व्हीओ-वायफायची कमाल! यापुढे नेटवर्कचे टेन्शन नाही, नेटवर्क नसले तरी मोबाईलवर बोलता येणार

व्हीओ-वायफायची कमाल! यापुढे नेटवर्कचे टेन्शन नाही, नेटवर्क नसले तरी मोबाईलवर बोलता येणार
व्हीआयने भारतात सुरू केले दोन उत्तम रिचार्ज प्लान

व्हीओ-वायफायची कमाल! यापुढे नेटवर्कचे टेन्शन नाही, नेटवर्क नसले तरी मोबाईलवर बोलता येणार (now you can talk on your mobile with VOWiFi without network)

prajwal dhage

|

Feb 24, 2021 | 11:39 AM

मुंबई : शहरातून गावाकडे गेले की हमखास एक प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे मोबाईल नेटवर्कचा. जर कुठलाही मोबाईल फोन चांगला चालवायचा असेल तर आपल्या फोनमध्ये तितकेच सुपरफास्ट मोबाईल नेटवर्क असणे खूप महत्वाचे असते. अनेकदा असे घडते की जेव्हा आम्ही नेटवर्क क्षेत्रात नसतो आणि तेव्हाच आपल्याला आवश्यक कॉल करावे लागतात. आता मात्र याबाबत काही टेन्शन करण्याची गरज नाही. या टेन्शनवर व्होडाफोन आयडियाने उपाय शोधला आहे. आपल्या युजर्सची अडचण दूर करण्याचा मार्ग व्होडाफोन आयडियाने शोधला आहे. (now you can talk on your mobile with VOWiFi without network)

मुंबई-गुजरातमध्ये सेवेचा श्रीगणेशा

व्होडाफोन आयडिया राजधानी दिल्लीमध्ये व्हीओ-वायफाय किंवा वायफाय कॉलिंग सेवा सुरू करणार आहे. ही सेवा प्रथम गुजरात आणि मुंबई येथे कंपनीने सुरू केली आहे. या सेवेचा सर्वात मोठा फायदा त्या युजर्ससाठी आहे, जे प्रवास करतात आणि नेटवर्क जाण्याची चिंता करतात. अशा परिस्थितीत व्होडाफोन आयडियाने देशातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ही सेवा सुरू करण्याची योजना आखली आहे. टेलिकॉम टॉकने यासंबंधी अहवाल प्रसिद्ध केला आहे.

व्हीओ-वायफाय सेवा काय आहे ते जाणून घ्या?

व्हीओ-वायफाय सेवा ही एक सेवा आहे जिथे आपण वाय-फायच्या मदतीने कॉल करू शकता. जेव्हा आपल्या फोनचे नेटवर्क येत नाही, तेव्हा आपण हा पर्याय निवडू शकता. त्याचवेळी ही सेवा वापरण्यासाठी आपल्याकडे वाय-फाय कनेक्टिव्हिटी असणे आवश्यक आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे आपण वाय-फायच्या मदतीने व्हॉट्सअ‍ॅप, झूम किंवा गूगल मीट कॉल करता, तेव्हा आपण व्हीओ-वायफाय सेवेच्या मदतीने कॉलदेखील करू शकता. या सेवेमध्ये आपण दोन्ही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉल करू शकता. शाओमी आणि वनप्लसच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला व्होयफायची सेवा मिळेल. या सेवेसाठी युजर्सना त्यांच्या फोनमध्ये काही बदल करावे लागतील. आपल्या फोनमध्ये 4-जी सिम असेल आणि नेटवर्क नसेल, तरीही तुम्ही या सेवेचा आनंद घेऊ शकणार आहात.

व्हीओ-वायफाय सेवेचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम आपल्याला आपल्या फोनच्या सेटिंग्जवर जावे लागेल. यानंतर, आपल्याला कनेक्शन पयार्यावर क्लिक करावे लागेल. आता आपल्यासमोर वायफाय पर्याय मिळेल, जो आपण चालू करू शकता. त्यानंतर आपण आपला फोन कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट करू शकता आणि त्यानंतर व्हो-वायफाय सेवा वापरू शकता.

या स्मार्टफोनमध्ये सेवा उपलब्ध

रेडमी नोट 7 प्रो, रेडमी 8 ए ड्युअल, वनप्लस नॉर्ड, वनप्लस 8 टी, वनप्लस 8, वनप्लस 8 प्रो, रेडमी 9 पॉवर, रेडमी 9 ए, रेडमी के 20 प्रो, रेडमी नोट 7, रेडमी नोट 8 प्रो, रेडमी वाय 3, रेडमी 7 ए , रेडमी 9 प्राईम, पोको एम 2, पोको एम 2 प्रो, पोको एक्स 3, पोको सी 3. (now you can talk on your mobile with VOWiFi without network)

इतर बातम्या

Gold Price | सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले, गुंतवणुकीची योग्य वेळ केव्हा? वाचा सविस्तर…

कार घेण्याचा विचार करताय? 4 लाखांपेक्षा कमी किमतीत हे जबरदस्त पर्याय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें