AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लॅपटॉप सतत हँग होतो? या 5 ट्रिक्स वापरून बघा, स्पीड झपाट्याने वाढेल!

लॅपटॉप हळू चालतोय पण नवीन घ्यायची गरज नाही फक्त थोडं टेक केअर केल्यास आणि या काही ट्रिक्स फॉलो केल्यास तुमचाच जुना लॅपटॉप पुन्हा एकदा 'फास्ट अँड स्मार्ट' बनू शकतो!

लॅपटॉप सतत हँग होतो? या 5 ट्रिक्स वापरून बघा, स्पीड झपाट्याने वाढेल!
laptop
Updated on: Apr 27, 2025 | 12:15 AM
Share

ऑफिसमधलं काम असो, कॉलेजचे प्रोजेक्ट्स असो किंवा अगदी मनोरंजन लॅपटॉप शिवाय जगणं आज जवळजवळ अशक्यच झालं आहे. मात्र, जेव्हा लॅपटॉपची स्पीड अचानक कमी होते, तेव्हा काम करणं म्हणजे एक मोठाच त्रास वाटतो. पण काळजी करू नका काही साध्या आणि सोप्या टिप्स फॉलो केल्या, तर तुमचा जुनाट लॅपटॉप पुन्हा एकदा झपाट्याने काम करू लागेल.

1. HDDला बाय-बाय, SSDला हॅलो करा : जुना लॅपटॉप हळू चालण्याचं एक मोठं कारण म्हणजे त्यातील हार्ड डिस्क (HDD). जर तुमच्याकडे अजूनही HDD असेल, तर ताबडतोब SSD (सॉलिड स्टेट ड्राइव्ह) बसवा. SSD मुळे फाईल्स जलद ओपन होतात, विंडोज पटकन लोड होतं आणि संपूर्ण लॅपटॉपचं काम स्मूथ वाटतं. अगदी नवीन लॅपटॉपसारखा फील येईल.

2. रॅम वाढवा आणि मल्टीटास्किंगला तयार व्हा : लॅपटॉपमध्ये कमी RAM असेल, तर एकाच वेळी अनेक अ‍ॅप्स चालवल्यावर तो अडखळू लागतो. यावर सोपा उपाय म्हणजे — RAM वाढवा! किमान 8GB RAM लावल्यास तुम्ही वेगवेगळं काम सहज करू शकता. यासोबतच, नको असलेल्या फाइल्स, सॉफ्टवेअर आणि गेम्स डिलीट करून स्टोरेज रिकामं ठेवा, यामुळेही लॅपटॉपचा वेग वाढतो.

3. सतत अपडेट ठेवा आणि व्हायरसपासून वाचवा : लॅपटॉपचं सॉफ्टवेअर अपडेट केल्यास त्यातल्या त्रुटी दूर होतात आणि स्पीडही सुधारतो. शिवाय, व्हायरस किंवा मालवेअरमुळे सिस्टम स्लो होण्याची शक्यता असते, म्हणून नेहमी चांगलं अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरणं गरजेचं आहे.

4. स्टार्टअप प्रोग्राम्सवर नियंत्रण ठेवा : लॅपटॉप ऑन केल्यावर काही अ‍ॅप्स आपोआप सुरू होतात, यामुळे सुरुवातीला वेळ लागतो. हे अ‍ॅप्स टास्क मॅनेजरमध्ये जाऊन डिसेबल करा. याशिवाय, टेम्प फाइल्स वेळोवेळी डिलीट करत राहा — यामुळे स्टोरेज हलकं राहतं आणि लॅपटॉप वेगवान काम करतो.

युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक
युनेस्कोत शिवरायांचा गौरव; शिवराज्याभिषेक अन् राजमुद्रेचंही कौतुक.
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम
उद्या भारत बंद, 25 कोटी कामगारांचा सहभाग; 'या' सेवांवर होणार परिणाम.
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?
अपघातग्रस्त कार भाजप आमदार सुरेश धसांच्या नावावर, नेमकं घडलं काय?.
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?
मध्यरात्र ते दुपारी 4 पर्यंत मीरारोडच्या मनसेच्या मोर्चात बघा काय घडल?.
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्...
खाकीला डाग! पुणे पोलीस दलात खळबळ, पोलिसानेच लाटले 73 तोळे सोने अन्....
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?
मेळाव्यानंतर राज ठाकरेंचा संभ्रम? ठाकरे बंधू एकत्र पण युतीबद्दल काय?.
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO
शिवसेनेच्या मंत्र्याची मनसेच्या मोर्चात एन्ट्री अन् काय घडल? बघा VIDEO.
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही
ओम फट् स्वाहा...विरोधकांनी गोगावलेंना डिवचल, बघा VIDEO हसू अवरणार नाही.
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.