AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mobile Data vs Wi-Fi: तुमच्या फोन बॅटरीचा सर्वाधिक वापर कधी होतो? चार्जिंग झटपट कधी संपते? जाणून घ्या

तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात आपल्याला मोबाईल पाहायला मिळतो. बहुतांश कामं मोबाईलवरून ऑनलाईन झटपट होतात. पण मोबाईल नेटवर्क वापरताना एक त्रास असतो तो म्हणजे बॅटरी उतरणे.. पण ही बॅटरी वायफाय कि मोबाईल डेटामुळे लवकर संपते ते जाणून घेऊयात..

Mobile Data vs Wi-Fi: तुमच्या फोन बॅटरीचा सर्वाधिक वापर कधी होतो? चार्जिंग झटपट कधी संपते? जाणून घ्या
Mobile Data vs Wi-Fi: तुमच्या फोन बॅटरीचा सर्वाधिक वापर कधी होतो? चार्जिंग झटपट कधी संपते? जाणून घ्याImage Credit source: Magnific
| Updated on: Jun 19, 2026 | 7:32 PM
Share

स्मार्टफोन आपल्याला प्रत्येकाच्या हातात पाहायला मिळतो. कारण स्मार्टफोन आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. कारण मोबाईल आता कॉलिंग आणि मेसेज करण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मिडिया स्क्रोलिंगपासून ऑनलाइन पेमेंट, गेमिंग, व्हिडीओ कॉल्स आणि ऑनलाईन मीटिंग्स या सारख्या अनेक कामांसाठी वापरला जातो. त्यामुळे मोबाईलमध्ये इंटरनेट असणं खूप गरजेचं आहे. कारण त्या शिवाय या गोष्टी शक्यच नाही. मग यासाठी मोबाईलधारकांपुढे दोन पर्याय असतात. एक म्हणजे मोबाईल डेटा आणि दुसरा वायफाय.. पण वापरत असताना त्याचा थेट परिणाम तुमच्या फोनच्या बॅटरीवर होतो. पण दोन्ही पैकी सर्वाधिक बॅटरी कोण वापरतं? मोबाईल डेटा की वायफाय? चला जाणून घेऊयात…

मोबाईल डेटामुळे बॅटरी पटकन उतरते!

मोबाईल डेटा वापरताना तुमची बॅटरी झटपट उतरते. त्यामुळे वायफायच्या तुलनेत मोबाईल डेटा वापरताना बॅटरी झपाट्याने उतरते. वायफाय नेटवर्कच्या तुलनेत 4जी किंवा 5जी नेटवर्क वापरल्याने बॅटरीवर परिणाम होते. तुमच्या बॅटरीचं चार्जिंगवर 50 ते 120 टक्क्यांपर्यंत परिणाम होऊ शकतो. म्हणजेच मोबाईल डेटा वापरला तर बॅटरीवर अधिक ताण येतो. त्यामुळे वायफाय कनेक्ट असेल तर फोनची बॅटरी जास्त टिकते. वायफाय राउटर फोनपासून काही पावलांच्या अंतरावर असतो. त्यामुळे बॅटरीवर ताण येत नाही. त्यामुळे मोबाईल डेटाच्या तुलनेत वायफाय कनेक्शनवर बॅटरीचा कमी वापर होतो.

मोबाईल डेटा जास्त बॅटरी वापरण्याचं कारण काय?

मोबाईल डेटा वापरताना सर्वात पहिलं म्हणजे सिग्नलचं अंतर.. मोबाईल डेटा वापरताना टॉवरसोबत कनेक्ट करताा फोनची बॅटरी अधिक वापरतो. त्यामुळे बॅटरी पटापट उतरते. कारण टॉवर 100 मीटर किंवा त्यापेक्षा लांब असतो. त्यामुळे नेटवर्क मिळवण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. त्यामुळे बॅटरी उतरण्यास सुरूवात होते. दुसरं मोबाईल नेटवर्क कमकुवत असेल आणि मोबाईल डेटा सुरू असेल, तर फोन सतत मजबूत नेटवर्क सर्च करत असतो. त्यामुळे स्थिर नेटवर्क मिळत नाही तोपर्यंत सर्च सुरू राहतो. त्यामुळे बॅटरीवर ताण येतो.

बॅटरी वाचवण्यासाठी टीप्स

  • वायफाय असल्यास मोबाईल डेटा ऐवजी त्याचा वापर करा.
  • मोबाईल नेटवर्क कमकुवत असल्यास डेटा बंद करून ठेवा
  • प्रवासात गरज नसल्यास मोबाईल डेटा बंद ठेवा. जेणेकरून तुम्हाला अडचणीच्या काळात बॅटरी राहील.
  • फोनचे सॉफ्टवेअर आणि एप्स हे अपडेट ठेवाल. जेणेकडून प्रवासात किंवा इतर वेळी ते अपडेट करण्यासाठी बॅटरीचा वापर होणार नाही.
Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला