टिकटॉकला टक्कर देणार इन्स्टाग्रामचे ‘हे’ नवीन फीचर, जाणून घ्या काय आहे विशेष

इन्स्टाग्राम आता रिल्सची वेळ मर्यादा वाढवणार आहे. यापुढे रील्स 30 सेकंदाऐवजी एका मिनिटाच्या असतील.

टिकटॉकला टक्कर देणार इन्स्टाग्रामचे 'हे' नवीन फीचर, जाणून घ्या काय आहे विशेष
टिकटॉकला टक्कर देणार इन्स्टाग्रामचे 'हे' नवीन फीचर, जाणून घ्या काय आहे विशेष
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jul 28, 2021 | 10:11 PM

नवी दिल्ली : इन्स्टाग्राम हळूहळू बदलत आहे आणि आता ते फोटो शेअरिंग अ‍ॅपऐवजी व्हिडिओ प्लॅटफॉर्म बनत आहे. इंस्टाग्रामवरील प्रत्येक युजर रील्सकडे आकर्षित होत आहे. युजर्स बरेच व्हिडिओ तयार करीत आहेत. युजर्सचे हे आकर्षण लक्षात घेऊन कंपनीने युजर्सच्या हिताचा विचार करीत नवीन फीचरबाबत एक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंटेट क्रिएटर्सच्या चेहऱ्यावर हास्य येणार आहे. इन्स्टाग्राम आता रिल्सची वेळ मर्यादा वाढवणार आहे. यापुढे रील्स 30 सेकंदाऐवजी एका मिनिटाच्या असतील. (Instagram’s new feature will hit TikTok, know what’s special)

रील्स फीचरचा सुरुवातीचा काळ

रील्स फीचरने 15 सेकंदाच्या टाईम कॅपसह सुरुवात केली होती. त्यानंतर अवघ्या एक महिन्याने रिल्स मर्यादा 30 सेकंदांपर्यंत वाढविण्यात आली. आता रील्स पहिल्यांदा इन्स्टाग्रामवर सादर करून एक वर्ष उलटल्यानंतर रिल्सची मर्यादा एक मिनिटापर्यंत वाढविण्यात आली आहे. पण तुम्हाला माहित आहे का, अशी वेळ मर्यादा आणखी कोणत्या आहे? होय, आम्ही टिकटॉकबद्दल बोलत आहोत.

इंस्टाग्राम आणि टिकटॉकचे समीकरण

टिकटॉकने अलीकडेच 60 सेकंदाचा कॅप केला आहे, यामुळे या प्लॅटफॉर्मवर अनेक नवे युजर्स जोडले गेले. पण आता टिकटॉक भारतात बंद झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता इंस्टाग्रामने टिकटॉकच्या निर्णयाला अनुसरून रिल्स मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. टिकटॉकचा एक मिनिटाचा टाईम कॅप त्या लोकांसाठी आहे, जे लोक स्वयंपाक, स्टोरटेलिंग किंवा इतर व्हिडिओ बनवतात.

तथापि, आम्ही आपल्याला सांगतो की आता टिकटॉकवर आता वेळेची मर्यादा तीन मिनिटांपर्यंत वाढविण्यात आली आहे. अशा परिस्थितीत असा विश्वास आहे की येत्या काळात इन्स्टाग्रामदेखील अशाच प्रकारे वेळेची मर्यादा वाढवण्याच्या दृष्टीने निर्णय घेऊ शकते. इंस्टाग्रामने त्याची रील्स कशी सुरू केली हे अजून उघड केलेले नाही. पण रिल्सच्या सीईओंनी याबाबत खुलासा केला आहे. टिकटॉक इन्स्टाग्रामपासून खूप दूर गेला आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

इन्स्टाग्रामची नवी वाटचाल

टिकटॉकला भारतासह इतरही अनेक देशांत बंदी घातली होती, परंतु यामुळे टिकटॉकच्या लोकप्रियतेमध्ये फारसा पडू शकलेला नाही. अशा परिस्थितीत आता रिल्सची टिकटॉकशी स्पर्धा होत आहे. चालू वर्षाच्या सुरूवातीला इन्स्टाग्रामच्या प्रमुखांनी म्हटले होते की, इन्स्टाग्राम आता फक्त फोटो शेअरिंग अ‍ॅप नाही, तर व्हिडिओ आणि रिटेलच्या दिशेने वाटचाल करण्याची कंपनीची योजना आहे. त्या पार्श्वभूमीवर इन्स्टाग्राम आगामी काळात काही आवश्यक पावले उचलू शकते, अशी शक्यता आहे. (Instagram’s new feature will hit TikTok, know what’s special)

इतर बातम्या

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करणार भारत सरकार, कंपनीला करावे लागेल केवळ हे काम

पालिका आयुक्तांच्या घराचे नळ कनेक्शन कापल्यानंतर कारवाई, मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक, 1 दिवसाची पोलीस कोठडी

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें