्डब्रेक शॉपिंग, एका मिनिटात 1.5 कोटींच्या मोबाईल्सची विक्री
अक्षय चोरगे

|

Oct 28, 2020 | 7:54 AM

मुंबई : सणासुदीच्या मुहुर्तावर अनेक ई-कॉमर्स साईटवर सातत्याने सेल सुरु आहेत. या सेलमुळे देशात लाखो लोकांनी मोबाईल खरेदी केले. यावेळी मोबाईल विक्रीचे अनेक मोठे रेकॉर्ड बनले आहेत. (India festive sale 2020 flipkart and amazon sold over rs 1.5 crore worth smartphone)

गेल्या काही दिवसांमध्ये अनेक मोबाईल कंपन्यांनी किफायतशीर स्मार्टफोन लाँच केले आहेत, त्यासोबतच अनेक नवनव्या फिचर्स आणि अपडेटसह काही महागडे स्मार्टफोनदेखील लाँच करण्यात आले आहेत. त्यातच सणासुदीचा मुहूर्त साधून अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी या मोबाईल्सवर मोठमोठ्या डिस्काऊंट ऑफर्स दिल्या. परिणामी देशात स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे.

बंगळुरूस्थित मार्केट रिसर्च कंपनी रेडसीरने दिलेल्या माहितीनुसार फेस्टिव्ह सेल वीकमध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर प्रत्येकी एका मिनिटाला तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या मोबाईलची विक्री झाली आहे. रेडसीर कन्सल्टिंगचे संचालक मृगांक गुटगुटिया म्हणाले की, अनेक बाबतींमध्ये ही भारतीय ई-कामर्स साठी एक #festivaloffirsts आहे. जी त्यांच्या भविष्यासाठी भक्कम पायाभरणी करेल.

गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील फॅशन कॅटेगरीमध्ये फार चांगली विक्री झालेली नाही. फॅशन कॅटेगरीमध्ये केवळ 14 टक्के विक्री झाली आहे. होम फर्निशिंग कॅटेगरीमध्ये चांगली विक्री झाली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वर्क-फ्रॉम-होम आणि स्टडी-फ्रॉम-होम साठी अधिक शॉपिंग केली गेली.

फोनच्या बाबतीत दरवर्षीप्रमाणे विक्रीत वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने एमआय इंडियाने मोठा व्यवसाय केला आहे. एमआय इंडियाने यापूर्वीच सांगितले आहे की, एका आठवड्यात त्यांनी तब्बल 50 लाख मोबाईल विकले आहेत. त्यासोबतच चिनी स्मार्टफोन ब्रॅण्ड पोकोने तब्बल 10 लाख स्मार्टफोन्सची विक्री केली आहे.

फ्लिपकार्टने याबाबत म्हटले आहे की, स्मार्टफोनच्या बाबतीत दुप्पट व्यवसाय झाला आहे. स्मार्टफोनच्या प्रिमियम सेगमेंटमध्ये तब्बल 3.2 पट वृद्धी झाली आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने अॅपल, गुगल आणि सॅमसंग या कंपन्यांचा समावेश आहे.

काही ई-कॉमर्स कंपन्यांचे सेल नुकतेच संपले आहेत, परंतु दिवाळीनिमित्त पुन्हा एकदा या सेलचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्मार्टफोन्सची मोठ्या प्रमाणात विक्री होणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित बातम्या

दिवाळीसाठी शॉपिंग लिस्ट तयार करा, फ्लिपकार्टचा नवा सेल येतोय

अँड्रॉईड युजर्सना Whatsapp मध्ये फेस अनलॉक फिचर मिळणार!

मोबाइल डेटा स्पीडच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि नेपाळच्याही मागे

भारतीयांना Boycott China चा विसर, एका आठवड्यात Xiaomi च्या 50 लाख स्मार्टफोन्सची रेकॉर्डब्रेक विक्री

(India festive sale 2020 flipkart and amazon sold over rs 1.5 crore worth smartphone)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें