फक्त 189 रूपयांमध्ये 28 दिवसांची वैधता, jioचा हा नवा प्लॅन Airtelवर पडणार भारी
रिलायन्स जिओकडे २८ दिवसांच्या वैधतेसह स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे जो एअरटेल कंपनीच्या प्रीपेड प्लॅनवर भारी पडणारा आहे. जिओच्या या स्वस्त प्लॅनची किंमत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. चला तर मग जाणून घेऊया या प्लॅनमध्ये कोणते फायदे आहेत आणि ते एअरटेल कंपनीच्या प्लॅनपेक्षा किती वेगळे आहे?

भारतातील सर्वात नामांकित असलेल्या रिलायन्स जिओच्या टेलिकॉम कंपनीकडे सध्या सर्वाधिक ग्राहक आहेत, अलिकडच्या एका अहवालात असे दिसून आले आहे की जिओकडे 191दशलक्ष 5जी ग्राहक आहेत. इतके लोकं जिओ नेटवर्कशी विनाकारण जोडलेले आहेत, कारण कंपनी कोट्यवधी लोकांसाठी स्वस्त रिचार्ज प्लॅनपासून ते उत्तम ऑफर्सपर्यंत बरेच काही ऑफर करते. आज आम्ही तुमच्यासाठी जिओचा सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन असलेल्या 28 दिवसांच्या वैधतेसह असलेल्या प्लॅन घेऊन आलो आहोत. तर या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे या प्लॅनची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी आहे.
आज आपण रिलायन्स जिओच्या 189 रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत. हा प्लॅन एअरटेल कंपनीच्या 199 रुपयांच्या प्लॅनला कडक टक्कर देणार आहे.दोन्ही प्लॅनच्या किमतीत 10 रुपयांचा फरक आहे, आता आम्ही तुम्हाला दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांमधील फरक सांगणार आहोत, चला तर मग जाणुन घेऊयात…
जिओ 189 प्लॅन
189 रुपयांचा प्लॅन कमी डेटा वापरणाऱ्यांसाठी उत्तम आहे. यात 2 जीबी हाय-स्पीड डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस सुविधा मिळतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला कंपनीकडून जिओ टीव्ही आणि जिओ क्लाउड स्टोरेजचा फायदा देखील मिळतो.
एअरटेल 199 प्लॅन
एअरटेलच्या 199 रुपयांच्या प्लॅनमध्ये, कंपनी दररोज 100 एसएमएस आणि अमर्यादित कॉलिंगसह 2 जीबी हाय-स्पीड डेटा देखील देत आहे. जिओ प्रमाणेच, एअरटेल कंपनीचा हा प्लॅन देखील 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, एअरटेल कंपनीचा हा प्रीपेड प्लॅन स्पॅम अलर्ट, मोफत शो, चित्रपट, एअरटेल एक्स्ट्रीम अॅपद्वारे लाइव्ह चॅनेल आणि 1 महिन्यात एक मोफत हॅलोट्यूनचा फायदा देत आहे.
फरक
रिलायन्स जिओ आणि एअरटेल दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनच्या किमतीत 10 रुपयांचा फरक आहे, याशिवाय, जर आपण फायद्यांमधील फरकाबद्दल बोललो तर, जिओ कंपनीचा प्लॅन फक्त 300 एसएमएस देत आहे, तर एअरटेल कंपनीचा प्लॅन दररोज 100 एसएमएसची सुविधा देईल. अतिरिक्त फायद्यांमध्येही फरक आहे, आता तुम्हाला कोणता प्लॅन निवडायचा आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे.
