फोन हरवला? टेन्शन नको, हरवलेला फोन गुगल शोधून देणार!

मुंबई: तुमचा फोन हरवला असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता गुगल तुमचा हरवलेला फोन शोधण्यास मदत करणार आहे. त्यासाठी गुगलने एक खास फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा हरवलेला फोन परत मिळवू शकता. ‘Find my device’ या गुगल अॅपद्वारे तुम्ही हरवलेला फोन शोधू शकता. गुगलच्या फाईंड माय डिव्हाईस या अॅपमध्ये एक […]

फोन हरवला? टेन्शन नको, हरवलेला फोन गुगल शोधून देणार!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई: तुमचा फोन हरवला असेल तर आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण आता गुगल तुमचा हरवलेला फोन शोधण्यास मदत करणार आहे. त्यासाठी गुगलने एक खास फीचर आणले आहे. या फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमचा हरवलेला फोन परत मिळवू शकता. ‘Find my device’ या गुगल अॅपद्वारे तुम्ही हरवलेला फोन शोधू शकता.

गुगलच्या फाईंड माय डिव्हाईस या अॅपमध्ये एक नवं फीचर अॅड करण्यात आलं आहे. ‘Indoor Maps’ असं या फीचरचं नाव आहे. इनडोअर फीचर तुम्हाला तुमचा हरवलेला फोन परत मिळवून देण्यास मदत करेल.

इनडोअर मॅप्स फीचरच्या माध्यमातून गुगल युजरला काही इमारतींचा (विमानतळ, मॉल्स) इनडोअर व्ह्यूव दाखवेल. यामुळे युजर आपला फोन कुठे विसरला आहे ते फाईड माय डिव्हाईसच्या माध्यमातून  कळू शकेल. विशेष म्हणजे,जोपर्यंत आपला फोन आपल्याला सापडत नाही तोपर्यंत फोन लॉकच राहील अशी सुविधाही देण्यात आली आहे.

या इनडोअर मॅपमध्ये कुठल्या कुठल्या इमरतींचा व्ह्यूव दिसू शकेल, हे गुगलने अजून स्पष्ट केलेले नाही. फोन शोधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इतर अॅपच्या तुलनेत गुगलचा फाईड माय डिव्हाईस अॅप आपल्याला अधिक उपयोगी ठरु शकेल. या अॅपमध्ये विमानतळ आणि मॉल्स किंवा इतर मोठ्या इमारतींमध्ये तुमचा स्मार्टफोन शोधण्यास मदत करु शकतो.

फाईंड माय डिव्हाइस अॅप उपभोगकर्त्यांसाठी खूप फायद्याचं ठरणार आहे. हे अॅप सायलेंट मोड किंवा लॉक असलं तरी तुम्हाला अलर्ट देतं आणि लॉक स्क्रीनवरही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दाखवतो.

Non Stop LIVE Update
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.