शार्क फिन सेल्फी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, Oppo चा Reno 10x Zoom लाँच

मुंबई : Oppo ने भारतात Reno सिरीजचे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये पहिला Oppo Reno 10x Zoom आणि दुसरा Oppo Reno आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये काही विशिष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये शार्क फिन डिझाईन पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये केवळ 10x झूम फीचरचा फरक आहे. लो एन्ड Oppo Reno 10x […]

शार्क फिन सेल्फी कॅमेरा, स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर, Oppo चा Reno 10x Zoom लाँच
Follow us
| Updated on: May 28, 2019 | 6:11 PM

मुंबई : Oppo ने भारतात Reno सिरीजचे दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये पहिला Oppo Reno 10x Zoom आणि दुसरा Oppo Reno आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये काही विशिष्ट फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये शार्क फिन डिझाईन पॉप अप सेल्फी कॅमेरा आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये केवळ 10x झूम फीचरचा फरक आहे. लो एन्ड Oppo Reno 10x Zoom मॉडलमध्ये  क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आहे. यामध्ये ट्रीपल रिअर कॅमेरा लेन्स 10x झूमसोबत देण्यात आला आहे. तर लो एन्ड Oppo Reno मध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर देण्यात आलं आहे. यामध्ये ड्युअल लेन्स कॅमेरा सेटअप आहे.

Oppo Reno च्या दोन्ही फोनती किंमत

Oppo Reno 10x Zoom हा स्मार्टफोन दोन रंगामध्ये उपलब्ध आहे. यामध्ये ओशिअन ग्रीन आणि जेट ब्लॅक हे रंग आहेत. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरुन ऑर्डर करु शकता.

Oppo Reno 10x Zoom 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 39,990 रुपये आहे. Oppo Reno 10x Zoom 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 49,990 रुपये आहे. Oppo Reno 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजच्या व्हेरिअंटची किंमत 32,990 रुपये आहे, तर

Oppo Reno 10x Zoom चे फीचर्स

Oppo Reno 10x Zoom या स्मार्टफोनमध्ये 6.6 इंचाचा फूल HD+ एमोलेड पॅनल देण्यात आलं आहे. यामध्ये फूल स्क्रिन डिस्प्ले प्रोटेक्टिव्ह आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 6 देण्यात आलं आहे. याचा कॅमेरा एका वेगळ्या मोटोराईज्ड पॉप अप मॉड्यूलच्या आत लपलेला आहे. पॉप अप मॉड्यूलबद्दल सांगायचं झालं तर, हा पूर्णपणे नवीन डिझाईन आहे. याचा कॅमेरा राईट ट्र्यांगलमध्ये 11 डिग्री असा ओपन होतो. हे एक शार्क फिन डिझाईन सारखं आहे. या मॉड्यूलमध्ये यूझर्सला एलईडी फ्लॅश देखील मिळणार आहे. यामध्ये फॉल डिटेक्शन फीचर आहे, म्हणजे जर फ्रंट कॅमरा ओपन असेल आणि फोन खाली पडला तर तो सेंसरच्या मदतीने आपोआप आत जाईल.

Oppo Reno 10x Zoom मध्ये 2.8GHz ऑक्टा कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 855 प्रोसेसर आणि 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळतं. यामध्ये यूझरला मायक्रो एसडी कार्डचा सपोर्टही मिळतो. या फोनचा आणखी एक व्हेरिअंट आहे. यामध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज मिळतं.

Oppo Reno 10x Zoom मध्ये ट्रीपल रिअर लेन्स कॅमेरा आहे.  48 मेगापिक्सलचं प्राइमरी सेन्सर आणि 8MP F2.0 आणि टेलिफोटो 13 मेगापिक्सलचं सेन्सर आहे. तीन्ही सेन्सरमध्ये सोनी IMX 586 आहे. रिअर कॅमेरामध्ये हायब्रीड झूम देण्यात आलं आहे. तर 10x कॅमेरा 60x डिजीटल झूम फीचरही देण्यात आलं आहे.  याचा फ्रंट कॅमेरा हा 16 मेगापिक्सलचा आहे.

Oppo Reno चे फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 710 प्रोसेसर आणि 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आलं आहे. यामध्ये 48 मेापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे जो 5 मेगापिक्सलच्या सेन्सरसोबत येतो. या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 10x Zoom  ला सपोर्ट करत नाही. इतर फीचर्स बघता, यामध्ये 3765mAh ची बॅटरी आहे. तसेच यामध्ये  पॉप अप शार्क फिन कॅमेराही देण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.