WhatsApp च्या या फीचरवर अवघे जग फिदा! आले हे नवीन अपडेट

WhatsApp Update | व्हॉट्सॲप युझर्ससाठी नवनवीन प्रयोग करत राहते. अनेक फीचर पण या काळात व्हॉट्सॲपने आणले आहे. कंपनीने व्हॉट्सॲप चॅनल हे अभिनव फीचर जोडले आहे. त्यावर युझर्सच्या उड्या पडल्या आहेत. या फीचरवर अवघे जग फिदा झाले आहे. त्यात आता आणखी तीन नवीन सुविधा जोडण्यात आल्या आहेत.

WhatsApp च्या या फीचरवर अवघे जग फिदा! आले हे नवीन अपडेट
Follow us
| Updated on: Jan 18, 2024 | 11:41 AM

नवी दिल्ली | 18 जानेवारी 2024 : इन्स्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲपने जगभरात पुन्हा धमाका केला आहे. व्हॉट्सॲप चॅनलवर युझर फिदा झाले आहेत. जगभरातील जवळपास 2 अब्ज युझर त्याचा वापर करत आहेत. वेळोवेळी मेटा नवनवीन फीचर जोडते. गेल्या वर्षी व्हॉट्सॲपने Channel हे फीचर समोर आणले होते. यामुळे युझर्सला व्हिडिओ तयार करता येतो. त्यांना त्यांच्या फेव्हरेट क्रिएटर, संस्था, सेलेब्रिटी यांचे व्हिडिओ पाहता येतात. त्यांना फॉलो करता येते. विशेष म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक पण त्यासाठी देण्याची गरज नाही. आता मेटाने या फीचरमध्ये अजून काही गोष्टी जोडल्या आहेत.

3 नवीन फीचर जोडले

  1. व्हॉट्सॲप चॅनल्समध्ये 3 नवीन फीचर जोडले. यामध्ये व्हाईस मॅसेज, पोल्स आणि शेअर टू स्टेट्स हे नवीन फीचर जोडण्यात आले आहे. मेटा कंपनीने मल्टिपल एडमिनचे फीचर पण युझर्सला दिले आहे. या फीचर अंतर्गत चॅनल एडमिन एका पेक्षा अधिक एडमिन तयार करु शकतो. त्यामुळे एडमिन व्यतिरिक्त इतर एडमिन पण चॅनलवर फॉलोअर्स जोडू शकतील.
  2. व्हॉट्सॲप चॅनलसाठी नवीन फीचर्सची घोषणा मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी केली आहे. व्हॉट्सॲप चॅनल आता अधिक आकर्षक होईल. व्हाईस मॅसेज फीचरच्या माध्यमातून चॅनल ओनर्स आता आवाज रेकॉर्ड करुन त्यांच्या कल्पना, सूचना आणि विचार लोकांपर्यंत पोहचवू शकतात. त्यामुळे चॅनल ओनर्स आणि फॉलोअर्स यांच्यामध्ये एक खास नाते तयार होते. पोल्स फीचरचा वापर एडमिन एखाद्या टॉपिकवर लोकांची प्रतिक्रिया काय आहे, त्यांची मते काय आहेत, हे जाणून घेण्यासाठी करतील.
  3. हे सुद्धा वाचा
  4. चॅनलमध्ये जोडल्या गेलेले युझर्स आता मल्टि मीडिया मॅसेजच्या सहायाने थेट त्यांचे स्टेटस शेअर करु शकतील. त्यांच्या फेव्हरेट सेलेब्सच्या डे-टू-डे पोस्टला त्यांच्या मित्र परिवारात स्टेटच्या माध्यमातून मांडू शकतील. व्हॉट्सॲपवर तुम्ही पण तुमचे चॅनल तयार करु शकता. चॅनल तयार करण्यासाठी तुम्हाला स्टेट्स टॅबच्या अंतर्गत न्यू चॅनलचा पर्याय देण्यात आला आहे.

आता व्हॉट्सॲपवरच करा अपडेट

  • व्हॉट्सॲप नेहमी कोणते ना कोणते नवीन फीचर आणते
  • व्हॉट्सॲप लेटेस्ट अपडेटसाठी Google Play Store वर जावे लागते
  • व्हॉट्सॲपमध्येच व्हर्जन अपडेट करण्याची सुविधा मिळणार
  • ॲपच्या सेटिंगमध्ये App Update Settings हे फीचर मिळेल
  • सध्या या नवीन फीचरची चाचणी सुरु आहे
  • WABetainfo नुसार, हे फीचर लवकरच रोल आऊट होईल
  • अँड्राईड युझर्ससाठी नवीन बिटा व्हर्जन 2.24.2.13 रोलआऊट
Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.