सावध राहा…..पॅनकार्ड संबंधित हा मेसेज तुम्हालाही मिळाला का? PIB ने केले अलर्ट
सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून पॅन कार्डशी संबंधित एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना त्यांचे पॅन कार्ड डिटेल्स अपडेट करण्यास सांगितले जात आहे आणि तसे न केल्यास त्यांचे खाते बंद करण्याचा दावा केला जात आहे.

आधार कार्डप्रमाणेच पॅनकार्डही आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज आहे. कोणत्याही आर्थिक कामासाठी किंवा बँकेच्या कामासाठी पॅनकार्डची गरज असते, पण आजकाल पॅनकार्डशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांना २४ तासांच्या आत त्यांच्या खात्यातून पॅनची माहिती अपडेट करण्यास सांगितले जात असून तसे न केल्यास खाते बंद करण्याचा इशारा देण्यात येत आहे. दरम्यान पीआयबीने या संपूर्ण प्रकरणातील सर्व गोष्टींची पडताळणी केली असून अशी पोस्ट पूर्णपणे फेक असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी अश्या खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. PIB ने अश्या कोणत्याच प्रकारचे मेसेज पोस्ट करण्यात आलेली नाहीये.
‘पॅन डिटेल्स अपडेट करा, नाहीतर अकाऊंट बंद होईल…’
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या ग्राहकांशी संबंधित एक फेक पोस्ट गेल्या काही दिवसांपासून वेगाने व्हायरल होत आहे. यामध्ये ग्राहकांना 24 तासांच्या आत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेतील त्यांच्या खात्यासोबत पॅनशी संबंधित माहिती अपडेट करण्याच्या सूचना देण्यात येत असून तसे न केल्यास ग्राहकाचे खातेही बंद करण्यात येणार आहे. ही पोस्ट पाहिल्यानंतर तुम्हीही नर्व्हस असाल तर सावध व्हा, कारण ती पोस्ट फेक आहे आणि इंडिया पोस्टने अशी कोणतीच माहिती पोस्ट केलेली नाही. पीआयबीने स्पष्टपणे म्हटले आहे की, @IndiaPostOffice असा कोणताही संदेश पाठविण्यात आलेला नाही.
इंडिया पोस्टने हा मेसेज पाठवला नाही.
दरम्यान सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे पीआयबीने पॅन कार्ड संबंधित असलेली अशी कोणतीही माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली नाही त्यामुळे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक खातेदारांना फसवणुकीबद्दल सावध केले आहे. फॅक्ट चेकने अशा पोस्ट फसव्या असल्याचे आढळले आणि इंडिया पोस्टने असे संदेश पाठवलेले नाहीत आणि पाठवणार नाहीत, असे म्हटले आहे. पीआयबीच्या म्हणण्यानुसार, अशा फेक मेसेज किंवा पोस्टमध्ये संशयास्पद लिंक असते, ज्यामुळे ग्राहकांचे नुकसान होऊ शकते.
लिंक ओपन न करण्याचा सल्ला
पॅन कार्डशी संबंधित या घोटाळ्याबाबत युजर्सना सावध करण्याबरोबरच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने असा सल्लाही दिला आहे की, लोकांनी कोणत्याही लिंकवर क्लिक करणे किंवा या मेसेजमध्ये समाविष्ट केलेली वैयक्तिक माहिती शेअर करणे टाळावे आणि खाते बंद करण्यासारखे कोणतेही दावे टाळावे कारण ते बनावट आहेत. इंडिया पोस्ट कधीच कोणताही संदेश पाठवत नाही.
सायबर गुन्हेगारांची युक्ती
पीआयबीने यापूर्वीच पॅन कार्ड वापरकर्ते आणि इंडिया पोस्ट ग्राहकांना यासंदर्भात इशारा दिला आहे आणि आता पुन्हा एकदा अशा पोस्ट व्हायरल झाल्यास इशारा देण्यात आलेला आहे. यामध्ये पीआयबीने ग्राहकांना बँक खात्याची माहिती आणि पॅन कार्ड यासारखे वैयक्तिक तपशील कोणालाही शेअर न करण्यास सांगितले आहे. कारण सायबर गुन्हेगार अनेकदा असे फेक मेसेज पाठवून लोकांची वैयक्तिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर बँक खात्याशी जोडलेल्या माहिती आधारे तुमच्या बँक खात्यात असलेली रक्कम काढली जाऊ शकते.