2019 मधील ‘हे’ सर्वात धोकादायक पासवर्ड, चुकूनही वापरु नका

हॅकिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे असुरक्षीत प्रायव्हेट डेटा आणि पासवर्ड आहे. त्यामुळे प्रत्येक युजर्सचा पासवर्ड सुरक्षीत आणि स्ट्रॉंग असणे (Unsafe password list) गरजेचे आहे, असं एका सायबर सिक्युरिटी फर्मच्या अभ्यासात म्हटलं आहे.

  • Updated On - 11:31 pm, Sun, 22 December 19 Edited By:
2019 मधील 'हे' सर्वात धोकादायक पासवर्ड, चुकूनही वापरु नका

मुंबई : हॅकिंगचे सर्वात मोठे कारण म्हणजे असुरक्षीत प्रायव्हेट डेटा आणि पासवर्ड आहे. त्यामुळे प्रत्येक युजर्सचा पासवर्ड सुरक्षीत आणि स्ट्रॉंग असणे (Unsafe password list) गरजेचे आहे, असं एका सायबर सिक्युरिटी फर्मच्या अभ्यासात म्हटलं आहे. सध्या हॅकरकडून अनेकांचे फेसबुक, जीमेल इतर अकाऊंट हॅक केले जातात. त्यामुळे या सायबर कंपनीने काही पासवर्डची यादी जाहीर केली आहे. जे पासवर्ड सर्वाधिक असुरक्षीत (Unsafe password list) आहेत.

सिक्युरिटी सर्व्हिस फर्म Splash Data ने 50 लाखांपेक्षा अधिक लीक झालेल्या पासवर्डवर अभ्यास केला. त्यानंतर कंपनीकडून 50 असुरक्षीत पासवर्डची यादी जाहीर केली. 2019 मध्ये हे पासवर्ड सर्वाधिक असुरक्षीत होते. या पासवर्डचा उपयोग तुम्ही कधीही कोणत्या अकाऊंटसाठी वापरु नका.

हे 50 पासवर्ड सर्वाधिक असुरक्षित

1. 123456
2. 123456789
3. qwerty
4. password
5. 1234567
6. 12345678
7. 12345
8. iloveyou
9. 111111
10. 123123
11. abc123
12. qwerty123
13. 1q2w3e4r
14. admin
15. qwertyuiop
16. 654321
17. 555555
18. lovely
19. 7777777
20. welcome
21. 888888
22. princess
23. dragon
24. password1
25. 123qwe
26. 666666
27. 1qaz2wsx
28. 333333
29. michael
30. sunshine
31. liverpool
32. 777777
33. 1q2w3e4r5t
34. donald
35. freedom
36. football
37. charlie
38. letmein
39. !@#$%^&*
40. secret
41. aa123456
42. 987654321
43. zxcvbnm
44. passw0rd
45. bailey
46. nothing
47. shadow
48. 121212
49. biteme
50. ginger

गूगल देणार रिअल टाइम प्रटेक्शन

नुकतेच गुगलने युजर्ससाठी पासवर्ड लीक किंवा हॅकिंगपसून वाचण्यासाठी एक खास टूल क्रोम ब्राऊजरमध्ये इंटीग्रेट सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीने युजर्सला रिअल टाईम प्रटेक्शन मिळेल. त्यासोबतच सांगितले जाईल की, त्यांचा पासवर्ड यापूर्वी लीक किंवा हॅक करण्यात आला आहे का?