दगडासारखा मजबूत! 25 हजार वेळा पडल्यावरही नाही तुटला, या बजेट फोनची मार्केटमध्ये चर्चा
Budget Smartphone : या स्मार्टफोनची सध्या बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे. हा फोन चाचणीवेळी 25 हजार वेळा पडला पण तो तुटला नाही, असा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन 7000 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध झाल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे.

भारताच्या बजेट स्मार्टफोन मार्केटमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या स्मार्टफोनचीच सध्या चर्चा सुरू आहे. हा फोन चाचणीवेळी 25 हजार वेळा पडला पण तो तुटला नाही, असा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे हा स्मार्टफोन 7000 रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध झाल्याने ग्राहकांची चांदी झाली आहे. येत्या 2 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन ग्राहकांच्या हातात असेल. कोणता आहे हा स्मार्टफोन, कोणती आहे ही कंपनी?
Infinix Smart 10
Infinix कंपनीने बाजारात एक मजबूत स्मार्टफोन आणला आहे. स्मार्ट 10 हा मजबूत फोन बाजारात आला आहे. इन्फिनिक्सने या मोबाईलची किंमत 7000 रुपयांपेक्षा कमी ठेवली आहे. त्याची किंमत 6,799 रुपये इतकी आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या मजबुतीविषयी मोठा दावा केला आहे. त्यानुसार, हा फोन चाचणीवेळी 25 हजार वेळा पडला पण तो तुटला नाही. येत्या 2 ऑगस्टपासून हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि इतर रिटेल स्टोर्सवर ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध असेल.
डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट
Infinix SMART 10 हा फोन भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेत तयार केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. 25 हजारांपेक्षा अधिक वेळ त्याची ड्रॉप टेस्ट केल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. IP64 रेटिंगसह तो डस्ट आणि वॉटर रेसिस्टेंट असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. याचे कॉम्पोझिट बॅक पॅनल स्क्रॅच रेसिस्टेंट आहे आणि 1.5 मीटरवरून पडल्यावर सुद्धा ते सुरक्षित असल्याचे दिसून आले. साईड फिंगरप्रिंट सेन्सर पण या सुरक्षिततेचा एक भाग आहे.
Infinix SMART 10 वैशिष्ट्ये काय?
Infinix SMART 10 हा फोन स्लीक ब्लॅक, टॅटिनियम सिल्व्हर, आयरीश ब्लू, ट्विलाईट गोल्ड असा रंगात उपलब्ध आहे. भारतात 4जीबी रॅम आणि 64जीबी स्मार्टफोनची किंमत 6,799 रुपये इतकी आहे. मोबाईलची स्क्रीन 6.67 एचडी, एलसीडी, तर रिफ्रेश रेट 120एचझेड असा आहे. या मोबाईलमध्ये ड्युएल स्पीकर्स आहेत. या मोबाईलमद्ये कॉल्स, म्युझिक आणि व्हिडिओ व्युईंग अनुभव चांगला आहे. यामध्ये UniSoc T7250 प्रोसेसर देण्यात आले आहे. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. या फोनचे अजून एक वैशिष्ट्ये म्हणजे त्यात Ultra Link Walkie-Talkie Mode सुद्धा देण्यात आला आहे. त्यामुळे जिथे नेटवर्क नसेल त्या भागात हा मोबाईल वॉकी-टॉकीसारखे काम करेल.
