AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या आठवड्यात लाँच होणार, Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8 सारखे जबरदस्त फोन

जूनच्या दुसऱ्या आठवड्यात Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8 सारखे अनेक नवीन स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहेत. या फोनमधील फिचर्स आणि इतर बाबी स्मार्टफोन चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत.

या आठवड्यात लाँच होणार, Infinix Smart 20, Realme P4R 5G, Tecno Pova 8 सारखे जबरदस्त फोन
Upcoming Smartphones
| Updated on: Jun 07, 2026 | 7:46 PM
Share

जूनचा दुसरा आठवडा सुरु होणार आहे. भारतीय स्मार्टफोन बाजारात या आठवड्यात अनेक स्मार्टफोन्स लाँच होणार आहेत.यात Realme, Infinix, Tecno सारख्या कंपनीचे मोबाईल फोन लाँच होणार आहेत. हे फोन बजेट रेंजमधले असून यात कमी किंमती सोबत फिचर्स देखील चांगले आहेत. चला तर पाहूयात ८ ते १५ जून दरम्यान भारतात लाँच होणारे लेटेस्ट स्मार्टफोन कोणते आहेत. ?

Infinix Smart 20

Infinix Smart 20 हो फोन सोमवारी ८ जून रोजी दुपारी १२ वाजता लाँच होणार आहे. फोनला लाँचनंतर प्री-ऑर्डर देखील केला जाऊ शकतो. Infinix Smart 20 च्या किंमतीचा खुलासा कंपनीने केला आहे. भारतात या फोनची किंमत ११,९९९ रुपयांपासून सुरु होणार आहे. या फोनला Cloudline Blue, Polaris Titanium, Shadow Black, आणि Sunlike Orange रंगात सादर केले जाणार आहे. या फोनला अधिकृत वेबसाईटशिवाय Flipkart वरुन देखील खरेदी केले जाऊ शकते.

Infinix Smart 20 Specifications

Infinix Smart 20 मध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एकदम स्लीम असून याची जाडी केवळ ७.७ एमएम इतकी आहे. फोनमध्ये MediaTek Helio G81 Ultimate चिपसेट लावण्यात आली आहे.कंपनीने या फोनसोबत 4GB रॅम, आणि 2TB एक्सपेंडेबल स्टोरेजची पेअरिंग केली आहे. फोनमध्ये ५,२००mAh ची बॅटरी असणार आहे. तसेच 15W वायर्ड फास्ट चार्जिंग, आणि 5W रीव्हर्स चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे. हा फोन सिंगल चार्जवर ३९ दिवसांचा स्टँडबाय टाईम देऊ शकतो. धुळ आणि पाण्यापासून बचावासाठी याला IP64 रेटिंग दिली आहे. या फोनमध्ये एक Ultra Link नावाचे फिचर्स असून त्यामुळे एक किमीच्या आतील Infinix स्मार्टफोन्स दरम्यान वायरलेस कम्युनिकेशन होऊ शकणार आहे.

Realme P4R 5G

Realme P4R 5G हा फोन भारतात १० जून रोजी दुपारी १२ वाजता लाँच होणार आहे. फोनला कंपनी Flipkart वर सादर करणार आहे. तसेच Realme च्या अधिकृत वेबसाईटवरुनही याची खरेदी करता येणार आहे. फोनला Lavender Glare, Silver Glare, आणि Titanium Glare रंगात खरेदी करता येणार आहे.

Realme P4R 5G Specifications

Realme P4R 5G चे हायलाईट फिचर्स याची तगडी ८००० mAh ची बॅटरी आहे. कंपनीने हा फोन तीन दिवसांपर्यंत बॅकअप देऊ शकतो असे म्हटले आहे. तसेच यात 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 चिपसेट लावण्यात आला आहे. फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट वाला फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 1200 निट्सची पिक ब्रायटनेस आहे.

फोनच्या रिअर साईडला ५० मेगापिक्सेलचा AI कॅमेरा असणार आहे. तसेच सेकेंडरी सेंसर देखील मिळणार आहे. हा आऊट ऑफ दि बॉक्स Android 16 आधारित Realme UI 7.0 वर चालेल. यास मजबूतीसाठी मिलिट्री ग्रेड सर्टीफिकेशन MIL-STD 810H मिळाले आहे. याशिवाय धुळ आणि पाण्यापासून बचावासाठी IP65 रेटिंग देखील मिळालेली आहे.

Tecno Pova 8

Tecno Pova 8 भारतात ११ जून रोजी दुपारी १२ वाजता लाँच होणार आहे. कंपनीने फोनचा टीझर जारी केला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7100 चिपसेट असल्याचे म्हटले जात आहे. तसेच 6GB रॅम असून फोन Android 16 वर चालेल. यात ४५W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. याशिवाय 3G, 4G, आणि 5G ची कनेक्टीव्हीटी देण्यात आली आहे. या फोनमध्ये Bluetooth, NFC, Wi-Fi सारखे फिचर्स आहेत.

Redmi Turbo 5

Redmi Turbo 5 हा फोन १६ जूनला लाँच होणार आहे. या फोनमध्ये दमदार MediaTek Dimensity 8500 Ultra चिपसेट आहे. तसेच २४ GB पर्यंत रॅम आहे. १२ GB फिजिकल रॅम,आणि १२ GB व्हर्च्युअल रॅमचा सपोर्ट मिळणार आहे.या फोनचा परफॉर्मेन्स आणि स्पीड चांगले असल्याचा दावा कंपनीने केला आहे.  हा सर्वात फास्ट रेडमी डिव्हाईस असणार आहे. या प्रकारच्या दाव्यांमुळे फोनच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं