IndiaAI मिशनमध्ये भारताची मोठी भरारी, 34,000 पेक्षा अधिक GPU पार
भारताची राष्ट्रीय संगणक क्षमता आता 34,000 GPU पेक्षा जास्त झाली आहे. IndiaAI मोहिमेने स्वदेशी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता वाढविण्यासाठी तीन नवीन स्टार्टअप्स निवडली आहेत. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मोहिमेचा उद्देश भारतात एक व्यापक AI परिसंस्था निर्माण करणे असल्याचे सांगितले. हे तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे, ज्यामुळे भारतातील स्टार्टअप्सना जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यास मदत होईल.

भारताची राष्ट्रीय कंप्यूटिंग क्षमता 34000 GPUच्या पार गेली आहे. त्यासोबतच भारताच्या स्वत:च्या फाउंडेशन मॉडल निर्मितीसाठी तीन नवीन स्टार्टअप निवडून IndiaAI मिशनने स्वदेशी AI क्षमता मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाची झेप घेतली आहे. केंद्रीय सूचना प्राद्योगिक मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत आयोजित इंडिया एआय- मेक एआय इन इंडिया, मेक एआय वर्क फॉर इंडिया कार्यक्रमात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. भारताच्या AI कार्यक्रमांना प्रोत्साहन देणं हा यामागचा हेतू होता.
IndiaAI मिशनच्या अंतर्गत निवडलेल्या टीमला आपल्या आपल्या क्षेत्रात आघाडीच्या पाच वैश्विक स्थानामध्ये स्थान प्राप्त करण्याचं लक्ष्य ठेवण्याचं आवाहनही अश्विनी वैष्णव यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाच्या दृष्टीकोनावर अश्विनी वैष्णव यांनी भर दिला. ते म्हणाले की, तंत्रज्ञान काही मोजक्या लोकांच्या हातात राहू नये. समाजातील मोठ्या वर्गाला तंत्रज्ञानापर्यंत पोहोच मिळावी, नव्या उपाययोजना विकसित करता याव्यात, आणि उत्तम संधी मिळाव्यात, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. हीच ती तत्त्वज्ञान आहे ज्याच्या आधारावर इंडियाएआय (IndiaAI) मिशन तयार करण्यात आले आहे. आम्ही प्रत्यक्षात एआय मिशनच्या प्रत्येक स्तंभावर महत्त्वपूर्ण प्रगती करत आहोत. ‘कॉमन कंप्यूट’ ही तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाची एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे.
एआय इकोसिस्टम उभारणीचा उद्देश
एआय फंडामध्ये 367 डेटासेट आधीच अपलोड करण्यात आले आहेत. त्यांनी रिव्हर्स ब्रेन ड्रेनला चालना देण्याबाबत, बेस मॉडेल्स, संगणन क्षमतेचा विकास, सुरक्षा मानके आणि कौशल्यविकास यांच्यासह एक व्यापक इकोसिस्टम निर्माण करण्यासाठी इंडियाएआय मिशनच्या भूमिकेवर भर दिला. त्यांनी यावरही भर दिला की, या सर्व प्रयत्नांचा उद्देश भारतात एक संपूर्ण आणि सर्वसमावेशक एआय इकोसिस्टम तयार करणे हा आहे, असं वैष्णव म्हणाले.
भारताचं एआय इकोसिस्टिम आघाडीवर
इंडियाएआय फाऊंडेशन पिलरचं मुख्य उद्दिष्ट इंडिया स्पेसिफिक डेटावर ट्रेंड स्वदेशी फाऊंडेशन मॉडल विकसित करणं आणि त्याला लागू करणं आहे. भारताचा एआय इकोसिस्टिम आता वैश्विक यशाच्या शिखरावर आहे. अशा तऱ्हेच्या पावलांमुळे आपण आपल्या सर्वोत्तम स्टार्टअप्सना आंतरराष्ट्रीय बाजारात प्रवेश करण्यासाठी, जागतिक भागीदारी निर्माण करण्यासाठी आणि स्केलेबल व प्रभावी उपाययोजना तयार करण्याच्या दिशेने पुढे नेत आहोत. स्टेशन एफ आणि एचईसी पॅरिस यांच्यासोबत इंडियाएआय (IndiaAI) मिशनची भागीदारी ही भारताच्या नावीन्यपूर्ण राजनय (Innovation Diplomacy) मध्ये एक नवा अध्याय आहे, असंही त्यांनी सांगितलं.
