AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 7000mAh बॅटरीसह iQOO 15 ची धमाकेदार एंट्री, जाणून घ्या किंमत फिचर्स

iQOO 15 हा स्मार्टफोन देशांतर्गत बाजारात लाँच करण्यात आला आहे. तो लवकरच भारतात लाँच होणार आहे आणि हा कंपनीचा स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिप असलेला पहिला फोन आहे. तर आजच्या लेखात आपण या स्मार्टफोनची किंमत आणि फिचर्स बद्दल जाणून घेऊयात...

Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 7000mAh बॅटरीसह iQOO 15 ची धमाकेदार एंट्री, जाणून घ्या किंमत फिचर्स
| Edited By: | Updated on: Oct 26, 2025 | 4:05 PM
Share

स्मार्टफोन ब्रँड असलेला iQOO ने त्यांचा नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन iQOO 15 हा चीनमध्ये लाँच केला आहे. सध्या, हा फोन फक्त देशांतर्गत बाजारात सादर करण्यात आला आहे आणि लवकरच भारतातही लाँच होणार आहे. या फोनमध्ये क्वालकॉमचा नवीन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेट, 144Hz AMOLED डिस्प्ले आणि मोठी 7000mAh बॅटरी आहे. कंपनीने या स्मार्टफोनला वायरलेस चार्जिंग देखील दिलेले आहे, ज्यामुळे ते एक पॉवर-पॅक प्रीमियम डिव्हाइस बनले आहे. हा फोन थेट OnePlus 15 शी स्पर्धा करेल.

डिस्प्ले आणि परफॉर्मेंस

iQOO 15 या स्मार्टफोन मध्ये 6.85-इंचाचा 2K Samsung M14 AMOLED LTPO डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आहे आणि त्याची पीक ब्राइटनेस 2600 nits आहे.

तसेच यात स्क्रीन 2160Hz PWM डिमिंग आणि DC डिमिंगला सपोर्ट करते. अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटने चालवला आहे, ज्यामुळे तो खूप वेगवान फोन बनलेला आहे.

यात तुम्हाला LPDDR5x रॅम आणि UFS 4.1 स्टोरेज देखील देण्यात आलेला आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित Vivo च्या नवीन OriginOS 6 वर चालतो, जो जागतिक प्रकारांमध्ये देखील उपलब्ध असेल. हा बदल महत्त्वपूर्ण आहे कारण कंपनी आता Funtouch OS ला नवीन OriginOS इंटरफेसने बदलत आहे.

कॅमेरा आणि बॅटरी फिचर्स

iQOO 15 मध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये 50MP Sony IMX921 प्रायमरी सेन्सर (OIS सह), 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स (Sony IMX882, 3x ऑप्टिकल झूम) आणि 50MP अल्ट्रावाइड लेन्स मिळेल. तर या फोनच्या फ्रंटमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. त्यात हा फोन 100W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट असलेली 7,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आलेली आहे.

खास फिचर्स

या फोनमध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे, ज्यामुळे हा फोन पाणी आणि धूळ यापासून सुरक्षित राहतो.

यात ड्युअल स्पीकर्स, 14,000mm² व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टम आणि कॅमेरा मॉड्यूलभोवती RGB लाइटिंग आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 7, ब्लूटूथ 6.0, NFC आणि ड्युअल-बँड GPS यांचा समावेश आहे.

भारतात लवकरच होईल लाँच

iQOO 15 हा स्मार्टफोन काही आठवड्यात भारतात लाँच होण्याची अपेक्षा आहे. कंपनीच्या भारतातील सीईओ निपुण मरिया यांनी सांगितले की, कामगिरी ही iQOO ची ओळख आहे आणि क्वालकॉमसोबतची त्यांची भागीदारी याला आणखी बळकटी देते. iQOO 15 हा भारतातील पहिला प्रीमियम फ्लॅगशिप फोन असेल ज्यामध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 असेल, जो परफॉर्मेंससाठी नवीन उंचाक गाठेल.

भारतीय अपेक्षित किंमत आणि व्हेरिंएट

iQOO 15 हा स्मार्टफोन चीनमध्ये पाच स्टोरेज व्हेरिंएटमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 12GB/256GB व्हेरिंएट ची किंमत 4,199 युआन म्हणजे भारतीय चलनाच्या अंदाजे 52,000 तर 16GB/1TB,असलेल्या व्हेरिएंटची किंमत 5,499 युआन अंदाजे 68,000 रूपयांपर्यंत आहे. भारतात या स्मार्टफोनची किंमत iQOO 13 या मॉडेलप्रमाणेच55,000 ते 60,000 दरम्यान असण्याची अपेक्षा आहे. हा फोन लेजेंडरी, ट्रॅक, लिंग्यून आणि वाइल्डरनेस या चार रंगांमध्ये उपलब्ध असेल.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.