Phone Number Hacked: फोन हॅक झाल्यावर सर्वात अगोदर काय कराल? रोज मोबाईल वापरणाऱ्यांनाही नाही माहिती
Phone Number Hacked: डिजिटल युगात इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे सायबर भामट्यांच्या जाळ्यात अनेक जण सहज अडकतात. फोन हॅक झाल्यावर सर्वात अगोदर काय करायला हवे हे रोज फोनवर पडीक असलेल्यांना सुद्धा माहिती नसते. फोन हॅक झाल्यावर सर्वात अगोदर या गोष्टी करणे आवश्यक आहे. एका क्लिकवर जाणून घ्या...

Phone Number Hacked: डिजिटल युगात इंटरनेट आणि स्मार्टफोन हे जसं संपर्कांचं नवीन आयुध झालं आहे. तसंच सायबर भामट्यांचे जाळे सुद्धा वाढले आहे. सामान्यांना चुना लावण्यासाठी आणि त्यांना फसवण्यासाठी सायबर भामटे टपलेले असतात. त्यामुळे आमिष दाखवून हे लोकांना जाळ्यात अडकवतात. बँक खात्यातून रक्कम काढतात. अथवा वैयक्तिक माहिती चोरतात आणि सार्वजनिक करण्याची भीती दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात.फोन हॅक झाल्यावर सर्वात अगोदर काय करायला हवे हे तुम्हाला माहिती आहे का?
1. बँकेशी अगोदर संपर्क साधा
जर तुमचा मोबाईल हॅक झाला असे तुमच्या लक्षात आले तर सर्वात अगोदर तुमच्या बँकेशी संपर्क साधा. तुमचे क्रेडिट कार्य असलेल्या संस्थेशी संपर्क साधा. तुमचे खाते इतर कोणी वापरतंय का याची चौकशी करा. नाहीतर काही कालावधीसाठी त्याचा वापर थांबवण्याची विनंती करा. त्यामुळे तुमच्या खात्यातील रक्कम सुरक्षित राहील. तसेच तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्यावर त्याचा वापर कोणी करू शकणार नाही.
2. लागलीच तुमचा पासवर्ड बदला
सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचे सर्व पासवर्ड तातडीने बदला. त्यानंतर लागलीच नवीन पासवर्ड तयार करा. तुमच्या फोनशी जोडलेल्या सर्व साईट आणि इतर प्लॅटफॉर्मवरील पासवर्ड लागलीच बदला. त्यामुळे तुमची माहिती सुरक्षित राहील. त्याचा गैरवापर होणार नाही. मोबाईल हॅकर्सला हा पासवर्ड ओळखता येणार नाही असं क्लिष्ट ठेवा.
3.संशयित ॲप्स हटवा
तुमच्या फोनमधील सर्व संशयित ॲप्स अगोदर हटवा. तसेच जर व्हॉट्सॲप अथवा ई-मेल अथवा इतर प्लॅटफॉर्मवरील संशयित लिंक्स हटवा. फोन रिस्टार्ट करा. पुन्हा हे संशयित ॲप्स आहेत की नाही ते तपासा. जर असतील ते मोबाईल सेटिंगमधील ॲप्समधून हटवा.
4. फोन फॅक्ट्री रिसेट करा
जर तुम्हाला पॉप ॲप वा मेलवेअर ॲप्स दिसत असतील तर मात्र तुम्ही तातडीने फोन फॅक्ट्री रिसेट करा. फॅक्ट्री सेटिंग्सज रिसेट करा. अर्थात हा अखेरचा उपाय आहे. या प्रक्रियेमुळे फोनचा सर्व डेटा डिलिट होईल.
5. तुमच्या मित्रांना सांगा
तुमच्या मित्रांना आणि कॉन्टॅक्ट यादीतील मित्रांना फोन हॅक झाल्याची माहिती द्या. म्हणजे तुमच्या ॲप्सचा, सोशल मीडिया अथवा कॉन्टॅक्टचा गैरवापर करून तुमच्या मित्रांना कोणी फसवू शकणार नाही. तुमच्याविषयीचा कोणताही मॅसेज अथवा पैसे मागितल्यास त्याकडे दुर्लक्ष करण्यास सांगा
6. सायबर सेलला तक्रार करा
जर तुमचा फोन हॅक झाल्याचा तुमचा अंदाज असेल तर लागलीच स्थानिक सायबर सेलकडे तक्रार करा. अथवा राष्ट्रीय सायबर पोर्टलवर याविषयीची तक्रार करा. त्यामुळे तुमचा फोन हॅक झाल्यावर महत्त्वाची माहिती लीक होणार नाही. बँक खात्यातील रक्कम सुरक्षित राहील.
