भारतीयांची क्रिप्टोमध्ये 10 टक्के गुंतवणूक; सर्वाधिक पसंती बिटकॉइनला

गेल्या 6 महिन्यांत क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विशेष वाढ झाली असून आपल्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओच्या 10 टक्के क्रिप्टोमध्ये करण्याकडे भारतीयांचा कल असल्याचे वझीरएक्स या क्रिप्टो एक्स्चेंजद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

भारतीयांची क्रिप्टोमध्ये 10 टक्के गुंतवणूक; सर्वाधिक पसंती बिटकॉइनला
Crypto
Follow us
| Updated on: Dec 19, 2021 | 10:54 PM

मुंबई : या वर्षात गुगलवर स्टॉक कसे खरेदी करायचे यापेक्षा बिटकॉइन कसे विकत घ्यावे याबाबत सर्वाधिक सर्च करण्यात आलं. गेल्या 6 महिन्यांत क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांच्या संख्येत विशेष वाढ झाली असून आपल्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओच्या 10 टक्के क्रिप्टोमध्ये करण्याकडे भारतीयांचा कल असल्याचे वझीरएक्स या क्रिप्टो एक्स्चेंजद्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. (Indians invest 10 per cent in crypto; Bitcoin preferred by Most says wazirx survey)

भारतातील गुंतवणूकदारांचा क्रिप्टोमधील गुंतवणुकीकडे वाढता कल आणि याचा त्यांच्या जीवनावर होणार परिणाम जाणून घेण्याच्या उद्देशाने वझीरएक्सने ‘हायलाइट्स अँड ऑब्झर्वेशन्स फ्रॉम 2021 – दि इयर ऑफ क्रिप्टो’ हा आपला अहवाल सादर केला आहे. हे सर्वेक्षण 85 लाख वझीरएक्स युजर्सदरम्यान करण्यात आले.

वझीरएक्सची 1735 टक्के वाढ

वझीरएक्सने 2021 मध्ये 43 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त इतक्या मोठ्या रेकॉर्ड ट्रेडिंगचा अनुभव घेतला असून 2020 च्या तुलनेत त्यांनी 1735 टक्के वाढ अनुभवली आहे. वझीरएक्सवर असलेल्या एकूण गुंतवणूकदारांपैकी 51 टक्के सर्वेक्षण प्रतिसादकांनी क्रिप्टोवर आधारित शिफारशी मित्र आणि कुटुंबातील सदस्यांकडून आल्याचे सांगितले. तर 57 टक्के गुंतवणूकदार हे मागील 6 महिन्यांत जोडले गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. वझीरएक्सवर सर्वाधिक ट्रेड केलेले क्रिप्टो म्हणून बिटकॉइन (बीटीसी) अव्वल स्थानी राहिले असून यानंतर टेथर (यूएसडीटी), शिबा इनू (शिब), डोजेकॉइन (डोज), वझीरएक्स टोकन (डब्ल्यूआरएक्स) आणि मॅटिक (मॅटिक) या एक्स्चेंजवर सर्वाधिक व्यापार झालेल्या क्रिप्टोंपैकी आहेत.

क्रिप्टो क्षेत्रात करियर

44 टक्के प्रतिसादकांनी (Respondent) सांगितले की, त्यांच्या एकूण गुंतवणूक पोर्टफोलिओत क्रिप्टोचे स्थान 10 टक्के आहे. महिलांनी बिटकॉइनमध्ये तर पुरूषांनी शिबा इनूमध्ये जास्त व्यवहार केले आहेत. 54 टक्के प्रतिसादकांनी सांगितले की, त्यांना क्रिप्टो क्षेत्रात करियर करायला आवडेल, त्यातील उद्योजकता, वित्तपुरवठा आणि बिझनेस डेव्हलपमेंट हे प्रमुख करियरचे पर्याय असतील. 82 टक्के वझीरएक्स युजर्सना क्रिप्टो गुंतवणुकीवर नफा मिळाला आहे.

लहान शहरांमधील युजर्सच्या संख्येत लक्षणीय वाढ

क्रिप्टोमधील व्यापार आणि गुंतवणुकीत लोकसांख्यिक बदलही झाल्याचे दिसले आहे कारण वझीरएक्सचे 66 टक्के युजर्स 35 वर्षे वयाखालील आहेत. नवीन महिला वापरकर्त्यांच्या संख्येतील वाढ 1009 टक्क्यांनी झाली, जी पुरूषांच्या मेल साइनअपमध्ये 829 टक्के वाढ होती. वय आणि लिंगाखेरीज क्रिप्टोमध्ये महानगरे आणि टायर-1 शहरांपलीकडील लोकांचा सहभागही झाल्याचे दिसले. गुवाहाटी, कर्नाल, बरैली अशा लहान शहरांमधून सहभागींच्या संख्येत 700 टक्के वाढ झाली आणि त्यामुळे ग्रामीण व निमशहरी भागांमधील लोकांचं क्रिप्टोमध्ये स्वारस्य वाढताना दिसले.

आत्मनिर्भर भारत होण्यासाठी उपयुक्त : वझीरएक्स

वझीरएक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी निश्चल शेट्टी म्हणाले की, वझीरएक्स कायमच भारतात क्रिप्टो सर्वांसाठी उपलब्ध करण्यासाठी वचनबद्ध असून हे निष्कर्ष त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. ग्राहक बदलत आहेत आणि क्रिप्टोला एक उगवता पर्यायी मालमत्ता वर्ग म्हणून स्थान देत आहेत. सरकारचा क्रिप्टोसाठी नियामक दृष्टीकोन म्हणून भारताला क्रिप्टोमध्ये व्यवहार करणाऱ्या जगातील इतर देशांमध्ये नेऊन ठेवेल. त्याचबरोबर क्रिप्टोमधील शक्तिशाली संस्थात्मक सहभागासोबत भारतात या मालमत्ता वर्गासाठी भविष्य निर्माण करून आपल्याला आत्मनिर्भर भारत होण्यासाठी उपयुक्त ठरेल.

इतर बातम्या

रिस्क है तो इश्क है, चांगल्या परताव्यासाठी FD ला बायपास हवा, एफडीपेक्षाही अधिकची कमाई देणारे पर्याय

हा तिरपेपणा ‘डोळस’ आहे, भारतीय नोटांवर का असतात तिरप्या रेषा; काय आहे त्याचा अर्थ? 

SBI च्या ग्राहकांना गिफ्ट, एकाच अकाउंटमध्ये तीन सेवा; बचत, डिमॅट आणि ट्रेडिंग खात्याचे लाभ

(Indians invest 10 per cent in crypto; Bitcoin preferred by Most says wazirx survey)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.