6000 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला ‘हा’ दमदार स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर; जाणून घ्या फिचर्स

हाँगकाँगस्थित स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी इन्फिनिक्स (Infinix Mobile) लवकरच त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे.

6000 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला 'हा' दमदार स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर; जाणून घ्या फिचर्स
Follow us
| Updated on: Dec 14, 2020 | 6:03 PM

मुंबई : हाँगकाँगस्थित स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी इन्फिनिक्स (Infinix Mobile) लवकरच त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. कंपनी लवकरच भारतात इन्फिनिक्स स्मार्ट HD लाँच करण्याची शक्यता आहे. हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असू शकतो. दरम्यान कंपनीने हा फोन लाँच करण्यापूर्वी फ्लिपकार्टवर लिस्ट केला आहे. फ्लिपकार्ट लिस्टिंगनुसार भारतात स्मार्टफोन HD 16 डिसेंबरला दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. (Infinix to launch smartphone under Rs 6000 in India: Price specifications)

स्मार्टफोन HD ची किंमत 5,999 रुपये असेल. हा स्मार्टफोन युजर्स फ्लिपकार्टवरुन खरेदी करु शकतात. कंपनीने यापूर्वीदेखील 8 ते 11 हजार रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये किफायतशीर आणि दमदार स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. परंतु पहिल्यांदाच कंपनी 6 हजारांपेक्षा कमी किंमतीत एखादा स्मार्टफोन लाँच करत आहे. ग्राहक सध्या या फोनच्या प्रतीक्षेत आहेत. कारण खूपच कमी किंमतीत कंपनीने जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन सादर केला आहे.

इन्फिनिक्स स्मार्ट HD मध्ये 6.1 इंचांचा HD+ ड्रॉप नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर असे सांगण्यात आले आहे की, या फोनला मागच्या बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाणार आहे. तथापि फ्लिपकार्टने अद्याप या फोनच्या सर्व फिचर्सची घोषणा केलेली नाही. स्मार्टफोनमध्ये 1.2GHz चा चिपसेट दिला जात आहे. जो 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेजसह दिला जाणार आहे. स्मार्ट HD मध्ये DTS ऑडियो फिचर दिलं जाऊ शकतं. असं सांगितलं जातंय की हा फोन फेस अनलॉक फिचरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, सोबतच 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही (सेल्फी कॅमेरा) मिळेल.

लिक्समधील माहितीनुसार स्मार्ट HD अँड्रॉयड गो एडिशनवर काम करेल. हा फोन तीन कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ग्रीन, ब्लू आणि ग्रे या रंगांचा समावेश आहे. आज कंपनी Infinix अँड्रॉयड स्मार्ट टीव्ही लाँच करणार आहे. हा टीव्ही यापूर्वी फेस्टिव्ह सीझनमध्ये लाँच केला जाणार होता. परंतु काही कारणांमुळे हा टीव्ही तेव्हा लाँच करता आला नाही.

फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार हा एक एंट्री लेव्हल स्मार्ट टीव्ही आहे. या स्मार्ट टीव्हीच्या खालील बाजूस स्पीकर्स देण्यात आले आहेत. Infinix X1 स्मार्ट टीव्हीच्या 32 इंचांच्या मॉडेलची किंमत 12,000 रुपये इतकी आहे. तर 43 इंचांच्या मॉडेलची किंमत 20,000 रुपये असू शकते. या स्मार्ट टीव्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी HDMI आणि दोन USB पोर्ट देण्यात आले आहेत. यामध्ये 5.0 ब्लुटूथ कनेक्टिव्हिटी आणि सिंगल बँड वाय-फायसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

128 जीबी स्टोरेज आणि 6000mAh ची बॅटरी, किंमत अवघी 11,999, Moto चा दमदार फोन लाँच

Micromax चा ‘हा’ किफायतशीर स्मार्टफोन 10 डिसेंबरपासून विक्रीस उपलब्ध, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

नवीन Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरसह Realme, Oppo आणि Xiaomi चे स्मार्टफोन लाँचिंगच्या मार्गावर

256GB स्टोरेज आणि 64MP कॅमेरा असलेला Realme चा 5G फोन लाँचिंगच्या मार्गावर

(Infinix to launch smartphone under Rs 6000 in India: Price specifications)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.