BSNL 4G Service : BSNL ची डिजिटल क्रांती, स्वदेशी 4 सर्व्हिस सुरू, आता गाव खेड्यात…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीएसएनएल या शासकीय कंपनीच्या 4 जी नेटवर्कचे उद्घाटन केले. आता याचा लाभ 9 कोटी ग्राहकांना फायदा होणार आहे. भविष्यात बीएसएनएलचे ग्राहक वाढण्याची शक्यता आहे.

BSNL 4G Service : BSNL ची डिजिटल क्रांती, स्वदेशी 4 सर्व्हिस सुरू, आता गाव खेड्यात...
BSNL 4G SERVICE LAUNCH
| Updated on: Sep 27, 2025 | 8:58 PM

BSNL 4G Service : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज BSNL च्या स्वदेशी 4 जी सेवेचे उद्घाटन केले. मोदी यांनी या सेवेचे उद्घाटन करताच आता बीएसएलची सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची नेटवर्कची समस्या दूर होणार आहे. विशेष म्हणजे आगामी काळात BSNL ची टेलिकॉम सेवा वापरणाऱ्यांची संख्याही वाढण्याची शक्यात व्यक्त केली जात आहे. आता बीएसएनएलची 4 जी सेवा संपूर्ण देशात असणार आहे. अगोदर BSNL ही सेवा देशाच्या वेगवेगळ्या टेलिकॉम सर्कल्समध्ये कार्यान्वित होती. विशेष म्हणजे सध्या चालू करण्यात आलेली ही 4 जी सेवा पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे.

लवकरच 5 जी सेवाही होणार सुरू

मिळालेल्या माहितीनुसार BSNL आपली 5 जी सेवा आणण्यावरही काम करत आहेत. या वर्षाच्या शेवटपर्यंत दिल्ली, मुंबई यासारख्या मोठ्या शहरात BSNL ची 5 जी सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे. 26 सप्टेंबर रोजी BSNL या कंपनीला 25 वर्षे पूर्ण झालेले आहेत. बीएसएनएल कंपनी भविष्यात तब्बल 97500 टॉवर्स देशभरात लावणार आहे. त्यामुळे BSNL चांगल्या पद्धतीने सेवा देण्याची शक्यता आहे.

एकूण 37 हजार कोटी रुपयांचा आला खर्च

BSNL चे 4 जी तंत्रज्ञान संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानावर आधारित आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार ही सेवा सुरू करण्यासाठी लागणारे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सगळे भारतातच तयार करण्यात आलेले आहेत. या बाबबतीत भारत आता अग्रभागी असणाऱ्या पाच देशांच्या यादीत सामील झाला आहे. याआधी स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारलेली 4 जी नेटवर्क सेवा तयार करण्यासाठी भारताने 37 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत.

9 कोटी युजर्सना होणार फायदा

आता देशभरात BSNL ची 4 जी सेवा सुरू झाल्यामुळे एकूण 9 कोटी युजर्सना त्याचा फायदा होईल, असे सांगितले जात आहे. BSNL चे सीमकार्ड वापरल्यास नेटवर्कची अडचण यायची. त्यामुळेच लोक खासगी टेलिकॉम कंपन्यांचे सीमकार्ड वापरायचे. आता मात्र तशी अडचण येणार नाही. त्यामुळे भविष्यात BSNL चे तंत्रज्ञान वापरणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.