इंस्टाग्रामकडून ‘मासिक सबस्क्रिप्शन फीचर’ची चाचणी, जाणून घ्या किती खर्च येणार?

आयओएसवर इंस्टाग्रामच्या अॅप स्टोर सूचीनुसार, Instagram एक नवीन सबस्क्रिप्शन फीचर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या फिचरद्वारे निर्माते आणि प्रभावक अर्थात क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्स पैसे कमवू शकतात.

इंस्टाग्रामकडून ‘मासिक सबस्क्रिप्शन फीचर’ची चाचणी, जाणून घ्या किती खर्च येणार?
Instagram (प्रातिनिधिक फोटो)

मुंबई : आयओएसवर इंस्टाग्रामच्या अॅप स्टोर सूचीनुसार, Instagram एक नवीन सबस्क्रिप्शन फीचर लॉन्च करण्याची तयारी करत आहे. या फिचरद्वारे निर्माते आणि प्रभावक अर्थात क्रिएटर्स आणि इन्फ्लुएंसर्स पैसे कमवू शकतात. इन्स्टाग्रामचे प्रमुख अॅडम मॉसियर (Adam Mossier) यांनी या वर्षाच्या सुरुवातीला कंपनी मेंबरशिप शोधत असल्याचे सांगितल्यानंतर हा बदल झाला आहे. (Instagram testing monthly subscriptions feature priced at 89 rupees per month)

TechCrunch मधील एका अहवालानुसार, इंस्टाग्राम अॅप स्टोअर सूचीसाठी ‘इन-अॅप शॉपिंग’ विभागात एक नवीन ‘इंस्टाग्राम मेंबरशिप’ श्रेणी पाहिली जाऊ शकते. इंस्टाग्राम सबस्क्रिप्शनची किंमत प्रति महिना 89 रुपये आहे, तरीही हे लक्षात घेण्यासारखे आहे की, ही सेवा सुरू झाल्यावर किंवा लाईव्ह झाल्यावर ही अंतिम किंमत असू शकत नाही. नवीन मेंबरशिप पर्याय इंस्टाग्राम बॅजसह पाहायला मिळाली आहे, जो वापरकर्ते लाईव्ह सेशनदरम्यान गिफ्ट क्रिएटर्सना खरेदी करू शकतात.

कशी असेल सुविधा?

इंस्टाग्राम सबस्क्रिप्शन ट्विटर ब्लू सारखे असणे अपेक्षित आहे, जिथे चाहत्यांना स्पेशल कंटेंटमध्ये प्रवेश मिळू शकेल. सेन्सर टॉवर पुष्टी करतो की, पहिली ‘इंस्टाग्राम मेंबरशिप’ इन-अॅप शॉपिंग $4.99 किंमतीच्या टॅगवर 1 नोव्हेंबर रोजी यूएस अॅप स्टोअर सूचीमध्ये जोडली गेली होती. 0.99 डॉलरची इन अॅप शॉपिंग काही दिवसांनंतर, 3 नोव्हेंबर रोजी जोडली गेली.

इंस्टाग्राम करतंय ‘मेंबरशिप बटण’ची चाचणी

याव्यतिरिक्त, रिव्हर्स इंजिनियर आणि टिपस्टर अलेक्सांद्रो पलुझी यांनी ट्विटच्या मालिकेद्वारे सूचित केले आहे की, इंस्टाग्राम मेंबरशिप बटणाची चाचणी करत आहे, जे क्रिएटरच्या प्रोफाइलवर दिसेल. याचा अर्थ त्यांचे चाहते मेंबरशिप घेऊ शकतात आणि स्टोरी व लाईव्ह व्हिडीओ यासारख्या स्पेशल कंटेंटमध्ये प्रवेश मिळवू शकतात.

जेव्हा तुम्ही क्रिएटर्सना डायरेक्ट मेसेज अर्थात DM कराल किंवा त्यांच्या पोस्टवर कमेंट कराल, तेव्हा तुमच्या नावाच्या (User Name) पुढे एक स्पेशल मेंबर बॅज देखील दिसेल. या बॅजद्वारे क्रिएटर्सशी संवाद साधणताना प्राधान्यक्रम ठरवणे सोपे जाईल.

सदस्यांकडे असतील रद्द करण्याचे अधिकार

हे लक्षात घेण्यासारखे आहे की टेकक्रंचच्या अहवालानुसार, क्रिएटर्स त्यांच्या अंदाजे कमाई, अॅक्टिव्ह मेंबर्स आणि अंतिम मेंबरशिपवर लक्ष ठेवण्यास सक्षम असतील. इंस्टाग्राम क्रिएटर्सना त्यांचे सब्सक्रिप्शन नाव आणि किंमत कस्टमाइज करण्यास अनुमती देतील आणि चाहते त्यांना पाहिजे तेव्हा ती मेंबरशिप रद्द देखील करू शकतील.

दरम्यान, TikTok, Snapchat, Pinterest, YouTube आणि Twitter सारख्या सोशल मीडिया कंपन्यांच्या वाढत्या संख्येने त्यांचे स्वतःचे क्रिएटर सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म देखील सुरू करु लागले आहेत.

इतर बातम्या

सार्वजनिक वायफाय वापरताय? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा; तुमचे खाते होऊ शकते हॅक

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

Kamal Haasan: कमल हसन लाँच करणार एनएफटी कलेक्शन, मेटाव्हर्सच्या विश्वातील पहिले भारतीय सेलिब्रिटी

(Instagram testing monthly subscriptions feature priced at 89 rupees per month)

Published On - 5:26 pm, Tue, 9 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI