iPhone 17 साठी लांबच लांब रांग! तहानभूक विसरून भल्या पहाटेपासून आयफोन खरेदीसाठी गर्दी उसळली, किंमत किती?
Apple iPhone 17 : नवीन आयफोन 17 खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. एखाद्या सामाजिक अथवा धार्मिक कार्यक्रमात असते तशा लांबच लांब रांगा दिसून येत आहे. मुंबईत आयफोन प्रेमींची मोठी गर्दी उसळली आहे.

BKC Apple Store iPhone 17 : नवीन आयफोन 17 बाजारात दाखल झाला आहे. हा ॲप्पल फोन खरेदीसाठी मोठी गर्दी उसळली आहे. मुंबईतील बीकेसीमध्ये ॲप्पल स्टोर आहे. येथे ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ॲप्पलचा आयफोन 17 हा आपल्याकडे असावा यासाठी भल्या पहाटेपासून आयफोन प्रेमींनी गर्दी केली आहे. स्टोर उघडण्यापूर्वीच काहींनी त्यासमोर ठाण मांडले होते. तहानभूक हरपून अनेक जण या रांगेत लागले आहेत. मोठी रक्कम मोजत तासनतास रांगेत उभे राहत अनेकांना आयफोन 17 हवा आहे.
ॲप्पल आयफोन 17 खरेदीसाठी गर्दी
आयफोन प्रेमींमध्ये आयफोनच्या नवीन फोनची मोठी प्रतिक्षा आहे. आयफोन 17 सीरीज आज लाँच झाली. हा मोबाईल आपल्याकडं हवा यासाठी ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. त्यामुळे मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स स्टोरबाहेर भल्या पहाटेपासून ॲप्पल स्टोरसमोर लांबच लांब रांगा लागल्या. तर काहींनी रात्रीच येथे मुक्काम ठोकल्याचे समोर आले आहे. त्यांनी आपला नंबर लावत रात्र या स्टोरबाहेरच घालवली. त्यामुळे स्टोर उघडताच त्यांना आयफोन खरेदीचा आनंद घेता आला आणि त्यांनी भल्या पहाटे आयफोन 17 खरेदीचा सेल्फी सुद्धा स्टोरमधून अथवा स्टोर बाहेरून त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केला. अशीच गर्दी दिल्लीतील साकेत येथील ॲप्पल स्टोरबाहेर जमल्याचे दिसून आले आहे.
#WATCH | Long queues seen outside the Apple store in Delhi’s Saket
Apple started its iPhone 17 series sale in India today. pic.twitter.com/mjxZAFheWC
— ANI (@ANI) September 19, 2025
आयफोन 17, 17 प्रो, प्रो मॅक्स आणि एअरची भारतातील किंमत किती?
iPhone 17 Series price in India :
iPhone 17 Series
iPhone 17 (256GB) : 82,900 रुपये
iPhone 17 (512GB) : 1,02,900 रुपये
iPhone Air :
- iPhone Air (256GB) : 1,19,900 रुपये
- iPhone Air (512GB) : 1,39,900 रुपये
- iPhone Air (1TB) : 1,59,000 रुपये
iPhone 17 Pro
- iPhone 17 Pro (256GB) : 1,34,900 रुपये
- iPhone 17 Pro (512GB) : 1,54,900 रुपये
- iPhone 17 Pro (1 TB) : 1,74,900 रुपये
iPhone 17 Pro Max
- iPhone 17 Pro Max (256GB) : 1,49,900 रुपये
- iPhone 17 Pro Max (512GB) : 1,69,900 रुपये
- iPhone 17 Pro Max (1TB) : 1,89,900 रुपये
- iPhone 17 Pro Max (2TB) : 2,29,900 रुपये
