LG कडून जगातील पहिला 83 इंचांचा OLED TV लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Jun 20, 2021 | 5:15 PM

एलजी इलेक्ट्रॉनिक्सने (LG electronics) रविवारी (20 जून) त्यांचा 83 इंचाचा ओएलईडी टीव्ही (OLED TV) लाँच केला आहे.

LG कडून जगातील पहिला 83 इंचांचा OLED TV लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
LG TV

मुंबई : एलजी इलेक्ट्रॉनिक्सने (LG electronics) रविवारी (20 जून) त्यांचा 83 इंचाचा ओएलईडी टीव्ही (OLED TV) लाँच केला आहे. दक्षिण कोरियन टेक दिग्गज कंपनी प्रीमियम टीव्ही बाजारामध्ये आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. एलजी ही कंपनी 83 इंचांच्या डिस्प्लेसह ओएलईडी टीव्ही लाँच करणारी पहिली टीव्ही निर्माती कंपनी ठरली आहे. 83 C1 TV 4K रेझोल्यूशनसह हा टीव्ही मार्केटमधला सर्वात मोठा OLED टीव्ही आहे. (LG launched worlds first 83 inch C1 OLED TV, check price features)

LG चा 83 इंचांचा OLED TV, 83 C1 या महिन्यात सर्वात आधी दक्षिण कोरिया आणि संयुक्त राज्य अमेरिकेत (USA) उपलब्ध होईल. दक्षिण कोरियामध्ये या टीव्हीची किंमत 9,630 डॉलर्स (जवळपास 7.14 लाख रुपये) इतकी ठेवली गेली आहे.

LG 83 C1 OLED TV ची खासियत

नवीन टीव्ही एलजीच्या ओएलईडी टीव्ही लाइनअपचा विस्तार आहे, ज्यात आधीपासून 48 इंच, 55 इंच, 65 इंच, 77 इंच आणि 88 इंचांचे मॉडेल्स उपलब्ध आहेत. 88 इंचाचं मॉडेल 8K रिजोल्यूशनसह सादर करण्यात आलं आहे. एलजीच्या मते, 83 C1 मध्ये 4 के हाय फ्रेम तंत्रज्ञानासह प्रगत वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. हे फीचर्स गेम खेळताना आणि गेम पाहताना अधिक चांगला अनुभव देतात.

योनहाप वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, या टीव्हीला कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो 2021 मधील इनोव्हेशन अवॉर्ड मिळालं होतं. तिथे गेमिंग आणि व्हिडिओ डिस्प्ले श्रेणीमध्ये या टीव्हीचं कौतुक केलं गेलं होतं. जगातील आघाडीची ओएलईडी टीव्ही निर्माती एलजी आपल्या 83-इंच टीव्हीच्या साथीने जगभरातील बाजारांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा करत आहे. 83 इंचांचा टीव्ही मोठ्या प्रीमियम टीव्हींच्या विक्रीला चालना देऊ शकतो.

इतर बातम्या

धमाकेदार ऑफर! 14 हजारांचा 5G स्मार्टफोन 699 रुपयांत खरेदीची संधी

48MP कॅमेरा, 6000 mAh बॅटरीसह दमदार स्मार्टफोन बाजारात, किंमत फक्त 7999

Xiaomi च्या ‘या’ स्मार्टफोनचा बाजारात धुमाकूळ, तब्बल 3000 कोटींची विक्री

(LG launched worlds first 83 inch C1 OLED TV, check price features)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI