Jio च्या 444₹ प्लॅनमध्ये 447₹ प्लॅनपेक्षा 62GB अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

रिलायन्स जिओचे (Reliance Jio) सर्व प्लॅन खास असतात, पण कंपनी काही असे प्लॅन देखील ऑफर करते ज्यात तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय डेटा वापरू शकता.

Jio च्या 444₹ प्लॅनमध्ये 447₹ प्लॅनपेक्षा 62GB अधिक डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
Reliance Jio

मुंबई : रिलायन्स जिओचे (Reliance Jio) सर्व प्लॅन खास असतात, पण कंपनी काही असे प्लॅन देखील ऑफर करते ज्यात तुम्ही कोणत्याही लिमिटशिवाय डेटा वापरू शकता आणि अनलिमिटेड कॉलिंग, एसएमएस आणि मोठ्या वैधतेचा लाभ देखील घेऊ शकता. जिओच्या या प्लॅन्सचे नाव नो डेली लिमिट (No Daily Limit) प्लॅन असे आहे आणि यामध्ये तुम्हाला अधिक वैधता आणि फीचर्ससह 5 प्लॅन मिळतील. (No Daily Limit : Jio 444 plan is more beneficial than Rs 447 plan, it will give you 62GB extra data)

या नो डेली लिमिट प्लॅन्सची सुरुवात 127 रुपयांपासून होते आणि यातला सर्वात मोठा प्लॅन 2397 रुपयांचा आहे. पण आज आम्ही तुम्हाला अशा प्लॅन बद्दल सांगणार आहोत, त्या प्लॅनची किंमत 447 रुपये आहे, नो डेली लिमिट प्लॅन 444 रुपयांचा प्लॅन आहे. त्यात उपलब्ध सुविधा वेगळ्या आहेत, परंतु यात एक गोष्ट विशेष आहे ती म्हणजे 447 रुपयांचा प्लॅन निवडण्याऐवजी तुम्ही 3 रुपये कमी पैसे देऊन 62GB अतिरिक्त डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया प्लॅनमध्ये काय उपलब्ध आहे आणि कमी पैसे देऊन तुम्ही अधिक फीचर्सचा लाभ कसा घेऊ शकता.

447 रुपयांचा No Daily Limit प्लॅन

या प्लॅनची वैधता 60 दिवसांची आहे आणि यामध्ये तुम्हाला एकूण 50GB डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर तुम्ही 64Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकाल. यासह, तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळेल. यासह, आपण JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळवू शकता.

Jio चा 444 रुपयांचा प्लॅन

या प्लॅनची किंमत जिओच्या नो डेली लिमिट प्लॅनपेक्षा 3 रुपये कमी आहे आणि यामध्ये तुम्हाला 56 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा मिळेल. याचा अर्थ तुम्हाला 56 दिवसांत एकूण 112GB डेटा मिळेल. अशा स्थितीत, जर पाहिले तर तुम्ही 3 रुपये कमी देऊन या प्लॅनमध्ये 64GB अधिक डेटाचा लाभ घेऊ शकता. दैनंदिन डेटा संपल्यानंतर तुम्ही इंटरनेटचा वापर 64Kbps च्या स्पीडने करू शकता. यासह, तुम्हाला अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसचा लाभ मिळेल. याशिवाय, तुम्ही JioTV, JioCinema, JioNews, JioSecurity आणि JioCloud चे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळवू शकता.

इतर बातम्या

आगामी OnePlus 9RT ची किंमत आणि फीचर्स लीक, जाणून घ्या सर्वकाही

108MP कॅमेऱ्यासह Moto Edge 20 बाजारात, मोठ्या डिस्काऊंटसह आज पहिला सेल

50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरासह Vivo चा जबरदस्त स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

(No Daily Limit : Jio 444 plan is more beneficial than Rs 447 plan, it will give you 62GB extra data)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI